• 25
  • 1 minute read

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी : राहुल डंबाळे

वेल्हे येथिल मशिदी वरील हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी

पुणे : वेल्हा तालुक्यातील साखर या गावांमधील वीस वर्षे जुन्या मशीदीची तोडफोड करून जाळपोळ केल्याप्रकरणी सर्व संबंधितांवर अटकेची कारवाई करून त्यांच्यावर कठोर कारवाऊ करावी अशी मागणी पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या शिष्टमंडळाद्वारे करण्यात आलेली आहे.

रविवार दिनांक 2 मार्च रोजी वेल्हे तालुक्यातील साखर गांव येथील मशिदीवर परिसरातील हिंदुत्ववादी जमावाने हल्ला चढविला आहे. हा हल्ला पूर्णतः सुनियोजित कटाचा भाग असून यामध्ये विविध गावांमधून तरुणांना भडकवून गोळा करण्यात आले होते व त्यांच्या मार्फत धार्मिक दंगल रमजानच्या कालावधीत घडवण्याची प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर प्रकरणी यामध्ये अधिक तपास होणे गरजेचे आहे असे मत यावेळी शिष्टमंडळाने व्यक्त केले.

दरम्यान यावेळी ” या हल्ल्यात जवळपास 30 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झाले असून आतापर्यंत वीस जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी विशेष तपास पथक रवाना करण्यात आलेली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असून यामध्ये कोणती हायवे न करता सर्व कारवाईखींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.” असे आश्वासन देशमुख यांनी शिष्टमंडळात दिले.

राज्य सरकारची फूस असल्याने अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने आता याप्रकरणी न्यायालयाने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे , मुलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार , माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , सादिक शेख यांनी व्यक्त केले.

सदरवेळी शहाबुद्दीन शेख , इब्राहीम यवतमाळवाला , सालार शेख इत्यादी शिष्टमंडळात सहभागी होते.

– राहुल डंबाळे

0Shares

Related post

पहलगाम हमले के बाद मोदी सरकार सवालों के घेरे मे, और देश की जनता धर्म, जाती भुलकर साथ साथ खडी….!

पहलगाम हमले के बाद मोदी सरकार सवालों के घेरे मे, और देश की जनता धर्म, जाती…

पहलगाम हमले के बाद मोदी सरकार सवालों के घेरे मे, और देश की जनता धर्म, जाती…
मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना मृत्यदंड…?

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना…

       मालेगाव बॉम्बस्फोट नुसती एका स्फोटाची घटना नाही, तर देशातील २० कोटी जनतेला देशविरोधी…
अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!      …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *