सामाजिक 241 minute read संयम ( मनुस्मृती जाळण्याच्या अतिरेकी ओघात बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्याने उद्भवलेल्या सध्यःस्थितीवर बौध्दांसाठी खास ) 3waysmediadmin February 2, 2024 Post Views: 48 भडकू नको, अडकू नको,संयम तु ठेव गड्या,चतुर तुझा वैरी रे,डाव त्याचे जाण गड्या…वैरी तुझा आग लावी,त्यात तुला झोकी गड्या,सवे तुझ्या रडे तो ही,खरे खोटे जाण गड्या, रात्रच नाही, दिवसही,वैऱ्याचा आहे गड्या, भडकू नको, अडकू नको,संयम तू ठेव गड्या…बरी नाही उग्र भावना,घाल तया आवर गड्या,हाणून पाड दुष्ट डाव,फसू नको त्यात गड्या,नको कलह अंतरी,शुध्द तर्क लाव गड्या,भडकू नको, अडकू नको,संयम तु ठेव गड्या….येती जाती वादळे जीवनी,क्षणिकचे सारे गड्या,गैर ओंजळ कुचकामी,भले नाही त्यात गड्या,भीम-बुध्दाचा वारस तु,ताठ उभा रहा गड्या,भडकू नको, अडकू नको,संयम तु ठेव गड्या…कवीः प्रकाश डबरासे (३० मे २०२४) Facebook 0 WhatsApp Messenger Twitter 0 Print 0Shares