- 19
- 1 minute read
विषाची बाटली कुठून आली…?
कुठल्याही समाजाची ऐकी ही प्रस्थापित किंवा मुठभर सवर्णांच्या सत्तेसाठी धोक्याची घंटा असते…!!
आक्रमक वृत्तीचा, लढाऊ बाण्याचा, आणि सत्ताधारी मानसिकतेचा समाज एकत्र येतं असेल तर मूठभर सवर्ण आणि प्रस्थापित घराणे यांच्या पोटात गोळा उठतो….!!
प्रस्थापितांना आपली सत्ता धोक्यात येते का? म्हणून भिती वाटतेय. आणि म्हणून आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या समाजात बेकी कशी निर्माण करायची म्हणून प्रस्थापित सत्ताधारी कोणत्याही स्तराला जाऊन एकत्र आलेल्या समाजात विष पेरणी करुन बेकी निर्माण करतात…!!
देशाचा इतिहास साक्षी आहे, इथं जाती कशासाठी निर्माण केल्या. जाती जातीत अंतर्विरोध कसा उत्पन्न झाला. हा भेदनीतीचा सामाजिक इतिहास ओरडून, ओरडून सांगतोय की, मुठभर सवर्णांनी सर्व सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी चालविलेला हा खटाटोप आहे…!!
गेल्या एक वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर हे संपूर्ण महाराष्ट्र पायदळी तुडवत जाहीर सभा घेत होते…!!
ठरवून जाहीर सभा घेतल्या मुंबई, प. महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देश प्रत्येक विभागात आणि जिल्ह्यात जाहीर सभा होत होत्या, सभेला लाखा, लाखाची गर्दी जमतं होती. त्यातून जाहीर झाले महाराष्ट्रातील आंबेडकरी समुह एकजूट झाला आहे. राजकीय सारीपाटावर कुठलाच नेता शिल्लक राहिला नाही. एकमेव नेतृत्व म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांना आंबेडकरी समुहाने नेता म्हणून मान्यता दिली आहे….!!
आंबेडकरी समाजात ऐकी म्हणजे प्रस्थापित घराण्यांच्या सत्तेला सुरुंग हे समीकरण प्रस्थापितांच्या लक्षात आले…!!
वंचित बहुजन समुहात बेकी हेच प्रस्थापित सत्ताधारी वर्गाच्या सत्तेचे गमक आहे…!!
हा सत्ता संघर्ष आहे. प्रस्थापितांना सत्तेत कायम रहायचे आहे आणि आंबेडकरी समुह एकत्र येऊन अभ्यासु नेतृत्वाच्या मदतीने सत्तेत धडक मारण्याची तयारी करीत आहे…!!
अशावेळी प्रस्थापितांनी थंड डोक्याने ठरविले. आंबेडकरी समुहात बेकी झाली पाहिजे. बेकी साठी त्यांनी संविधान बचाव, लोकशाही बचाव हा मुद्दा घेऊन आम्ही संविधान रक्षक आहोत असा आभास निर्माण केला…!!
आंबेडकरी नेतृत्व आमच्या सोबतं येतं असेल तर संविधानवादी आणि आमच्या सोबतं येतं नसेल तर संविधान विरोधी….!!
प्रस्थापितांनी जी आघाडी केली त्या आघाडीत वंचित बहुजन आघाडी चा समावेश होणारच नाही यासाठी पद्धतशीर नियोजन केल्या गेले. आणि मिडिया मार्फतच बाळासाहेब आंबेडकर यांना हेकेखोर ठरवून टाकले…!!
जागा वाटपाच्या वाटाघाटी झाल्याचं नाहीत, एकत्र बसून ठरविण्याची गरज वाटली नाही.मविआ मधील तीन घटक पक्षांच्या जशा बैठकी झाल्या तशी एकही बैठक प्रकाश आंबेडकर यांच्या सोबतं झाली नाही.फक्त मिडिया मार्फतच किती जागा देणार हे जनतेला समजतं होते. महाराष्ट्रातील जनता टी. वी. पाहून आणि ऐकून काय चाललं ते समजून घेतं होते.खरं म्हणजे हा प्रस्थापितांचा ठरविलेला गेम होता…!!
ठरविलेला गेम मी यासाठी म्हणतोय की, उत्तर प्रदेशात बसपा आणि महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी ला इंडिया आघाडीत सामावून घेतले नाही यावरून सहज समजते….!!
आंबेडकरी समुहात बेकी निर्माण करणे, आंबेडकरी नेतृत्वाला बदनाम करणे आणि सत्तेसाठी आवश्यक असलेली मते मिळविणे. यासाठी प्रस्थापित सत्ताधारी राजकीय पक्षांनी सर्व संसाधनांचा वापर केला आणि मतदारांना इकडून तिकडे फिरविण्यात यश मिळविले…!!
घडून गेलेल्या घटनेबद्दल पश्छताप करण्यात अर्थ नाही. मात्र पुढे चुक होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल…!!
वयाच्या सत्तरीत प्रकाश आंबेडकर पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र तुडवित होते. जाहीर सभा घेतं होते आणि प्रस्थापितांना सांगतं होते, माझा समाज माझ्या सोबतं आहे….!!
बांधवांनो तुम्ही लाखा लाखाने एकत्र जमून नेतृत्वावर विश्वास दाखविला. समाजाची ऐकी दाखवून दिली त्या बद्दल तुमचे शतश: आभार आणि अभिनंदन, म्हणून तर प्रस्थापितांच्या पोटात गोळा उठला…!!
मात्र आता निवडणूक झाल्यावर सोशल मीडियावर आंबेडकरी भावंड तु तु मै मै करीत आहेत. एकजण म्हणतो, नेता चुकला. दुसरा म्हणतो तू दिडशहाणा आहेत आणि मग त्या भाषेतून मनभेद निर्माण होतांना दिसतं आहेत…!!
काही जणांना, त्यांचे क्षेत्र नसुनही जणू काही बुद्धा सारखे ज्ञान प्राप्त झाले आहे आणि ते राजकीय विधाने करीत सुटले आहेत. फतवा काढणे हा त्यातलाच भाग होता…!!
सोशल मीडियावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवांची नांवे घेऊन प्रचार केला जातो आहे की, यांना मते किती मिळाली.?? वगैरे.
टिका मान्य आहे मात्र टीकेच्या नावाखाली मना मनात विष पेरल्या जाते आहे हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे…!!
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबावर व्यक्तिगत पातळीवर, जहरी भाषेचा वापर करून, आर्थिक संदर्भ वापरतं विष पेरणी केली जाते आहे….!!
आंबेडकरी तरुणांनी आपसात भांडांव,आणि मनभेद करुन घ्यावे.कार्यकर्त्यांनी आपसात भांडांव आणि मनभेद करुन पक्षांतर करावं विचारवंत या संज्ञेखाली शिकलेल्या वर्गाने आपसात भांडांव.आणि संधीसाधू लोकांना हेरुन लालूच दाखवतं मध्यमवर्गीय आंबेडकरी समुहात बेकी व्हावी म्हणून प्रस्थापितांनी विषाची बाटली काही लोकांच्या हातात दिली आहे. असे स्पष्टपणे जाणवते आहे….!!
भावडांनो सावधान आपणं विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत…!!
मी निर्णय तुमच्या सदसदविवेकबुद्धी वर सोडतो.
आम्ही सुज्ञ असु तर भांडणार नाही. अज्ञानी असु तर तु तु मै मै करीत बसु….!!
आमच्या मध्ये राजकीय प्रगल्भता असेल तर आम्ही आंबेडकरी विचारधारेच्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करु, आणि संधीसाधू असु तर कुठंही भरकटू….!!
शिक्षित भावांनो आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा समजून घेतली असेल तर आंबेडकरी विचारवंत म्हणून योगदान देऊ, नाहीतर प्रस्थापितांची जी हुजुरी करु….!!
प्रस्थापितांनी विषाची बाटली आंबेडकरी समुहातील काही जणांच्या हातात दिली आहे. विष प्राशन करुन समाजाच्या ऐकीचा विध्वंस करायचा की,समाजाला सत्ताधारी जमात बनविण्यासाठी सहकार्य करायचे हे प्रत्येकाने ठरविण्याची वेळ आली आहे…!!
– भास्कर भोजने