• 135
  • 1 minute read

महाराष्ट्र विधानसभा परिसरात आपल्या खास समर्थकांकरवी धुमाकूळ घालणारे फडणवीस कुशल राजकारणी कसे?

महाराष्ट्र विधानसभा परिसरात आपल्या खास समर्थकांकरवी धुमाकूळ घालणारे फडणवीस कुशल राजकारणी कसे?

शरद पवार व उद्धव ठाकरेंना फडणवीस प्रामाणिक राजकारणी कसे काय वाटतात ?

         संविधान, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही राज्य व्यवस्थेला पोषक वातावरण या देशात नसल्याने स्वातंत्र्याच्या 75 वर्षात ही लोकशाहीची पाळमुळे खोलवर रुजली नाहीत. खर तर या देशातील ३ टक्के ब्राह्मणी समाजाच्या सर्व प्रकारच्या दास्यातून मुक्तता करणारी नवी व्यवस्था भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान व लोकशाही राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून दिल्यानंतर समाजातील ९० ते ९५ टक्के बहुजन समाजाने संविधान व लोकशाहीला सर्वपरीच मानायला हवे होते. पण धार्मिक गुलामीच्या बेड्या इतक्या पक्क्या होत्या की आपल्या मुक्तीचा मार्ग ही बहुजनांना दिसला नाही. आज ही दिसत नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना याची जाणीव असल्याने त्यांनी स्वतःच संविधान व लोकशाहीबद्दल अगदी सुरुवातीपासून चिंता व्यक्त केलेली आहे. अन् या चिंतेचे कारण नागपुरातील रेशीम बाग आहे. ही रेशीम बाग धर्मांध, व मानवता विरोधी वातावरण तयार करण्याचा कारखाना आहे. अंध भक्त येथून बाहेर पडले असून त्यांनी संविधान, धर्मनिरपेक्षता व लोकशाहीसमोर अनेक धोके व आव्हाने निर्माण केली आहेत. आहेत. ज्याने संविधान व लोकशाही व्यवस्थेला पायदळी तुडविण्याचे अनेक प्रताप केले आहेत.
       हे अख्या महाराष्ट्राला माहित असले तरी पुन्हा एकदा नव्याने सांगायची गरज आहे, अन् ती महाराष्ट्राचे महान नेते शरद पवार व शिवसेना ( उबाठा) चे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रद्रोही देवेंद्र फडणवीस यांचा उदोउदो केल्याने सांगायची गरज निर्माण झाली आहे. राज्यातील जनतेने फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारलेले नाहीतर त्यांना झेलत आहे. राज्यातील जनताच नव्हेतर तर भाजप आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट ही फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने खुश नाही. तीच अवस्था अजित पवारांची आहे. पण या दोन्ही बिचाऱ्यांवर ईडी आणि सीबीआयच्या चौकशीची टांगती तलवार असल्याने ते गप्प आहेत. फडणवीस म्हणजे तोंड दाबून मार अशी अवस्था विरोधकांसह सर्वांची झाली आहे. यामध्ये त्यांच्या स्वतःच्या भाजपचा ही समावेश आहे. मुनगंटीवार यांच्यासारखे नेते नाराज आहेत. भाजपमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. पण चमचेगिरी करण्यात फडणवीस इतके माहीर आहेत, की त्यांच्या इतकी मोदी, शहांची लाचारी करण्याची हिंमत राज्यातील अन्य भाजप नेत्यांची नसल्याने ते या पदापर्यंत पोहचत नाहीत. फडणवीस संघाच्या व भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातील लाचारी, मराठी भाषेला असलेला विरोधी, राज्याच्या औद्योगिक विकासाला खीळ घालणारी व गुजरात धार्जिणे धोरणं, ही शरद पवार व उद्धव ठाकरेंना कमालीची भुरळ घालून गेली आहेत. त्यामुळेच फडणवीस यांच्याबद्दल लिहिताना त्यांची याकडे नजर गेली नाही.
           फडणवीस यांच्या वाढ दिवसा निमित्त पवार आणि ठाकरे यांनी जी स्तुतीसुमने फडणवीस यांच्यावर उधळली आहेत, ती कुठल्या भाजपच्या नेत्यांनी ही उधळलेली नाहीत. संस्कृती रक्षक, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसदार, अभ्यासू, प्रशासनावर पकड असणारा नेता, प्रामाणिक, आधुनिकतेची कास धरून राजकारण करणारा नेता, अफाट कौशल्य आणि बुद्धिमता असलेले व्यक्तिमत्व, अशी स्तुती दोघांनी ही केली आहे. ही करताना दोघांमध्ये स्पर्धा लागल्याचे जाणवले. तर या स्तुतीसुमनांमुळे अख्खा महाराष्ट्र आवक झाला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवाराना दिसतात ते फडणवीस राज्याला का दिसत नाहीतर ? हा प्रश्न नक्कीच राज्यातील जनतेपुढे पडलेला असेल. 
          आता आताची गोष्ट आहे, फडणवीस यांनी पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मोदी व शहा या दोन गुजरात्यांच्या दबावापोटी घेतला होता. तसा निर्णय या दोघांचे गृहराज्य असलेल्या गुजरात सरकारने ही अद्याप घेतलेला नाही. पण मोदी, शहाच्या मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी भाषेच्या विरोधी भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी फडणवीस यांनी घेतला. त्याचा विरोध झाला. सारा महाराष्ट्र या विरोधात उभा राहिला अन् फडणवीसांना तात्पुरती माघार घ्यावी लागली. राज्यातील जनतेच्या अस्मितेचा व विरोधाचा सन्मान म्हणून त्यांनी सफसेल माघार घ्यायला हवी होती. पण त्यात ही राजकारण करीत त्यांनी जाधव समितीची घोषणा केली. जिला राज्यातील जनतेचा विरोध आहे. फडणवीस हे पवार आणि उद्धव ठाकरे यांना कुशल राजकारणी वाटतात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा चालविणारा वाटतात ? हे का ? हे न कळण्या इतकी राज्यातील जनता आता मूर्ख राहिलेली नाही. दुधखुळी नाही.
         कोरोना काळातील विरोधी पक्षाचा नेता म्हणून फडणवीस यांची भुमिका राज्यातील जनतेला माहित आहे. राज्य संकटात असताना शरद पवार व उद्धव ठाकरेंना कुशल, बुद्धिमान, प्रामाणिक वाटणारा नेता प्रत्येक क्षणी इथल्या जनतेच्या व तत्कालीन सरकारच्या विरोधात उभा राहिला. आमदारांनी एक महिनाच पगार कोरोनासाठी मुख्यमंत्री निधीस द्यावा, असा निर्णय राज्यात घेण्यात आल्यानंतर त्या निर्णयाला केराची टोपली दाखवत भाजप आमदारांचा एक महिनाचा पगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने स्थापन केलेल्या बोगस पंतप्रधान निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला . हा निर्णय घेणारे फडणवीस राज्यातील जनतेला महाराष्ट्रद्रोही वाटले. पण पवार व ठाकरे यांना तसे वाटत नाही. यावेळी ही या दोघांना फडणवीस यांच्यातील कुशल राजकारणी दिसतो. ते का ? हे समजत नाही.
           घटनाबाह्य पद्धतीने राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार फडणवीसांनी पाडले, त्यासाठी तीन दशकांपेक्षा अधिक काळ मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे दोन तुकडे केले. चिन्ह आणि नाव गद्दारांना मिळवून दिले. हे करताना लोकशाही, संविधान आणि आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय परंपरांना पायदळी तुडविले. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसला ही तोडले. विरोधी पक्षांच्या नेत्यांना ब्लॅकमेल केले, ईडी, सीबीआयच्या चौकशीचा ससेमीरा त्यांच्या मागे लावला, लोक प्रतिनिधींचा घोडेबाजार मांडला. लोकनियुक्त सरकार पाडून जनतेच्या मतांचा अनादर केला. राज्यातील तरुणांना रोजगार देणारे उद्योग मोदी, शहांची चापलूशी करण्यासाठी गुजरातला दिले, याच फडणवीसांच्या सत्ताकाळात महाराष्ट्राचा औद्योगिक क्षेत्रातील नंबर वन चा दर्जा गायब झाला, ते फडणवीस उद्धव ठाकरे व शरद पवार हे कुशल प्रशासक वाटत असतील, तर त्यांची काही मजबुरी असेल. पण राज्यातील जनतेला फडणवीस कुशल राजकारणी वाटत नाहीत.
     
 फडणवीस यांचे राजकारण व सत्ताकारण गुजरात धार्जिणे….!
   
                      फडणवीस हे राज्यातील जनतेसाठी राजकारण व सत्ताकारण करीत नाहीतर. दीड दिवसासाठी मुख्यमंत्री झाल्यानंतर केंद्राकडून राज्याच्या विकासासाठी आलेला १४ हजार कोटींचा निधी त्यांनी केंद्राला परत पाठविला. फडणवीस यांची ही कृती राज्याच्या कल्याणाची अजिबात नाही. हे पवार व उद्धव ठाकरे यांना का दिसले नाही. फडणवीस यांचे सत्ताकारण व राजकारण मोदी, शहा व गुजरातच्या विकासासाठी सुरू आहे. ते मोदी , शहांचे उद्योगपती मित्र अंबानी, अदानी काम करीत आहेत. यासाठी ते लाचार होऊन व स्वाभिमान विकून पदे मिळवित आहेत. अन आपल्या पदांचा वापर ते राज्याच्या विरोधात करीत आहेत, ही फडणवीस यांची खरी ओळख. महाराष्ट्रातील जनतेला हे स्पष्टपणे दिसत आहे. तसेच जाती जातीत नव्हेतर स्वजातीत ही भांडणे लावण्यात ते कुशल आहेत. त्यामुळे ते कुशल राजकारणी आहेत, हे म्हणण्यापेक्षा रेशीम बागेतून आलेला अजेंडा व तेथूनच पाठविण्यात असलेल्या गँगला हाताशी धरून ते धार्मिक अजेंडा राबवित आहेत. हे म्हणणे अधिक योग्य ठरते. ते आरक्षण विरोधी अजेंडा राबवित आहेत. मराठा व ओबीसी यांच्यातील आरक्षणावरून जी दरी निर्माण झाली आहे, त्यास ही फडणवीस हेच जबाबदार आहेत. हे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. 
       छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, फुले, शाहू, आंबेडकर आदी महापुरुषांच्या अवमान व अपमानाचा जाहीर अजेंडा ही रेशीम बागेतून आला असून हा नीच अजेंडा ते शासन व प्रशासनाच्या संरक्षणाखाली राबवित आहेत, यास कुणी कुशलता म्हणत असेल, तर ते त्यांना लखलाभ. महाराष्ट्रातील जनतेसाठी व महाराष्ट्र धर्मासाठी हे नीच कृत्य असून ते जे कुणी करीत आहे तो ही नीच आहे. फडणवीस यांची जागा व खरी ओळख हिच आहे.
          महाराष्ट्र हे प्रगत राज्य राहिले असून या राज्याला एक महान वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू , आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, नैतिक राजकारण, समान संधी उपलब्ध करून सर्व जाती धर्मांच्या लोकांना समान विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा आदर्श या महान या राज्याला लाभला असून याचा प्रभाव देशभर आहे. सर्व देश या महापुरुषांना आपला आदर्श मानत आहे. पण अपवाद संघ व भाजपचा आहे. या धर्मांध शक्तींनी महापुरुषांचा अवमान व अपमान करण्यासाठी भिडेच्या नेतृत्वाखाली फौज उभी केली असून तिचा म्होरक्या फडणवीस हेच आहेत.
        तसेच राज्यात संविधान व लोकशाही मूल्यांची जितकी पायमल्ली करता येईल, तेवढी करण्यासाठी ही फडणवीस यांनी आपल्या नेतृत्वाखाली एक फौज उभी केली आहे. गोपीचंद पडळकर, सदावर्ते असे बुड नसलेले लोक ही त्यांनीच उभे केले असून ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा ही एकेरी उल्लेख करीत टीका करीत आहेत. फडणवीस अतिशय खालच्या लेव्हलचे राजकारण करीत आहेत. महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या परिसरात तर सत्तेने माजलेल्या आमदारांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांना कायद्याची भिती राहिलेली नाही. या आमदारांनी हाणामाऱ्या केल्या, विधानसभा परिसरात गुंड नेले, त्यामुळे राज्याची शान, गौरव सारेच धुळीस मिळाले आहे. असे हे फडणवीस कुशल राजकारणी आहेत, हे म्हणण्याची हिंमत व धाडस शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याकडे आले कुठून ? हा प्रश्नच आहे.
…………
 
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
 
 
 
 
 

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *