• 134
  • 1 minute read

विधान परिषद निकाल आणि काॅंग्रेस !

विधान परिषद निकाल आणि काॅंग्रेस !

विधान परिषद निकाल आणि काॅंग्रेस !

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भा.ज.प.ला देश आणि राज्यांतील अन्य छोटे पक्ष संपावेत असेच नेहमी वाटत आलंय. आजचा विधानपरिषद निवडणुकीचा निकाल त्याचा हा अजून एक अस्सल पुरावा आहे. एकेकाळी रायगडमधून
शे.का.प.चा एक खासदार हमखास निवडून यायचा, आता मात्र विधानपरिषदेच्या अक्षरशः एका जागेकरिता शे.का.प.ला झुंजावं लागलंय. त्यातही दारुण पराभव झाला. खरे पाहता मिलिंद नार्वेकर शिवसेना(ठाकरे गट) यांच्या पेक्षा कित्येक जास्त पटीने शेकापच्या जयंत पाटलांनी म.वि.आघाढीचा एक घटक पक्ष म्हणून नुकत्याच पार पडलेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकीत म.वि.आ. आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला मदत करून आघाढीधर्माचे प्रामाणिक पणे नैतिक पालन केले.आणि तोच आघाढीधर्म म्हणून काँग्रेस,राष्ट्रवादी या आघाढीतिल घटक पक्षांना शे.का.प.च्या जयंत पाटलांना निवडून आणून शे.का.प.ने केलेल्या मदतीचा थोडेफार उतराई होण्याचा अल्पसा का होईना आघाढीधर्म त्यांना पाळता आला असता.पण ते होणे नव्हते.आघाढीधर्माचे पालन करणे हे कॉंग्रेसचे राजकीय चारित्र्य यापूर्वी कधीच राहिलेले नाहीय. विधानपरिषदेच्या या आधी झालेल्या निवडणुकीतही चंद्रकांत हंडोरे यांचा झालेला पराभव,आणि त्याऐवजी भाई जगताप यांचा झालेल्या विजयाने काँग्रेसचे खरे राजकीय चारित्र्य यानिमित्ताने यापूर्वी अलाहिदा उघडे पडले आहे.आताही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट) ने शे.का.प.च्या या मदतीचा फक्त स्व-स्वार्थासाठी पद्धतशीरपणे वापर करून घेतला आणि त्यानंतर गरज सरो अन वैद्य मरो या न्यायाने जयंत पाटलांना वाऱ्यावर सोडले.आता विधान परिषदेत एकही मुस्लिम आमदार नाही.आंबेडकरी विचारांचे आमदार नाहीत.डाव्या समाजवादी चळवळीतले देखील आमदार नाहीत.या सर्वांनी आणि विशेषतः आंबेडकरी तसेच मुस्लिम समुदायाने संविधान आणि लोकशाही..?? वाचविण्यासाठी काँग्रेस एन.सी.पी. (श.प.गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना नुकत्याच पार पडलेल्या १८व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत निवडून दिले आणि स्वतःचा आत्मघात करून घेतला आहे.वंचित बहुजन आघाढीला बी टीम बोलणारे आता ना बी टीम आहेत ना सी टीम ते आता काँग्रेस आघाडीचा स्लीपर सेल झालेत….!!

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२४
करणी आणि कथनी यात जमीन-अस्मान तफावत असणारी भारतिय राष्ट्रीय काँग्रेस आणि तिच्या दावणीला बांधले गेलेले छोटे राजकीय पक्ष…

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *