• 49
  • 1 minute read

“मुंबई स्पिरिट”!!!!!!

“मुंबई स्पिरिट”!!!!!!

         व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या कामाप्रमाणे काम आणि देऊ केलेल्या वेतनावर काम करणारा, ट्रेड युनियनचे सभासदत्व न घेणाऱ्या कामगाराचा “गुणवंत कामगार” म्हणून बहुमान करण्यामागील “त्यांचे” स्पिरिट…

गरिबांसाठी आयुष्यभर काम करणारा, पण शेकडो वर्षे पिढ्या मागून पिढ्या, कोट्यावधी गरीब मूळात तयारच कसे होतात असा प्रश्न मनात देखील न येणाऱ्या, असा प्रश्न न विचारणाऱ्याला “थोर समाजसेवक” म्हणून पुरस्कार देण्यामागील “त्यांचे” स्पिरिट…

विकेंद्रित शहरीकरण किंवा तत्सम संकल्पना न राबवता, आहेत तीच महानगरे अजून मोठी, महा महा महानगरे करत नेणारे, भांडवल रिचवण्यासाठी, अब्जावधी टन पोलाद आणि सिमेंट ओतून पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट तयार करणाऱ्या नागरी नियोजनाला कोणताही मूलभूत प्रश्न न विचारता …. ही आपत्ती निसर्गनिर्मित किती आणि मानवनिर्मित किती…असा प्रश्न न पडणाऱ्या…सर्व हालअपेष्टा विना तक्रार सोसणाऱ्या नगर वासियांच्या पाठीवर “मुंबई स्पिरिट” म्हणून दरवेळी थाप देण्यामागील त्यांचे “स्पिरिट”

एकाच जातकुळीतील आहे.

संजीव चांदोरकर (२० ऑगस्ट २०२५)

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *