- 25
- 2 minutes read
संत तुकाराम महाराजांचा वयाच्या 42 व्या इतक्या तरुण वयात मृत्यू कसा झाला ?
एखाद्या व्यक्तीच्या मोठेपणाचे मूल्यमापन करायचे असेल, तर व्यक्ती जगली कशी हे पाहणे जसे महत्त्वाचे असते, तसेच ती व्यक्ती मृत्यूला सामोरी कशी गेली, हे पाहणेही आवश्यक असते. संत तुकारामांना वयाच्या केवळ बेचाळिसाव्या वर्षी गूढ अशा मृत्यूला सामोर जावे लागले.
“अंतकाळीं विठो आम्हांसी पावला |
कुडिसहीत जाला गुप्त तुका” ||
कुडिसहीत गुप्त झाला याचा अर्थ गुप्त होण्याची क्रिया पूर्ण झाली आहे. तुकाराम महाराज जर हे सांगत असतील तर ते गुप्त झाले असं होत नाही. आणि गुप्त झाल्यावर तुकाराम महाराज मी गुप्त झालो असं कसं सांगतील? याचा अर्थ असा होतो की तुकाराम महाराज कुडीसकट गुप्त झाल्यावर त्यांनी हा अभंग लिहिला आहे. गुप्त झाल्यावर ते अभंग कसा लिहू शकतील? जितका विचार करावा तितका हा गुंता वाढतच जातो. भक्तांचं एक बरं असतं, ते चिकित्सा न करता जे सांगितलं जातं त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात पण असं करणं, “सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमता ।।” म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांच्या खऱ्या वारसांना शक्य होत नाही. ते सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. सत्याचा पाठपुरावा करतात. म्हणून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले या विधानाचा विचार करावा लागतो.
वैकुंठ म्हणजे काय?
वैदिक मान्यता अशी आहे की आयुष्याची दोरी तुटली म्हणजे माणसाचा देह जो मातीचा असतो तो मातीत मिसळतो आणि आत्मा मुक्त होऊन स्वर्गात किंवा नरकात जातो. तिथे आपलं कर्मफल भोगल्यावर पुन्हा चौऱ्यांशीच्या फेऱ्यात अडकतो. जर पुण्यात्मा असेल तर त्याला मुक्ती मिळते आणि आत्मा परमात्म्यात विलिन होऊन जातो. पण वारकऱ्यांनी स्वर्ग नाकारला आहे तुकाराम महाराज तर स्पष्ट शब्दात सांगतात, “येथे मिळतो दहीभात |
स्वर्गी ते नाही मात ||”
मेल्यावर स्वर्गात गेलो तरी पुण्य संपल्यावर स्वर्गातून बाहेर ढकलून देतात. असा अशाश्वत स्वर्ग कशाला हवा? असा तुकाराम महाराजांचा प्रश्न आहे. “ब्रह्मादिक पदे दु:खाची शिराणी ।” असल्याने तिथे माझं मन गुंतू देऊ नको असं तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज जसा स्वर्ग नाकारतात तशीच मुक्तीही नाकारतात
“सांडुनी सुखाचा वाटा |
मुक्ती मागे तो करंटा ||”
असं म्हणून तुकाराम महाराज थांबत नाहीत तर
“का रे ना घ्यावा जन्म |
प्रेम लुटावे नाव ||”
असा प्रश्न विचारतात. आम्हाला मुक्तीचं कौतुक नाही, ती तर आमच्या गांठोळीला आहे असं सांगून पुढे जाऊन
“तुका म्हणे आता मज |
न लगे सायुज्जता ||”
इतक्या स्पष्ट शब्दात मुक्ती नको, मोक्ष नको, सायुज्जता नको असं सांगतात. सायुज्जता का नको? कारण एकदा त्या परमात्म्यात विलिन झाल्यावर भक्तीप्रेमसुखाचा अनुभव घेता येत नाही. उलट मी कीर्तनात असा रंग भरीन की स्वर्गस्थ असेल त्याला स्वर्गवास कडू वाटेल आणी जो मुक्त झाला आहे त्याला मुक्ती सोडून पुन्हा जन्म घ्यावा वाटेल. असंख्य अभंगातून तुकाराम महाराज मुक्ती, स्वर्ग, वैकुंठ नाकारतात आणि भक्ती प्रेमरसाचा आनंद घेण्यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घाल अशी पांडुरंगाला विनवणी करतात, हे जर सत्य असेल तर मग ते वैकुंठाला जातील कसे?
संत तुकाराम महाराज सांगतात. हे काल जितकं सत्य होतं तितकंच आज सत्य आहे आणि उद्याही ते तितकंच सत्य असेल तुकाराम महाराज जीवनाचा किती सूक्ष्म पातळीवर विचार करतात त्याची झलकच प्रत्येक अभंगातून पहायला मिळते. बाप जसा आपल्या लेकराला पावला पावलावर सावधतेचा इशारा देत असतो तसा हा तुमचा माझा सर्वांचा बाप आपल्या हजारो अभंगातून आपल्याला सतत सावध करत आहे. हे अनुभवाचे बोल आहेत. हे प्रज्ञावंतांचे बोल आहेत. हे एका दृष्ट्याचे बोल आहेत. ज्याने सर्वसामान्यांविषयी असलेल्या अतिव कळवळ्यापोटी प्राणावर उदार होऊन एका क्रूर व्यवस्थेविरुद्ध एकट्याने निकराने लढा दिला अशा महामानवाचे हे बोल आहे म्हणून आपण ते समजावून घेतले पाहिजेत. नव्या पिढीपर्यंत पोचवले पाहिजेत. तुकोबारायांनी जो मार्ग प्रकाशित केला त्या मार्गावरुन वाटचाल केली पाहिजे. तुकोबारायांच्या छायेत जो गारठलेला आहे त्यासाठी ऊब आहे. जो तापलेला आहे त्याच्यासाठी शीतलताही आहे. मार्ग चुकलेल्याला दिशादर्शन आहे. भयभीत झालेल्याला आश्वासन आहे. संकटाने घेरलेल्याला संरक्षण आहे. म्हणून हे अभंग घराघरात, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचले पाहिजेत, पोचवले पाहिजेत. तुकाराम महाराजांच्या पितृऋणातून अंशतः मुक्त होण्याचा हाच एक मार्ग आहे………..
धुळवडीच्या दिवशी तुकाराम महाराज आपल्यातून गेले, आपल्याला सोडून गेले. आपण तुकोबांना कायमचं अंतरलं. या दु:खाने धरणी फाटावी इतकं दु:ख त्यांच्या कुटुंबियांना झालं. “शोके मेदीनी फुटो पाहे” अशा शब्दांत ते व्यक्त झालं. हा दिवस सणाचा नाही. आनंदाचा तर मुळीच नाही. हा दु:खाचा दिवस आहे, परमदु:खाचा दिवस आहे. ह्रदयाला यातना देणारा दिवस आहे. यादिवशी आपण गंभीर झालं पाहिजे. तुकाराम महाराजांनी हयातभर आपल्यासाठी जो संघर्ष केला, जो छळ सोसला, ज्या यातना सहन केल्या, त्यांचं स्मरण करुन तुकाराम महाराजांना आदरांजली वाहून त्यांचा विचार सर्वदूर पसरवण्याचा, त्याचं अपूर्ण कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी संकल्पबद्ध होण्याचा, त्याचं अधुरं स्वप्न साकार करण्याची प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस आहे. तुकोबांच्या वारसांना ज्या क्षणी याचं भान येईल तो क्षण म्हणजे परिवर्तनाची सुरुवात असेल.
( संदर्भ: – उल्हास पाटील,गाथा परिवार)
डॉ आ ह साळुंखे “विद्रोही तुकाराम” पुस्तकातील “परिशिष्ट” मध्ये आपले मनोगत व्यक्त करताना सांगतात की !!
तुकाराम सदेह स्वर्गाला गेले असल्यामुळे मृत्यू नंतर केले जाणारे विधी त्याच्यासाठी करण्याचा प्रश्न नाही, त्यांचे आशौच वा सुतक पाळण्याची गरज नाही, असे रामेश्वरभटांनी कान्होबांना सांगितले, असे म्हणतात.
पण रामेश्वरभटांच्या डोक्यात काही वेगळा विचार,धर्मशास्त्रांचे काही वेगळे नियम असण्याची शक्यता आहे, असे मला वाटते.
गौतमधर्म- सूत्रामध्ये आलेला एक नियम (२.५.८) गो’ब्राम्हणहतानामन्वक्षम’ असा आहे. अर्थात ‘गाय आणि ब्राह्मण यांनी ज्याला मारले असेल, त्याच्या नातेवाईकांचे सुतक त्याच्या मृत्यू नंतर ताबोडतोब फिटते’, असा या सूत्राचा अर्थ आहे.
यानंतरच्या एका सूत्रावर (२.५.११) टीका लिहिताना हरदत्त नावाच्या लेखकाने मिताक्षरा नावाच्या वृत्तीमध्ये ब्रम्हपुराणातील पुढिल श्लोक उद्धृत केले आहेत.
ब्रम्हदण्डहताये च ये चैव ब्राह्मणैर्हताः।
महापातकिनो ये च पतितास्ते प्रकीर्तिताः।।
पतितानां न दाहःस्यान्न च स्यादस्थिसंचय।
न चाश्रूपाताः पिण्डो वा कार्या श्राद्धक्रिया न च।।
या श्लोकाचा अर्थ असा…
जे ब्राह्मणांच्या काठीने मारले गेले असतील, ज्यांची ब्राह्मणा कडून हत्या झालेली असेल आणि जे महापातकी असतील ते पतित म्हटले जातात. अशा पतित लोकांचे दहन करू नये. त्याचा अस्थिसंचय करू नये.(म्हणजे तिसर्या दिवशी त्याच्या अस्थी गोळा करून त्याचे विसर्जन करण्याचा विधी करू नये) त्याच्यासाठी आश्रू ढाळू नयेत. त्यांना पिंड अर्पण करू नये वा त्यांच्यासाठी श्राद्धक्रियाही करू नये.
ब्राह्मणांनी ज्याची हत्या केली असेल, त्याच्या नातेवाईकांनी त्याच्यासाठी अश्रू ढाळायचे नाही, मग त्याच्यासाठी धार्मिक विधी करण्याचा तर प्रश्नच उदभवत नाही, असे सांगणार्या या नियमाच्या क्रूरपणावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. ब्राह्मणाचे वैर ओढवून घेणार्या माणसाच्या नातेवाईकांनी त्याच्या जिवंतपणीही आणि मृत्यू नंतरही त्याच्या बरोबरीचे आपले रक्ताचे नातेही नाकारावे, असे हा नियम सुचवितो.
रामेश्वरभटांनी तुकारामांच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी काही ही विधी करू नये, असे कान्होबाला सांगितले, तेव्हा भटाचे शब्द कोणतेही असोत, रामेश्वरभटांच्या मनात मात्र धर्मशास्त्राचा हा नियम असण्याची शक्यता आहे असे दिसते.
संत तुकारामांबद्दलचा आदरभाव, श्रद्धा, भक्ती म्हणून आपण त्यांच्या खुनाला वैकुंठगमन म्हणायचं का? आणि त्यांचा खून करणार्या पाप्यांना शुद्धीपत्र बहाल करायचं का?
संत तुकारामांसाठी वैकुंठाहून विमान येते आणि त्यांना घेऊन जाते. ही घटना आपल्याला आजही खरी वाटत असेल तर आपल्याइतके मूर्ख आपणच असेच म्हणावे लागेल.
प्रश्न हा आहे की,
○ जर संत तुकारामाचा धर्म हिन्दू आणि वैदिक ब्राह्मणांचा धर्म ही हिन्दू, तर एका हिन्दू ब्राह्मणाने दुसर्या हिन्दूच्या धार्मिक आधिकारावर बंदी का घातली ?
○ संत तुकाराम कुनबी होते (OBC) होते अर्थात शुद्र होते ह्या कारणाने जर वैदिक ब्राम्हणाने संत तुकारामांचा धार्मिक अधिकार नाकारला असेल तर,
वैदिक-ब्राम्हणाचा आणि शुद्र हिंदू OBC चां धर्म एक आहे का?
कारण
○ जर वैदिक ब्राह्मणांचा व शुद्र हिंदुचा धर्म एक असता तर संत तुकारामाच्या हत्ये च्या आधी संत चोखा मेळ्याची हत्या झाली असती का? संत चोखा मेळ्याच्या आधी संत रविदास आणि संत कबीराची धार्मिक हत्या झाली असती का ?
तेव्हा बहुजन OBC जागे व्हा ! आणि सदसदविवेक बुद्धीने विचार करा !!
○ हिंदूना धार्मिक गुलाम बनविणार्या वैदिक ब्राह्मणी पंडिताच्या असमानतेच्या धार्मिक दहसतवादाला शुद्र हिंदू OBCने आजही पवित्र मानायचे का ?
○ वैदिक पंडित ब्राह्मणांच्या अनैतिक संस्काराला आम्ही हिंदूनी शुद्र अतिशुद्रांनी अर्थात SC ST व OBC ने आजही नैतिकतेचा आधार मानायचं काय ?
○ वैदिक पंडित ब्राह्मणानी त्याची संस्कार आणि संस्कृति आज ही शुद्र अतिशुद्रांना नाकारली आहे, ती संस्कार संस्कृती SC ST OBC शुद्र- अतिशुद्र हिंदूनी आपलीच आहे असे मानायचं का ?
आमच्या बहुजन महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुति देऊन वैदिक ब्राह्मणशाहीला ज्या प्रश्नांची अव्हाने उभे केली ते प्रश्न
आमच्या महापुरुषांनी विचारलेले प्रश्न, SC ST OBC अर्थात हिंदूबहुजन हे प्रश्न वैदिक ब्राह्मण पंडिताना कधि विचारणार आहे का नाही?
✍🏻 संग्रहीत mn sonawane pune