मालेगाव तालुक्यात जातीयवादातून मातंग तरुणाचे मुंडन करून घर पेटवले; सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अमानुष कृत्याचा आरोप!

मालेगाव तालुक्यात जातीयवादातून मातंग तरुणाचे मुंडन करून घर पेटवले; सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अमानुष कृत्याचा आरोप!

मालेगाव तालुक्यात जातीयवादातून मातंग तरुणाचे मुंडन करून घर पेटवले; सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अमानुष कृत्याचा आरोप!

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी गावातून मानवतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. किरकोळ अपघाताच्या वादाचे रूपांतर जातीय संघर्षात होऊन, एका मातंग समाजाच्या तरुणाला बेदम मारहाण करत त्याचे मुंडन करण्यात आले आणि त्याचे घरही पेटवून देण्यात आले. विशेष म्हणजे, हे कृत्य करणाऱ्यांमध्ये सत्ताधारी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक आरोप केला जात आहे.
 
नेमकी घटना काय?
 
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण दीपक पानपाटील हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरून मालेगावला जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरात कट मारला. या अपघातात दीपक आणि त्यांची पत्नी रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. या अपघातानंतर झालेल्या वादात संतापलेल्या दीपक यांनी कार चालकाच्या श्रीमुखात लगावली. मात्र, तो कार चालक गावचा ‘जावई’ असल्याने वादाला वेगळे वळण मिळाले.
 
कार चालकाला मारल्याचा राग मनात धरून गावचा जावई असलेल्या ठाकरे परिवारातील सदस्य आणि इतर गावकऱ्यांनी दीपक यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तरुणाचे मुंडन करून दाढी, मिशा काढण्यात आल्या. या नराधमांचे मन एवढ्यावरच भरले नाही, तर त्यांनी दीपक यांचे घरही पेटवून दिले. यावेळी त्यांच्या पत्नीला आणि आईलाही अमानुष मारहाण करण्यात आली.
 
पोलीस स्टेशनमध्येही मारहाण आणि सेल्फीचा निर्लज्जपणा – 
 
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी पोलिसांच्या उपस्थितीतही पीडित तरुणाला मारहाण केल्याचे समोर येत आहे. पीडित तरुणाच्या आईसोबत त्याच्या टक्कल केलेल्या अवस्थेतील सेल्फी काढले.
 
प्रबुद्ध भारत मीडियाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व आरोपी हे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाशी संबंधित आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत यांनी आज अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी या प्रकरणातील आरोपींवर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
सध्या पीडित तरुण, त्यांची पत्नी आणि आई यांच्यावर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
 
 
 
0Shares

Related post

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली, काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली, काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली, काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी मुंबई/अमरावती, राज्यात कोयता…

घर हक्क परिषद

घर हक्क परिषद मुंबई व महाराष्ट्र राज्यातील परवडणाऱ्या घरांचे व जमिन विषयक प्रश्न कामगार व नागरिक…
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित ची समस्या आणि समीक्षा उत्तम कांबळे यांच्या शब्दात

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित ची समस्या आणि समीक्षा उत्तम कांबळे यांच्या शब्दात

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित ची समस्या आणि समीक्षा उत्तम कांबळे यांच्या शब्दात 40 वर्ष समाजाने कुठलीच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *