• 718
  • 1 minute read

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एम. टेक., पीएचडी. तृतीयपंथी उमेदवार

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एम. टेक., पीएचडी. तृतीयपंथी उमेदवार

हिंगोली लोकसभा  मतदारसंघातून एका उच्चशिक्षित तृतीयपंथीय उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. मतदारसंघाच्या अद्याप न सुटलेल्या समस्यांसाठी आपल्याला संसदेत पाठवा असं आवाहन विश्वनाथ फाळेगावकर  या तृतीयपंथीय उमेदवाराने केलं. 

हिंगोली लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून सोमवारी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप केलं जाईल. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा खासदार होण्यासाठी एका उच्चशिक्षित तृतीयपंथी उमेदवारने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर यामध्येच संशोधनाचं काम करणाऱ्या विश्वनाथ फाळेगावकर या तृतीयपंथी उमेदवाराला हिंगोली लोकसभेचा खासदार व्हायचंय.

हिंगोलीत शिक्षण आणि आरोग्याची सुविधा काहीच नाही, ती सुधारावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संसदेत बोलताना तुम्हाला मराठी, हिंदीसोबत इंग्रजीही आली पाहिजे. आपल्या लोकप्रतिनिधींना साधं बोलता येत नाही, त्यांना मुद्दे मांडता येत नाहीत असा आरोप त्यांनी केला. खासदारांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत असं ते म्हणाले.  

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *