असंवेदनशील भाषा सोशल मिडियावर प्रसारीत करणाऱ्यांवर कार्यवाही करावी…
जागतिक मूकबधिर दिनानिमित्त जनजागृती मोहीम रॅलीनंतर धुळे जिल्ह्यातील मूकबधिरांच्या मागण्यांबाबत धुळे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
धुळे दि.२६ (यूबीजी विमर्श) जागतिक मूकबधिर दिनानिमित्त धुळे जिल्हा मूकबधीर असोसिएशन मार्फत जनजागृती मोहीम रॅली चे आयोजन करण्यात आले होते.सदरच्या रॅली नंतर मूकबधिर संस्थेच्या कायदेशीर सल्लागार ॲड.उमाकांत घोडराज यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले. मूकबधिर संस्था ही मूकबधीर बांधवांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते जसे की, क्रीडा, नाट्य, सामाजिक, सांस्कृतीक असे कार्यक्रम आयोजीत करुन मूकबधीरांच्या शारिरीक व मानसिक प्रगतीसाठी प्रयत्नशील असते. तसेच त्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील. तसेच मुकबधीर बांधव यांच्यातील कलागुणांना वाव देऊन तसेच शैक्षणिकदृष्ट्या त्यांचा विकास करुन समाजात त्यांना सामान्य लोकांसारखेच मानाचे स्थान मिळवून देणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. जिल्हाधिकारी साहेब मिटिंग मध्ये व्यस्त असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे साहेब यांना सदरचे निवेदन सादर करण्यात आले.त्या निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे…… १) धुळे जिल्ह्यात खाजगी अस्थापनात मूकबधिरांसाठी दोन पुरूष व दोन महिलांकरीता जागा राखीव ठेवण्यात यावे. २) दिव्यांग कायदा २०१६ नुसार प्रत्येक स्वराज्य संस्था तसेच शासकीय विभागाने / शासनाने ५ टक्के इतका निधी खर्च करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्याकडील दिव्यांग ५ टक्के निधी दरवर्षी प्रमाणे निधी खर्च करण्यात यावे ३) जिल्ह्यातील मूकबधिर महिला भगिनींसाठी दिव्यांग कल्याण ५ टक्के निधीतून शिलाई मशिन वितरित करण्यात यावे ४) दिव्यांग मूकबधिर व्यक्तींचा हेतुपुरस्पर अपमान आणि थट्टा करणे, दिव्यांग लोकांची चेष्टा करणारे विनोद आणि असंवेदनशील भाषा सोशल मिडियावर प्रसारीत करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी. वरील सर्व प्रश्नांकडे वैयक्तिकरित्या लक्ष देवून योग्य ती कार्यवाही करावी. अश्या आशयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना देण्यात आले यावेळी संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड.उमाकांत घोडराज,अध्यक्ष निलेश मोरे,सचिव मयूर बोरसे,उपाध्यक्ष गुलाब अन्सारी, सहसचिव रवींद्र चुरेटे,खजिनदार गुरुदास कोठावदे,तब्बसूबम शेख,हिना रब्बानी,तसेच मूकबधिर महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.