धुळे दि.२८(यूबीजी विमर्श-प्रतिनिधी) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून देवपूर धुळे येथील जयहिंद शाळेचा १०० टक्के निकाल, लागला असून परीक्षेत जेवढे विद्यार्थी बसले होते तेवढे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. अभिरत्न सुरडकर हा विद्यार्थी ८१.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला आहे. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिरत्न वर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शाळेतील शिक्षकवृंदाकडून तसेच यूबीजी विमर्श माध्यम समूहाने अभिरत्नचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.मराठी विश्वकोश मंडळ,वाई येथील विद्याव्यासंगी सहायक संपादक रवींद्र घोडराज व धुळे जिल्हा वकील संघाचे कार्यकारणी सदस्य विधिज्ञ उमाकांत घोडराज यांचा अभिरत्न भाचा आहे.अभिरत्न यास जयहिंद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच व्ही.टी.गवळे सर व प्रभाकर पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.