• 53
  • 1 minute read

मानवी शरीर बरे करणारे वैद्यकीय डॉक्टर्स आणि अर्थव्यवस्थेचे “आजार” बरे करतो असा दावा करणारे अर्थतज्ज्ञ “डॉक्टर्स”

मानवी शरीर बरे करणारे वैद्यकीय डॉक्टर्स आणि अर्थव्यवस्थेचे “आजार” बरे करतो असा दावा करणारे अर्थतज्ज्ञ “डॉक्टर्स”

           आपल्याला ताप आला कि आपण डॉक्टरकडे जातो; डॉक्टर थर्मामीटर लावतो, किती ताप आहे बघतो; रक्त तपासणी करायला सांगून , ताप नक्की कशामुळे आला आहे , सर्दी पडशामुळे , व्हायरल, डेंगू का आजू काही. ताप आणि इतर लक्षण एकमेकांशी पडताळून बघतो
त्याप्रमाणे औषध देतो.

मग ताप आणि इतर लक्षण पूर्ण जाईपर्यंत , मॉनिटरिंग करतो ; वेळ पडली तर आपले आधीचे निदान थोडे चुकले याचा स्वीकार करून औषधे बदलून देतो

फक्त तापच नाही तर पोटाचे, हाडांचे, हृदयाचे, किडनीचे सर्व प्रकारच्या विकारांवर हीच काळाच्या कसोटीवर उतरलेली खालील शास्त्रीय मेथोडॉलॉजी वापरली जाते.

रोगी ज्या तक्रारी करत आहे त्याचा आदर करणे , रोग्याला तक्रारीची सवय लागली आहे असे न मानणे, लक्षणांची नोंद , शास्त्रीय तपासणी, त्याची नोंद, आजाराचे निदान, त्यावर औषध, गुण येत आहे का नाही याचे मॉनिटरिंग, हवेतसे रिझल्ट्स मिळत नसल्यास औषधात बदल……. (अलीकडे वैद्यकीय व्यवसायात शिरलेल्या नफेखोरीशी आणि वरील शास्त्रीय मेथोडलॉजीची गल्लत करू नये)

असे होऊ शकते की डॉक्टर बनावट असतो, किंवा त्याच्याकडे अपुरे ज्ञान / कौशल्य असते ; अशावेळी रोगी डॉक्टर बदलतात. विना संकोच
___________

देशाचे ८० टक्के नागरिक आर्थिक प्रश्नांच्या आजाराशी पिढ्यन्पिढ्या झुंजत आहेत. दारिद्र्य , बेरोजगारी, महाग शिक्षण, महाग वैद्यकीय सेवा , कमी वेतनमान, स्वयंरोजगार न चालणे, शेती अरिष्टे , पर्यावरणीय अरिष्टे …. मोठी यादी आहे.

राज्यकर्ते , धोरणकर्ते यांच्याकडून औषध मिळेल म्हणून त्यांना निवडून देत आहेत , आशेने बघत आहेत.
आणि त्यांना बंद खोलीत सल्ले देणारे , स्वतः कधी जनतेसमोर येण्याचे धैर्य नसणारे , सेमिनार हॉल मध्ये , आकडेवारीची भेंडोळी आणि अतर्क्य टर्म्स वापरून त्यांच्याच लोकांसमोर तासंतास बोलणारे पीएचडी अर्थतज्ञ

अर्थव्यवस्थेचे हे डॉक्टर स्वतःच ठरवतात काय आजार आहे , तो किती गंभीर आहे. ते नागरिकांना सांगतात कि तुम्हाला एकतर फार काही गंभीर आर्थिक आजार झालेला नाहीये. जो आहे असे तुम्हाला वाटते त्याला तुम्हीच जबाबदार आहात ;

शिक्षण , कष्ट , उद्योजकता , धैर्य , जोखीम घेण्यातून त्यावर मात करता येते. काहींनी केली आहे. (मात करू शकणारे एकूण पैकी ०.०००००१ टक्का देखील नसतात हे ते कधीही सांगत नाहीत)

तुम्ही देखील करू शकता. मात करू शकत नसलात तर तुमच्यमध्येच काही कमी आहे

असे आजार तर सर्वाना होतात, आम्ही विविध धोरणे , योजना , घोषणा अशी औषध देतच आहोत ;

पण ते कोणताही थर्मामीटर / वैद्यकीय उपकरण किंवा वस्तुनिष्ठ परीक्षा करत नाहीत ; जे थर्मामीटर ते लावतात त्याचे प्रोग्रामिंग त्यांनीच केलेले असते; स्वतःच जाहीर करतात आजार काही गंभीर नव्हता आणि आता रोगी खडखडीत बरा झाला आहे

संजीव चांदोरकर (१९ सप्टेंबर २०२५)

0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *