आपल्याला काल्पनिक गोष्टी सांगून आपली दिशाभूल केली जाते.आपल्याला अकारण भीती दाखविली जाते,फ़सवले जाते,लुबाडले जाते.आपल्याला ईश्वर,देव,धर्म ह्यांची भीती दाखवून कमजोर बनवले जाते.बरं देव केवळ भारतातच आहेत.त्यांचे अमेरिकेत वास्तव्य नसते.तिथे देव कुणावरही कोपत नसतात,कुणालाही शाप देत नसतात,कुणावर ही अवकृपा करत नसतात.देव कुणाचेही काहीही बरे वाईट करत नसते.कारण ते कुठेच नसतात.देवाची भीती ही निराधार असते.निरर्थक असते.आपण वास्तविकतेचा विचार करत नाही म्हणून आपली फ़सगत होते.आपण भावनिक होवून कृती करतो.जसे सांगितले जाते तशी कृती करतो म्हणून फ़सतो. आपल्या लेकरांना ही मानसिक दृष्टया अपंग बनवतो.आपण त्यांना तर्क करायला शिकवत नाही,विचार करायला शिकवत नाही. भूख लागली की आपल्याला अन्न पाहिजे असते आणि ते अन्न शेतकरी पिकवतो.तहान लागली की पाणी पाहिजे असते आणि पाणी निसर्ग पूरवतो.शिक्षक शिकवून शिक्षित करतात.आजारपण आले की डॉक्टर उपचार करतात.आपलें सैनिक आपलें जीव धोक्यात घालून आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करतात.मजूर रस्ते बनवतात,इमारती बनवतात,धरणे बांधतात,रस्ते स्वच्छ करतात,आजारपणात परिचारिका आपली श्रुशुशा करतात,व्यापारी बाजारात जीवनोपयोगी वस्तु उपलब्ध करून देतात,वकील न्यायालयात न्याय मिळावे म्हणून प्रयत्न करतात,आपली बाजू मांडतात,पोलिस शांतता आणि सुव्यवस्था ठेवतात,गुन्हेगारांना पकडून शिक्षा करतात,सरकार मधील लोक लोकांच्या गरजा लक्षात घेवून उपाययोजना करतात. देशाचा सामाजिक,विदेश व्यवहार,राजकीय, प्रशासकीय, न्यायालयिन,औधोगिक, व्यावसायिक,आर्थिक, सांस्कृतिक व्यवहार सुरळीत चालावा म्हणून संविधान आहे.इतक्या सरळ आणि सोप्या गोष्टी आहेत.उगिच काल्पनिक गोष्टीवर विश्वास ठेवून मस्तक खराब करून घेण्याची काय गरज आहे. शेतकरी आत्महत्या करतात त्याचे लोकांना काहीच वाटत नाही,कामगार इमारती वरुन पड़ून मृत्यु पावतात त्याचे लोकांना काही वाटत नाही,समाजात महिला,मुलीं सुरक्षित नाहीत,त्यांचे बलात्कार होतात त्याचे लोकांना काही वाटत नाही,लहान मुलीं मुले औषधिविना मृत्यु पावतात त्याचे लोकांना काही वाटत नाही,गरीब मुले कुपोषणाने मृत्यु पावतात त्याचे लोकांना काहीही वाटत नाही,उसतोड़ कामगारांचे मुले मुलीं शिक्षणपासून वंचित राहतात,ते कामगार अपघातात मृत्यु पावतात त्याचे लोकांना काहीही वाटत नाही.सरकार ही बधिर आणि उदासीन असते कारण मरणारी माणसे त्यांच्या परिवारातील नसतात.संवेदना नसलेली माणसे सरकार मध्ये बसलेली आहेत.त्यांचे समर्थक ही संवेदनाहीन आहेत. जीवनाचे नियमन करण्यासाठी म्हणून धर्माची व्यवस्था केली आहे असे म्हणतात परन्तु धर्म तर लोकांच्या जीवावर उठले आहेत.दैनंदिन जीवनात धर्माची काहीच आवश्यकता नाही असे वाटते.संविधानिक मूल्य(Values) पुरेसे आहेत. देवाला किवा धर्माला काही म्हटले की रक्तपात होतो इतके क्रूर झाले आहेत लोक जेव्हा दैनंदिन जीवनात त्या देव आणि धर्माची काहीच आवश्यकता नसते.जगात भूकंप,महापूर आणि इतर नैसर्गिक आपत्ती मुळे जितकी माणसे मृत्यु पावली नाहीत त्या पेक्षा किती तरी जास्त माणसे जातीय,धार्मिक,वांशिक दंगली मध्ये मृत्यु पावली आहे. म्हणून विज्ञानवादी बना,विवेकवादी बना,मानवतावादी बना,तर्कवादी बना.सत्यशोधन करा.चिकित्सा करा.माणूसकी जपा.