- 38
- 1 minute read
सम काळातील समाज विघटनाची घंटा वाजते आहे.
समाज बंधू भावाची वास्तविकता ही काल्पनिकता आहे का?नव्या विचार नात्याच्या निर्माणच्या अनुभवातील ही अस्तित्व शून्यताआहे. हे विधान मान्य केले जाणार नाही परंतु वास्तवता हे याचे प्रमाण आहे अशी अनेक आदर्श मूल्यात्मक नाती तयार करण्याची उद्दिष्ट प्रत्येक समूह आणि व्यक्ती ठेवत असतो. ही विधायक मानसिकता समाजनिर्माणच्या निरंतर प्रवासात चालू असते. समकालातील सामाजिक यथार्थता हा एक अदृश्य आणि अस्वस्थ असा प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्ती आणि समाज जीवनाला तो भेडसावतो आहे. सामाजिकता कशी आहे ?समकाल कसा आहे? ती यथार्थता घडते आहे किंवा नाही? ती विघटनाच्या दिशेने चालली आहे की नाही? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक व्यक्तीने मिळवण्याचा प्रयत्न केला तर पुढील प्रकारचे निरीक्षण त्यांच्या हाती निश्चित येईल.
समकाल ऐक्याचा का विघटनाचा आहे? समकालाच्या विघटनाचा वेग वाढला आहे का? ही निरंतर प्रक्रिया चालूच असते पण प्रत्येक माणूस याला ऐक्य याचे परिमाण देण्याचा प्रयत्न करतो ही योग्यच वृती असते. समाज संघटन निर्माण भावनेच्या या दिशेने समाज आधार चालत राहतो. सामाजिक ऐक्य आणि सामाजिक संघटन याच्या साठी प्रचलित असलेल्या जाणिवा आणि नेनिवा जात आणि धर्म एवढ्याच त्यावेळी त्या कार्यरत राहतात. या माणसांना जोडून ठेवतात हे पूर्ण खरे नाही ही एक आंतरिक कृतक भावना असते पण यावरही समाजाचा खूप मोठा विश्वास असतो .जे वास्तवात नसते त्यावर समाजाचा विश्वास असतो आणि त्याच्यातून सामाजिक यथार्थता संघटनशीलता वाढत राहते असे समाज स्वतःच गृहीत धरून वाटचाल करीत असतो. याची अनुभूती ही त्याच धर्म वर्ण व्यक्तींना, व्यवस्थेला आणि जातींना प्राप्त होते.
समका ळ हा तुच्छतेचा आहे. समकाळ हा अविश्वास वाढवणार आहे .नफरत आणि द्वेष ही समकाळांनी दिलेली मोठी कु देणगी आहे. प्रत्येक व्यक्ती आणि समूहाच्या मनात हे विकार मोठ्या वेगाने वाढत आहेत. तरीही समाज दृश्यार्थाने ऐक्याचा बहाणा करीत वर्तन करीत आहे. हा समकाळ समाज. अस्वस्थ विघटन करणारा असाच आहे. यात पुरेपूर द्वेष ,पुरेपूर अविश्वास, पुरेपूर मत्सर हा वाढत चाललेला आहे .त्यामुळे समकाळ हा यथार्थ ऐक्याचा निर्माण होईल असे मानणे ही मोठी सार्वजनिक फसवणूक आहे पण सार्वजनिक फसवणूक हाच जेव्हा सर्व समाजाचा नित्य वर्तन भाव बनतो. तेव्हा सार्वजनिक यथार्थता ही असंभव अशक्य अशी सामाजिक वर्तन बाब बनते .आज भारतात सर्व ठिकाणी हे वास्तव निर्माण होत चालले आहे. कृतीतील अलिप्तता, कृतीतील गोपनीयता ,आणि वर्ण जात व्यवस्थेतील धर्म समर्थकांच्या साथीतील उन्माद वर्तन हीच सार्थकता आहे हे जेव्हा वास्तव बनते तेव्हा समाज विघटनाची प्रक्रिया वेगाने पुढे चालते असे मानावे लागेल. आज ऐक्याचे कुणालाच पडले नाही. सामाजिक गरजांसाठी आर्थिक व्यवहारासाठी परावलंबी असलेला समाज आणि त्या हितसंबंधासाठी सतत विचार करणारा समाज ही समाजाची तकलादु अवस्था ही आहे. समकाळातील मन विषण्ण यथार्थता सर्वत्र दिसून येते आहे. या यथार्थ समाज अवस्थेत विचारसरणी शून्यता, शत्रुभाव, लहरी स्वयंवर्तन, अंधभक्ती, टोकाचे शत्रुत्व हे नवे दुष्ट वर्तन समाजाने स्वीकारले आहे. अशा या समाजाला एकमेकाचीफसवणूक ही महत्त्वाची वाटते. असा समकाळातील फसवणुकीचा सार्वत्रिक प्रसार आणि फसवणुकीची यशस्विता महत्त्वाची वाटते. त्या समाजाचे अंतिम विघटन जवळ आले आहे. विघटन ही तुटलेली अवस्था असते पण हे तुटणे विश्वास, सहकार्य, आधार, सहयोग ही सर्व आंतरिक ऊर्जा समाज जेव्हा स्वतःच एकमेकाबद्दल नष्ट करत असतो .तेव्हा त्या समाजाच्या एकात्म ऐक्याच्या जात जात धर्म धर्म यांच्या पलीकडे जाऊन समाजबांधणीचा प्रयोग कधीच यशस्वी होणार नसतो पण तरीही सामाजिक हितसंबंधाची वर्चस्व उतरंड ही समाजाला समकाळातील ऐक्याची यथार्थता हे सांगत असतात. त्याचे आदर्श कथन करत असतात आणि दुसऱ्या पातळीवर समकाळातील सामाजिक विघटनाची प्रक्रिया आंतरिक वर्तन प्रक्रियेतून ते मोठ्या प्रमाणात करत असतात हे सर्व जाती सर्व धर्म सर्व समाज गट यांच्याबाबत आंतरिक वर्तन खूप मोठ्या प्रमाणात हे चालू आहे ही निरीक्षणाची बाब नाही अनुभूतीचा हा आलेला निष्कर्ष आहे ज्या समाजाला आंतरिक आसक्ती नाही ज्या समाजाला समाज निर्माणची ओढ नाही नव्या मूल्य निर्माणच्या स्वप्नाच्या दिशेने चालण्याची इच्छाशक्ती नाही समाज नावाची निरंतर आदर्श घडणारी एक व्यवस्था असते ती सर्वांनी तयार करायचे असते त्यात जुने रुढीबंध नष्ट करावयाचे असतात आणि आधुनिक मानवी सभ्यतेची सर्व मूल्य ही वर्तन करून सार्वत्रिक प्रयत्नाने सिद्ध करावयाचे असतात. हे भान नसलेला समाज समकाळात मोठ्या प्रमाणात वाढतो आहे फक्त शत्रुत्व फक्त छळ फक्त उपयोग त्यानंतर तूच्छता त्यानंतर अलिप्तता असा वर्तन भाव सभोवताला आढळून येतो .असा समाज कळत असूनही आपोआपवादाच्या दुष्परिणामाकडे स्वतः चालत निघालेला असल्याचा अनुभव आता येतो आहे. भारतीय समाजाचे हे सर्व सामर्थ्य प्रभुत्ववादी वेगळ्या पद्धतीने सांगत असतात स्वतंत्रता अलिप्तता आणि एकात्मता हे सर्व समाजांतर्गत द्वंद्व वर्तन आहे.
भारतीय समकाळ हा असत्य आणि तुच्छता द्वेष आणि मस्सर यांच्या आधारे नैराश्य आणि निराधार्था या दिशेने पुढे निघाला आहे .असा भारतीय यथार्थ समकाळा हा सत्याच्या बाजूने शोषणाच्या विरुद्ध संविधान रक्षणाच्या विवेकी वर्तनाने पुढे चालत राहील. असा गृहीत वेडेपणा ही अंडर करंट ची बाबअसू शकते. अंडर करंट हा कळतोच असे नाही. समाजाचे बहुसंख्यांक मत हे जेव्हा दहशतवादाकडे जाते .त्याचा आधार घेते आणि दुबळ्या समाज वर्ण धर्म जाती यांना ते सतत भयग्रस्त करते तेव्हा समकाळातील सामाजिक ऐक्याची यथार्थता ही गोष्ट साकारणे वर्तनात सिद्ध करून दाखवणे हे थांबलेले असते याबद्दल सार्वत्रिक अनास्था वाढत असलेल्या आढळून येते.
शोषण प्रचंड भ्रष्टाचार जातीय अत्याचार टोकाची विषमता हे या समाजाचे वर्तमानकालीन जगण्याचे आधार आहेत. ती उद्दिष्टे आहेत त्यानुसार वाटचाल करणारे अनेक यशस्वी झाल्याचा दावा करत आहेत असा समाज सामाजिक विघटनाचा शूर प्रारंभिक इतिहास तील घटक ठरतो आणि भारतीय समाजाचे आजचे वर्तन हे या दिशेने मोठ्या प्रमाणात चालू आहे. हे मान्य न करणे म्हणजे प्रभुत्ववाद्यांच्या वर्चस्वाखाली आपली अभिव्यक्ती आपल्या आवाज स्वतःहूनबंद करून टाकणे. वर्चस्ववादी ही गोष्ट फार भयंकर गुंतागुंतीची आणि त्रासदायक आहे. इथले वर्चस्ववादी जीवनाच्या सर्व क्षेत्रात ठाण मांडून आहेत .त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांची मते ,त्यांची चिंतने ,त्यांचे विश्लेषण हे शोषित समाजाचे विश्वासाचे आधार जेव्हा होतात तेव्हा फसवणुकीचा समकाळ वेगाने लवकर जवळ येत असतो. भारतामध्ये जातीची ,धर्माची,हिंदुत्वची घंटा सर्व वर्चस्ववादी वाजवत आहेत त्यामुळे विघटनाचा आवाज सर्व दूर पोहोचत चालला आहे. ज्या समाजाला गुलामीची कारणे समजून घेण्याची गरज वाटत नाही. आपल्या शोषणची कारणे तपासणीची इच्छा नाही. आपल्या रूढी आणि परंपरेची प्रियता ही जगण्यापेक्षा श्रेष्ठ वाटते प्राप्त इ हवाद आणि अस्तित्वत वाद ही मानवी जीवनाची वर्तमान अवस्था आनंद साठी आणि नव्या विचाराच्या निर्माण साठी सतत आवश्यक असते हे ज्या समाजाला समजून घेण्याची इच्छाशक्ती नाही .असा समाज विघटनाच्या वाटेने वेगाने सर्वांना घेऊन चालू लागतो आणि त्याला विषमतेची वारी शोषणाची वारी तुच्छतेची वारी विघटनाची वारी अशी अवस्था हा समाज प्राप्त करून देत असतो आज हे चालू आहे. ज्ञाती वर्चस्व हा बहुसंख्यांक जातींचा नवा आदर्श निर्माण होतो आहे. ते त्यांच्या जीवनाचे जगण्याचे नव्हे आशा स्थान मुक्तिस्थान आणि अंतिम उपाय त्यातच आहे. अशी मानसिकता सर्वदूरपोचली आहे. ज्या समाजाला आधुनिकतेची तंत्रज्ञानाची उपयुक्तताच फक्त महत्त्वाची वाटते तो आधुनिकतेचा वैश्विक दृष्टिकोन विचारसरणीची स्वीकार वृत्ती तुच्छ वाटते .तो समाज हा सनातन वाटाच पुन्हा पुन्हा चालू लागतो हे भारताचे वर्तमान वास्तव आहे. समकाळ आणि वर्तमान यात आंतर असते पण वर्तमान हा खूप तपासता येतो समकाळ ठरवावा लागतो त्याच्या अवस्था निश्चित करावे लागतात वर्तमानात धर्मशाही वर्णशाही राजशाही आणि त्यातून धन्यता प्राप्त येणारी गुलामी ही हवी आहे .स्वतंत्रता स्वतःस हवी आहे. पण सर्व अन्य शोषित जनजातींना स्वतंत्रता मिळाल्यास आपले प्रभुत्व नष्ट होते. आपला सरंजामी अवशेष नष्ट होतो .या भीतीने ग्रासलेल्या वर्तमानातील प्रभुत्व वर्ग हा आपला मुक्ती दाता आहे. असाही मानणारा शोषित समाज हे सम काळातील व्यापक प्रमाणातील दृश्य दिसून येत आहे आणि म्हणून समकाळा हा भय्यकाळ आहे समकाळ हा आ त्याचार काळ समकाळ हा विघटन काळ आहे. सम काळ हा इतिहासाच्या प्राचीन वाटा च्या दिशेने वेगाने सर्व समाजाला मागे ढकलत आहे
एकूणच समाजाची समकाळातील यथार्थता ही भयरस्त अवस्थेतील विवेकशीलतता अशी असायला हवी ही जर वाढली नाही ही जर वर्तनच सिद्ध झाली नाही तर मात्र समाज विघटन आणि शोषित समाज हे वास्तू आता निर्माण होणे जवळ आले आहे समाज निर्माणच्या अवस्थेत पोहोचण्यापूर्वीच या समाजाचा अधपाताचा काळ जवळ आला आहे या समाजाला विचाराचे देणेघेणे नाही विचार हे जीवन असते विचार हे निर्माण असतात विचार ही मूल्य असतात विचार हा न्यायाचा प्रवास असतो विचारातून मानव्य संवर्धित होते विचारातून वास्तवता बदलता येते विचार हे सार्वत्रिक स्वीकाराचे वर्तमानातील मूल्य भान असते ही सर्व नैतिक शहाणपणाची ज्ञानात्मक वर्तनाची बाब समाजाला समजावून घेणे महत्त्वाचे वाटत नाही भौतिकता शूद्र स्वार्थ हे जेव्हा जीवन साध्य वाटते तेव्हा समकाळातील ऐक्याची यथार्थ निर्मिती ही व्यर्थ गोष्ट समाजाच्या दृष्टीने ठरते हे दुर्दैवी वर्तन आहे ह्या वर्तनाच्या बदलासाठी आंतरिक मानव्याचा करुण स्वर नेहमी व्यक्त झाला पाहिजे ही करूण स्वराची हाक मानवता ऐकतच पुढे आला आहे म्हणून समाज विघटनाच्या काळात समाज शत्रुभावाच्या काळात करूण हाकांचे आवाज ऐकणारी संवेदनशील म् ने सतत वाढतील ती वाढत राहतील ते वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हेच सम काळातील विघटनाच्या आलेल्या संकटाला आपले उत्तर असू शकते आपले वैयक्तिक आणि सार्वत्रिक असे प्रयत्न चालू ठेवणे हाच त्यावर उपाय आहे अन्यथा हेही समजावून न घेता समाज वर्चस्वाच्या सुडाच्या दिशेने निघालेलाच आहे त्यामध्ये मात्र पीडितांच्या करून किंकाळ्या ऐकण्याशिवाय दुसरा कुठलाही काळ दिसत नाही. निराशेचे निरीक्षण नाही ही वास्तवाची अनुभूती आणि निष्कर्ष आहेत म्हणून सम काळाची यथार्थता ऐक्याची प्रस्थापित करण्यासाठी आंतरिक कौल सजग कसे व्यक्त होतील हेच पाहणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे .हे कर्तव्य बजावले नाही तर मात्र सम काळातील समाज विघटनाची छिन छिन समाज पिडीत अवस्था ही आता शोषक सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नामुळे वाट्याला येणार आहे .हे खरेच आहे.
शिवाजी रोत्त
सातारा