आम्ही सगळे पुरोगामी लोक संघावर टीका करतो आणि मोकळे होतो. संघाची नेमकी काय चाल असते? ते बोलतात त्यात काय सुचकता असते? संघ खरेच फक्त सांस्कृतिक संघटन आहे का? या सगळ्या प्रश्नांच्या खोलात आम्ही कधी जातच नाही. म्हणून आम्हाला संघ आणि संघाची चाल समजत नाही.
काल मोदी सरकारने सरकारी कर्मचारी, अधिकारी संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात अशा स्वरूपाचे वक्तव्य केले. त्यासाठी त्यांनी १९६६ पासून संघाविषयी जी नियमावली होती ती निरस्त केली.म्हणजे आता कोणताही सरकार कर्मचारी संघात जाऊ शकतो. याचा अर्थ फोर मोठा आहे. हा कर्मचारी / अधिकारी संघाला आर्थिकदृष्ट्या भक्कम करणारा आहे. म्हणून संघ आता पूर्वीपेक्षा बलवान होणार आहे.
बरेच वेळा आंबेडकरी कार्यकर्त्याला वाटते की संघ माझे काहीही वाईट करू शकत नाही.कारण संघ आमचा शत्रू नाही.संघ मुसलमान आणि ख्रिस्ती धर्माचा शत्रू आहे. हा भ्रम आहे. संघ आणि संघ विचाराचे लोक यांचा सर्वात मोठे शत्रू कोण असतील तर ते आहेत “डॉ बाबासाहेब आंबेडकर” आणि त्यांच्या विचारावर होणाऱ्या चळवळी. कारण बाबासाहेबांच्या धर्मशास्त्रीय चिकित्सेमुळे हिंदू धार्मिकतेला जो धक्का बसला, जे नुकसान झाले ते दुसऱ्या कोणत्याही विचारांमुळे इतके झाले नाही असे संघवाले मानतात. आणि ते खरे पण आहे. बाबासाहेबांच्या संविधानाने साडेतीन हजार वर्षाची परंपरा नष्ट केली. ( अनुच्छेद १३ पहा)
फक्त संघ आपला रोष दाखवत नाही. म्हणून संघाचा पहिला हल्ला आहे तो संविधानावर! प्रथम ते संविधान निरस्त करतील आणि नंतर ते त्यांचे संविधान लागू करतील. ३० नोव्हेंबर १९४९ रोजी संघाचे मुखपत्र Organizer या साप्ताहिकात गोळवलकरांनी अग्रलेख लिहून म्हटले होती की आम्हाला ही राज्यघटना मान्य नाही. त्यापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे. मोहन भागवत म्हणतात की दलितांचे आरक्षण कायम राहावे. हे त्यांचे विधान नाही. ते माजी सरसंघचालक देवरसांचे पुण्यातील भाषणातील विधान आहे. परंतु तेच देवरस पुढे म्हणातात की आरक्षणाचा पुनर्विचार झाला पाहिजे. खरेच संघ समजून घ्यायचा असेल तर खालील पुस्तक जरूर वाचा.