सेक्युलर मतांचे विभाजन करून निवडणूक जिंकण्यासाठी मोदीने राज्या – राज्यात बी टीम तयार केल्या आहेत.या टीम अपेक्षित असा परिणाम देत असल्याने सेक्युलर पक्षांचे नुकसान तर भाजपचा फायदा होत आहे. आपल्या कर्तृत्वावर नाहीतर बी टीमच्या भरवशावर निवडणुका जिंकण्यासाठी मोदी व भाजप आता सोकावला आहे . याची चटक आता मोदी व बी टीमवाल्यांना ही लागली आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित व एमआयएमच्या युतीने एकट्या महाराष्ट्रात भाजप – सेना युतीला अधिकच्या 10 ते 12 जागा मिळवुन दिल्या आहेत. तो अन् तसाच प्रयोग पुन्हा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीत होण्याची चिन्हं दिसत आहेत. गेल्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात मिळालेल्या अशा प्रकारच्या यशाला मोदी व बी टीमवाले ही सोकावले आहेत. ही पडद्या आडची / मागची युती असून ती देश , संविधानासठी घातक आहे. या टीम मोदीला पाशवी बहुमत मिळवुन देण्यास कारणीभूत ठरत आहेत. याच बहुमताच्या जोरावर देशाचा पंतप्रधान आवारा झालेला आहे.संविधान, लोकशाही, धर्म निरपेक्षता, सवैधानिक संस्था व देशासमोर आव्हानं उभी केली आहेत. देशभर धर्मांध शक्तींचा नंगानाच सुरु आहे. हे पाशवी बहुमत भाजपला मिळवून देण्यात मोदींचा जितका वाटा आहे तितकाच त्यांनी उभा केलेल्या बी टीमचा ही आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत वंचित व एमआयएम युतीने राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढवून भाजपला फायदा पोहचवला होता. 41 लाख मतं मिळविल्याने भाजप – सेना युतीला १० ते १२ जागा अधिक मिळाल्या. अन् वंचित व एमआयएमवर बी टीमचा शिक्का बसला. हा शिक्का काही केल्या पुसला जाणार नाही. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना मोदी व भाजपकडे सांगण्यासारखे काहीच नाही. जनतेचे प्रश्न, समस्या या संदर्भात मोदी अन् भाजप जनतेच्या दरबारात नागडे उघडे पडले आहे. अशा वेळी 2019 सारखाच प्रयोग 2024 ला ही मोदी व भाजप करू शकतो. यावेळी पुन्हा त्यांना यश मिळू नये यासाठी देशाचे नागरिक, लोकशाही व संविधानाचे रक्षक, संरक्षक म्हणून जनतेची खरी जबाबदारी आहे. मोदीसोबतच या बी टीमवाल्यांनाही धडा शिकविणे गरजेचे आहे. संविधान व लोकशाही वाचविण्याच्या गप्पा मारता. जाहीरपणे संघ व भाजप मोदीला शिव्या घालता अन् मतांचं विभाजन करून त्यांनाच मदत करता. हे धंदे बंद करा, हे या बी टीमवाल्या संघोट्यांना सांगायची ही वेळ आता आली आहे. स्वतःला जे भारतीय म्हणून घेत आहेत, त्या सर्वांचे हे कर्तव्य आहे.