शहादा बसस्थानक आवरणातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. पावसामुळे संपूर्ण परिसरात चिखल आणि साचलेल्या पाण्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. खड्डे इतके वाढले आहेत की त्या खड्ड्यांत पाणी साचून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. महिला, वृद्ध, विद्यार्थी, लहान मुले यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कामासाठी निधी मंजूर झालेला असूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष हे नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करत असल्यासारखे वाटते.
तोपर्यंत तातडीचा उपाय म्हणून या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून पावसाळ्यातील त्रास कमी करण्याची गरज आहे. नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागू नये यासाठी ही प्राथमिक व्यवस्था तातडीने केली जावी, अशी आमची मागणी आहे.
संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदारीने पावले उचलावीत.