• 64
  • 1 minute read

शेजारी देशात रुजतेय जागतिक महासत्तांची विदेश नीती.

शेजारी देशात रुजतेय जागतिक महासत्तांची विदेश नीती.
                      काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानला मिळाले आणि दक्षिण एशियातील आपला शेजारी देश जागतिक पटलावर प्रमुख चर्चेत भूमिकेत आला.
 
दुसरीकडे या भागावर नव्याने विदेश नीतीची आखणी करणारा रशिया याने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिली. जगातील ज्या संघटनांवर रशिया बंदी घालायचा त्या यादीतून रशियाने तालिबानला वगळले आहे. तालिबानी शासनाला जागतिक स्तरावर मान्यता देणारा पहिला देश म्हणून रशिया ठरला आहे. युक्रेन सोबतचे रशियाचे सुरू असलेले युद्ध आणि शेजारी इराण मध्ये इस्त्रायली हल्ले नि त्याला अमेरिकेचा पाठिंबा या वळणावर रशियाने भू राजकारण खेळत अफगाणिस्तान जवळ केला आहे. 
 
यहूद्यांचे इजराइल आणि यहूदी तालावर चालणारी अमेरिका यांनी मिळून इराणवर हल्ले केल्यावर आणि हल्ले करून झाल्यावर शांततेचा प्रस्ताव पुढे करणाऱ्या अमेरिकेला इराण कडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. यात इराण सामरिक दृष्ट्या नुकसानीला सामोरे जात असला तरी अमेरिकेला  फारसा शरण गेलेला नाही हे  वर्तमानातले विशेष आहे. रशियन विदेश नीतीचा मैत्र कंगोरा असल्याने हे असे आहे.
 
तर थोडे त्यापलीकडे गेल्यावर काल अमेरिका आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांचे प्रमुख ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. त्यामध्ये रशियाने अमेरिकेला देखील ठणकावून सांगितले की  रशिया त्यांची युक्रेन मध्ये असलेली ध्येयासक्ती सोडणार नाही. 
 
आपल्या शेजारच्या देशांसोबत विदेशी महासत्तांचे परराष्ट्र धोरण शेजाऱ्यांना काबीज करणारे आणि बळ देणारे ठरत असताना भारत मात्र शेजाऱ्यांपासून तुटत चाललेला आहे की आत्मनिर्भर हे विदेश नीतीचे अभ्यासक जाणो नि विदेश धोरणी. आपण फक्त माध्यमातून प्रचाराच्या बातम्या ऐकायच्या.
 
आर एस खनके.
 
0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *