- 48
- 1 minute read
मानवेंद्रनाथ रायवादी ते बुद्धी प्रामाण्य वादी चळवळीचे संस्थापक : तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्रीजोशी
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 69
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे महाराष्ट्राला वैचारिक योगदान.
27 मे 1994 लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा स्मृतिदिन तर्कतीर्थ ही पदवी कलकत्ता विद्यापीठात त्यांना मिळाली होती. त्यांचं वेळी महाराष्ट्रात आचार्यांची परंपरा होती, पण तर्कतीर्थांची ही परंपरा आज पुढे चालली आहे काय असा प्रश्न? त्यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी अभिवादन करताना स्वतःसाठी व समग्र महाराष्ट्राच्या विचार विश्वासाठी उपस्थित करणे महत्त्वाचे वाटते. महाराष्ट्र कथनाने श्रेष्ठ ,वर्तनाने कनिष्ठ असे खेदाने सध्याच्या विद्वेषाच्या वातावरणामुळे म्हणावे लागते शास्त्रीचे .
19 12 ते 1994 या काळातील वाई ही कर्मभूमी समजून घेणे खूप महत्वाचे आहे .त्यांनी इथे व्यतीत केलेले जीवन हा .मोठा अभिमानास्पद इतिहास आहे. लक्ष्मण शास्त्री जोशी यांची.यह लोक यात्रा94 ला. महाबळेश्वर येथे संपली.
त्या शास्त्रीजी नि.महाराष्ट्राच्या वैदिक संस्कृती ,स्वातंत्र्य चळवळ, नव मानवतावाद, चळवळ बुद्धी प्रामाण्यवाद चळवळ ,मराठी साहित्य संमेलन, आणि आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीत साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करण्यास भाग पाडून त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे विश्वकोशासारखी जागतिक ज्ञान समृद्ध परंपरा मराठी भाषेत प्रस्थापित करणारे स्थापित करणारे लक्ष्मी शास्त्री जोशी हे महाराष्ट्राचे काल आज व उद्याचे कायम ज्ञान गारुड आहे, पण महाराष्ट्राने या महान तपस्वी तर्कतीर्थांचे कोणते विचार तीन दशकात पुढे नेले याच्या आत्मपरीक्षण करणे हे अभिवादनाच्या प्रसंगी महत्त्वाचे आहे. अभिवादन कृतज्ञतेची सभ्यता आहे. योगदान प्रति जाणीव ठेवणे आहे समाज निर्माण आतील त्यांच्या सेवा समर्पण वृत्तीचा तो गौरव आहे .तो आदर्श जपण्याचा संकल्प आहे, पण अभिवादनाची धन्यता ही महाराष्ट्राची कृतघ्नता विचार विस्मरणाची कृती ठरते आहे असे का होते आहे ?याचा अनेक पातळीवर विचार करण्याचे नितांत गरज आहे.
पाश्चात्य तत्त्वज्ञान यांचे आकलन करून घेऊन भारतीय हिंदू धर्म विमा असा वैदिक संस्कृतीचा गौरवशाली व्यापक पट आपल्या अथक ज्ञान साधनेतून ग्रंथातून सिद्ध करून देणारे तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री यांची कोणती विचार परंपरा महाराष्ट्राला सशक्त करून गेली आहे याचे परिशिलन झाले पाहिजे मंत्र पठण शास्त्री ते गांधीवादी शास्त्री ते मानवतावाद रायवादी शास्त्री असा त्यांचा व्यापक जीवन प्रवास स्वातंत्र चळवळीतून विकसित होत आधुनिक भारताच्या आकलनापर्यंत पोहोचतो आणि धर्मापलीकडे मार्क्स पलीकडे तो
जातो.
लक्ष्मी शास्त्री जोशी यांनी महाराष्ट्राला समृद्ध ज्ञान विश्वाचे दर्शन घडवले अस्पृश्यता निर्मूलन यामध्ये गांधी आणि आंबेडकर यांच्यातील पुणे करारातील संवादात एक भाष्यकार अर्थ विश्लेषक संस्कृतचा पंडित म्हणून भूमिका पार पाडली गांधींना अस्पृश्यतेच्या धर्मातील सूक्ष्म चुका शूद्र कोणास म्हणावयाचे ?जातीयता आणि अस्वस्थता यातील ऋग्वेदातील पुरावे कोणते आहेत हे सर्व कथन करणारे धैर्यवान लक्ष्मण शास्त्री जोशी हे सनातण्यांच्या वाई गावाचे रागाचे कारण बनले होते टीकेचे धनी झाले होते पण तरीही विचारापासून न ढळलेले शास्त्रीजी आणि तो 1932 चा पुणे करार आणि त्यातील ताण तणाव गांधीजींच्या प्राण जाण्याच्या उपोषणाच्या दबावाच्या वातावरणातील ती अवस्था आज महाराष्ट्र भारत समजावून घेईल काय?
जहाल टिळक पंथीय यांचा स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्रातील वर्चस्व आणि ब्राह्मणी इतरचळवळीचा भट भिक्षुकी सावकारी यांच्याविरुद्धचा तुफानी हल्ला हा ज्या कालखंडात चालू होता त्याच कालखंडात तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी वाई स्थित होते त्यांनी भोगलेला तुरुंगवास स्वातंत्र्य चळवळीतील योगदान हे महाराष्ट्र विसरत आहे काय? त्यांना वैदिक संस्कृतीचे समर्थक मध्ये बंदिस्त करतो आहे काय?
लक्ष्मण शास्त्री जोशी आणि यशवंतराव चव्हाण ही महाराष्ट्राची संस्कृती राजकारण साहित्य यांची अमित मैत्री होती आणि ती सभ्यतेचे राजकारण गरजेचे राजकारण नेहरू वादाचा स्वीकार करण्यासाठी टिकून राहिली होती हेही महाराष्ट्राने समजावून घेण्याची नितांत गरज आहे.
वाई स्थित आपल्या घरात रायवाद्यांच्या बैठका घेणारे शास्त्रीय जागतिक मानवतावादाचा नवा विचार महाभारत देशी कसा रुजवता येईल? यावर चर्चा करणारे शास्त्रीय आणि मानवेंद्रनाथ राय यांच्या योगदान आंतरराष्ट्रीय संबंध स्वातंत्र्य चळवळी काळातील गुप्त हालचाली हे सगळे जवळून पाहून मदत करणारे शास्त्रीय हे वैदिक संस्कृतीपेक्षा थोर स्वातंत्र्यसेनानी होते असे एक त्यांच्या त्यागाचे दर्शन घडते देश संस्कृतीने घडतो की देश स्वातंत्र्याने घडतो, याच्या वादात न पडता स्वातंत्र्याने देश घडतो त्या विश्लेषणाने देश पुढे जातो म्हणून नवभारत च्या प्रदीर्घ संपादकीय पदाच्या कालखंडात शास्त्रीजी नि वैचारिक संस्कृती धर्म समीक्षेची चार दशकाची वैचारिक मेजवानी महाराष्ट्राला दिले .त्यातूनच सह देशपांडे श्रीनिवास दीक्षित मेहेंदळे सदाशिव आठवले यदि देशपांडे देवदत्त दाभोळकर मे पू रेगे प्राची विद्या पंडित शरद पाटील संत चळवळीचे वस्तुनिष्ठ अभ्यासक बा र सु ठणकर मा पू मंगुडकर आ ह साळुंखे सोहनी व्दा भ कर्णिक . आचार्य शंकरराव जावडेकर आचार्य नरेंद्र देव अशा कितीतरी म्हननीय व्यक्तिमत्वांनी नवभारत चे विचार क्षितिज विकसित केले होते .महाराष्ट्राचा विचार पिंड आधुनिक संस्कृती समीक्षा अभिमुख धर्मातील परीशीलन पाश्चात्य विचारवादाचे आकर्षण मार्क्सवादाची सूक्ष्म चिकित्सा गांधीवादाचे प्रकटीकरण अशा असंख्य विषयांना न्याय देऊन महाराष्ट्राचे विचार विश्वसमृद्ध करण्यासाठी लक्ष्मी शास्त्री जोशी यांनी दाखवलेली उदारमतवादी संपादकीय भूमिका सातत्याने महत्त्वाचे वाटते संपादक विचार द्वेष्ट
असू नये तो विचार चिकित्सक विचार परिशीलनवादी असावा लागतो.
मनुस्मृति चा वाद नवभारत मधून घडवणारे आणि विचार शिस्त बाळगणारे लक्ष्मण शास्त्री जोशी आजच्या संपादकीय क्षेत्रातील संकीर्ण वादाला वेगळ्या आदर्श ठरतात .जसे आजचे संपादक संकीर्ण वादाचे बळी आहेत. ते ध्यानिती बांधवांचे बळी आहे त..
नवभारत आणि प्राज्ञ पाठशाळा यांच्या कार्याचा आधारस्तंभ आरंभीच्या काळात शास्त्रीय होते राजकारण सामाजिक चळवळी सहकार शिक्षण धर्मचिंतन शिक्षण या सर्व क्षेत्रात सहज नवनीत ज्ञान मांडणी करणारे त्यांना स्थान देणारे उदारशील व्यक्तिमत्व
म्हणजे लक्ष्मी शास्त्री जोशी होय. महाराष्ट्राच्या विचार परंपरेत सुधारक आगरकर यांची परंपरा आहे आणि चिकित्सा बुद्धीप्रामाण्य आणि आधुनिक वाद, भारतीय राष्ट्रवादाचा प्रवास या अंगाने जायला हवा यांसाठी सतत आपले विचार विचार विश्लेषण महाराष्ट्रभर करणारे हे संस्कृतीचे प्रबोधन करते ही ज्ञानाच्या क्षेत्रातील सम काळातील अनुभवाला आलेली एक मोठी मौलिक गोष्ट आहे ती जीवन कथा आहे.
विश्लेषण विहीन अर्थ विहीन स्वीकृती विहीन वैदिक संस्कृतीच्या उदातीकरणाचा कालखंड आता भारतात सुरू झाला आहे. अशा वेळेला प्राचीन भारतीय ज्ञान सभ्यतेचे सर्व ज्ञान संग्रहित करून ठेवणारे शास्त्री बुवा आजही महाराष्ट्राला नीट समजावून घेणे महत्त्वाचे वाटत नाही? बौद्ध परंपरा महानुभव परंपरा जैन परंपरा वारकरी संप्रदाय परंपरा आणि स्वातंत्र्योत्तर काळातील बदलते समाज जीवन या सर्वकालिक महत्त्वपूर्ण ज्ञान विषयाला ते संस्कृतीच्या अभ्यासामुळे खूप न्याय देऊ शकले नाही असे जरी असले तरीही एकूणच टिळक पंथीय विचारधारा व गांधी युग यांच्यामधील हा समन्वयाचा महान ज्ञान ी सम्यकता साधत पुढे गेला आहे .असे संघर्षाच्या अनेक प्रसंगावरून नमूद करता येते
वाई टिळक पंथीय टिळकांच्या आगमनाच्या अनेक घटना स्वागत समारंभ इथे झालेले आहेत इथल्या अनेक शास्त्री पंडितांचे वैदिक कार्य त्या संस्कृतीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे पण मानावेच लागेल जवळपास शास्त्रीपूर्वक काळातील धर्म मांसिक चालवणारे वामन लेले वेद पठनाची शाळा चालवणारे केवळ आनंद सरस्वती अशा कितीतरी थोर ज्ञान. तपसव्यांच्या सानिध्यात राहून शास्त्रीजीनी आधुनिक विचारधारेचा प्रवास स्वतः केला. महाराष्ट्रीयन ,आधुनिक विचारधारा घडवण्यासाठी योगदान दिले. त्यासाठी पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या भाषांतराचे अनेक अंक नवभारत मासिकाचे त्यांनी संपादित केले. न्यायमूर्ती रानडे प.नेहरू यशवंतराव चव्हाण एम एन रॉय आचार्य जावडेकर यासारख्या अनेक विषयाला वाहिलेले वैचारिक अंक त्यांनी प्रकाशित करून ज्ञान धन तयार करून ठेवले आहे. याकडे महाराष्ट्र आकर्षित होणे. आवश्यक आहे. असे अभिवादनच्या दिवशी आशावादी स्वप्न पाहिले तर ते चुकीचे ठरणार नाही.
स्वातंत्र्य चळवळ आणि वाई शहर किसनवीर आणि शास्त्री जी आणि सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळ 42 चा लढा भूमिगताचा लढा यामधील शास्त्रीजी भूमिका ही प्रति सरकारला किती पूरक ठरले ?याची मांडणी अद्याप झालेले नाही. मात्र प्रति सरकारच्या चळवळीचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील असले तरीही दिवंगत यशवंतराव चव्हाण हेही या चळवळ येथील एका गटाचे नेते होते. हे न विसरता चले जाव ची चळवळ आणि सातारा जिल्हा आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान ही गोष्ट वैदिक संस्कृतीच्या समीक्षे इतकीच त्यांच्या कार्याच्या सहभागामुळे अनमोल आणि इतिहास सिद्ध ठरते हे समजावून घेण्याची नितांत गरज आहे.
राजकारणातील सभ्यता उदारता सर्व जातीय समावेश सर्व जातीय स्वातंत्र्य सैनिकांचा सहभाग हे त्यातही वाई तील स्वातंत्र्य सैनिक सर्वात जास्त योगदान देतात हा योगायोग नाही तर वाईच्या प्राज्ञ पाठशाळेच्या प्रबोधनाची ही फलश्रुती आहे असे नाकारता येणार नाही
आज भारत आणि महाराष्ट्र हा हिंदुत्वाच्या कृतकवादाकडे ,तसेच. नव फाशी वादाच्या दिशेने पुढे निघाला आहे अशावेळी संस्कृत मध्ये भारतीय संविधान भाषांतरित करणारे संस्कृत पंडित तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना हे सगळे सनातनि हिंसावादाचे तांडव
त्यांच्या स्वप्नात होते का? असा प्रश्न पडतो.
सर्वात जास्त स्वातंत्र्य सैनिक असलेल्या वाई शहरात गांधी विचाराचा शास्त्रीजी किसनवीर यांचा एक गट होता. तसाच टिळक पंथीयांच्या गट ही होता. आज हाच जहान गट बनून वाई शहर संस्कृती समीक्षेचे शहर स्वातंत्र्य चळवळीचे शहर आपली ओळख हरवून नव्याने 2005 पासून हिंदू मुस्लिम दंगलीचे दर्ग्यातील उध्वस्त मदरशाचे शहर बनते इथे अनवाणी भगव्या भेटतील हजारो मुले नंग्या तलवारी घेऊन पुन्हा गुरुजी बरोबर चालू लागतात, आणि मिरवणुका काढतात पोलीस बघत बसतात आणि लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे वाई हे कर्मभूमीचे शहर कोण्या गुरुजीचे धारकऱ्यांचे शहर बनते
तेव्हा सुधारणावादाचा पराभव सनातनी शक्ती नेहमी करत असतात असाच इतिहासचा धर्म असतो काय? असा प्रश्न उपस्थित होतो. वाईच्या परिसरातील सहा गावांमधून जीवनाच्या अखेरीस विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रार्थना समाजाच्या शाखा स्थापन केल्या दलित वस्तीत जाऊन ते ब्राह्मो समाजाच्या प्रचाराचे कार्य करीत असेल रविवार पेठेत प्रार्थना घेत असत तिथेच नारायणराव चव्हाण हे रा णा चव्हाण यांचे वडील प्रार्थना समाज प्रसाराचे बाबरांच्या सहकार्य करत असत अशी ही पूर्वीची प्रार्थना समाजाची वाई आणि पश्चिमेची कोण्या गुरुजींची वाई दुभंग ते आहे .शहरांना विचारधारा असतात शहरांना प्रगतिकता असते. शहरांना नायकांची नावे असतात म्हणून शेक मीरा ते ढोल्या गणपती ते पेशव्यांनी बसवलेली वाई ही सगळी इतिहास नावे जरी असली तरी वर्तमानातील वाई ही तर्क तीर्थांची अभिवादनाला सिद्ध असलेली वाई कायम आहे म्हणूनच हे सर्वांना परिचित होणे सतत आवडत राहील. त्यासाठी या दर्शनीक समकालीन विचार विश्लेषक स्वातंत्र्यसेनानी राययवादी बुद्धी प्रामाण्यवादी शास्त्रीबुवांना अभिवादन करताना महाराष्ट्र सतत बुद्धिप्रामान्य वादाच्या वाटेवरून आम्ही चालत राहो आणि अवैज्ञानिकता जादूटोणा जारण मारण ईश्वर भया टाळत राहू
संस्कृतीच्या पोटात सहजीवनाचा व्यवहार असतो सह अस्तित्व ची महती असते . वंश आणि वर्णभेदाचा विकार नसतो तीच सतत सत्यतेच्यासाठी पुढे जाणारी सनातन हिंसेचे टाकून देणारी आधुनिक संस्कृती ही संमिश्रता बहुविधता बहुसंस्कृतिकता हा वारसा हे धन हा जीवन सहचार्याचा धर्म प्रस्थापित करत राहील तीच आधुनिक मांडनि तर्कतीर्थलक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केलेली आहे .
हे आम्ही धर्म देवळांच्या गावातील मटआणि घाट नुसते पाहूनच अचंबित होणारे संस्कृतीचे पर्यटक राहणारे कोरडे राहणार की जड अभिवादन करणार हा खरा 27 मे 2025 रोजी शास्त्रीजींच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी महत्त्वाचा प्रश्न ठरतो.
शिवाजी
राऊत सातारा
दिनाक 26मे 25 वेळ 6. 55
0Shares