- 147
- 1 minute read
संसद से सडकतक देशभर केवल जयभीम, जय संविधान अन डॉ. आंबेडकर जय हो के नारे गुंज रहे है….!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 128
संसद से सडकतक देशभर केवल जयभीम, जय संविधान अन डॉ. आंबेडकर जय हो के नारे गुंज रहे है....!
मनुस्मृतीच्या कायद्यावर चालणारे हिंदू म्हणजे ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून डॉ. केशव बळीराम हेगडेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून दोन वर्ष ही उलटत नाहीत, तोच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड मुक्कामी मनस्मृतीचे सार्वजनिकरित्या दहन केले. ही घटना इतकी प्रभावी अन ऐतिहासिक आहे की, या घटनेनंतर ज्या कुणी मनुस्मृतीचे समर्थन केले त्यास ठेचून काढण्यात आले. मनुस्मृतीचे साधे नाव ही घेणाऱ्या सर्व शक्तींना गेल्या शतकभर ठेचून काढण्यात येत आहे. संघ, भाजप व परिवारातील शेकडो संघटनांना , जगभर पसरलेल्या अंधभक्तांना ब्राह्मणी राष्ट्र हवे आहे. पण ब्राह्मणी राष्ट्राची मागणी करण्याची त्यांच्यात हिंम्मत नाही. त्यास ते हिंदू राष्ट्र म्हणतात. त्यांना ब्राह्मणी वर्चस्व असणारी धर्म व्यवस्था हवी आहे, पण त्यास ते हिंदुत्व म्हणतात. ही जी लपवाछपवी आहे, तीच संघ व सावरकर यांनी या देशातील हिंदूंच्या विरोधात रचलेल्या कट- कारस्थानाचा भाग आहे. हे ही आता लपून राहिलेले नाही. हा कट यशस्वी करण्यासाठी संघ, भाजप जितका जोराचा प्रयत्न करतो, तितके ते तोंडघशी पडत आहेत.
25 सप्टेंबर 1925 रोजी ब्राह्मणी राष्ट्राच्या निर्मितीसाठी स्थापन झालेल्या संघाला काही दिवसात 100 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यानंतर 25 डिसेंबर 1927 झालेल्या मनुस्मृती दहन या ऐतिहासिक घटनेला आणखी दोन वर्षांनी 100 वर्ष पूर्ण होतील. अन यापेक्षाही महत्वाचे म्हणजे यंदाचे वर्ष संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने देशाच्या संसदेत झालेल्या चर्चेच्या वेळी देशाचा तडीपार गृहमंत्री अमित शहाने संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या अवमान व अपमानकारक विधानामुळे सर्व देश या फॅसिस्ट सत्तेच्या विरोधात पेटून उठला असून त्याने सडक से संसदतक हंगामा खडा किया है. देश के सडके हो या संसद…. केवल जयभीम, जय संविधान और डॉ. आंबेडकर के ही नारे लग रहे है.
संघाच्या स्थापनेनंतर दोनच वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. इथल्या धर्म व्यवस्थेला गाडून अन जाळून टाकण्याचा हा पहिला ऐतिहासिक प्रयत्न होता. या अगोदर ही असे प्रयत्न झाले होतेच. पण सरळ आव्हान उभे करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळेच तो ऐतिहासिक होता. यातून आजपर्यंत या फॅसिस्ट शक्ती सावरलेल्या नाहीत. ना सावरू शकत. ही ऐतिहासिक कृति करताना या देशाचे धर्मनिरपेक्ष संविधान आपल्याकडूनच लिहिले जाईल. देश चालविणाऱ्या संविधानाच्या संविधानाचे शिल्पकार आपणच असू याची पुसटची कल्पना ही त्यावेळी डॉ. आंबेडकर यांना नव्हती. पण या फॅसिस्ट शक्तीचे दुर्दैव आहे की, धर्म व्यवस्थेला संविधानाच्या माध्यमातून गाडण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. आंबेडकर यांच्याच हाती आले. अन त्यांनी या संधीचा फायदा उचलत ही धर्म व्यवस्था पुन्हा एकदा गाडून, जाळून टाकली. त्यातून या देशविरोधी शक्ती आजपर्यंत सावरू शकल्या नाहीत. हे वास्तविक सत्य आहे. अमित शहाचे आंबेडकर यांच्या संदर्भातील विधान त्याच खडखदीतून बाहेर पडले आहे. जगभरातील विद्यापीठाच्या 32 पदव्या अन डझनभर भाषांवर प्रभूत्व असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी असे अवमानकारक भाष्य करणे एका तडीपारच्या तोंडून शोभत नाही.
संघ परिवार व भाजपच्या विरोधानंतर संविधान हा राष्ट्रीय मुद्दा तर झाला आहेच. पण त्या ही पेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे समाजकारण व राजकारण हा राष्ट्रीय पातळीवरील मुद्दा झाला आहे. याची तोड व यास सामोरे जाण्यासाठी या फॅसिस्ट शक्तींच्या हाती काहीच नाही. मेंदूची नसबंदी झालेल्या करोडो अंधभक्तांची फौज संघाकडे आहे. फेकू अन जुमलेबाज मोदी त्यांना स्वतःचा बाप वाटतो. देशाची सार्वजनिक संपत्ती विकून व लुटून या शक्तीकडे धन आहे. त्या धनाच्या जोरावर त्यांनी देशातील मिडिया विकत घेतला आहे. न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग, ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणा त्यांच्या गुलाम झाल्या आहेत. सत्तेमुळे काहीही विकण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. पण राष्ट्र प्रेम, अन राष्ट्रीय अस्मितेचा भाग असणारी जी – जी प्रतिक अन प्रतिमा आहेत, त्या प्रतिक व प्रतिमांवर निष्ठा असणारी जनता त्यांच्याकडे नाही. हे वेळोवेळी स्पष्ट झाल्याने संघाची शंभरी साजरी करण्याच्या पूर्व संध्येला ते वैफलैग्रस्त झाले आहेत. ते स्वाभाविक आहे.
इंडिया, भारत म्हणजेच डॉ. आंबेडकर व डॉ. आंबेडकर म्हणजेच इंडिया, भारत हे राष्ट्र, असा अर्थ आज झाला आहे. मी प्रथम भारतीय व नंतर ही भारतीय, असे आंबेडकर यांनी स्वतःच म्हटले आहे.
………..
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
0Shares