- 63
- 1 minute read
सर्व महिला, मुलींना सावधानतेचा इशारा म्हणून, माझा एक अनुभव शेअर करत आहे…
सर्व महिला, मुलींना सावधानतेचा इशारा म्हणून, माझा एक अनुभव शेअर करत आहे…
काल दिनांक १५ ऑगस्ट रोजी रात्री पाऊने दहा वाजता मी कल्याण पश्चिम येथील महावीर शॉपिंग सेंटर मधून खरेदी करून घरी जाण्यासाठी ओला ऑटोरिक्षा बुक केली. ओला बुक झाली आणि सहा मिनिटांनी मी बुक केलेली ओला रिक्षा महावीर शॉपिंग सेंटर समोरच्या रोडवर आली. रोड क्रॉस करून मी रिक्षात बसायला गेली. माझ्या सोबत माझी मुलगी ही होती आणि रस्त्यावरती कितीही वर्दळ असली तरीही जेव्हा रिक्षा एखाद्या साईडला थांबते तिथे उजेड असतोच असं नाही. तसंच काल माझी रिक्षा जिथे थांबली तिथे नाही म्हटलं तर थोडसा अंधार होता आणि रिक्षा जवळ गेल्या गेल्या माझी मुलगी पटकन रिक्षात बसली आणि मला त्याच क्षणी रिक्षा ड्रायव्हरच्या बाजूला आणखीन एक जण बसलेला दिसला. मी त्या रिक्षावाल्याला बोलली की हा का बसलाय?? ह्याला उतरव. असं बोलल्यावर मग माझ्या मुलीचे लक्ष गेलं की रिक्षात दोन जण बसलेले आहेत. ती पटकन खाली उतरली. त्याच वेळेस मी त्या रिक्षावाल्याला बोलली की असं कसं तू कोणाला ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी चालवणार आहेस. तर तो मला म्हणाला ही माझ्या सेफ्टीसाठी माझी स्टेपनी आहे. त्याला मी बोलली ओलावाले स्टेपनी म्हणून माणसांना कधीपासून ठेवायला लागले?? त्याला म्हटलं तू त्याला खाली उतरव तरच मी रिक्षात बसते. तर तो मला म्हणाला की “नही वो तो मेरे साथ बैठेगाच” तुमने मेरा गाडी बुक किया है तो तुमको बी बैठनाच पड़ेगा.” है सर्व तो मग्रुरीन बोलत होता. मी बोलली “तेरे बाप का राज है क्या??” मी बुकिंग कॅन्सल करते. तर तो बोलला बिन्धास्त करो. आणि मी बुकिंग कॅन्सल करायला जाणार तितक्यात डोक्यात विचार आला, की अरे बुकिंग कॅन्सल करून माझा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होईल. परंतु या रिक्षामध्ये दुसऱ्या कोणी महिला बसल्या तर त्यांच्यासाठी ते धोकादायक आहे. म्हणून मग मी त्या रिक्षाचा फोटो काढला, त्या रिक्षा ड्रायव्हरचा फोटो काढला. परंतु तुम्हाला मला हे सांगायचं आहे की त्या रिक्षावाल्याने महावीर शॉपिंग सेंटर सारख्या भर रहदारीच्या रस्त्यात तो माझ्याशी खूप उद्धटपणे बोलत होता. सोबत तरुण मुलगा घेऊन तो फिरत होता. जर त्याच वेळी समजा माझी बुकिंग कुठल्यातरी आड वाटेला असती आणि रिक्षा आल्यानंतर मी रिक्षात बसली असती किंवा बसली ही नसती तरी त्या दोघांनी कशावरून आमच्या माय-लेकींच्या बाबतीत काही वेडं वाकडं केलं नसतं…???
खाली मी त्या हरामखोराचा फोटोही टाकत आहे. त्या फोटो वरून तुम्हाला कळेल तो किती मगरूर आहे. मी फोटो काढायला लागली तर त्याने माझ्या कॅमेरासमोर चेहरा दिला आणि मला म्हणतो “निकाल फोटो” काय करायचे ते कर।.
मी तर लीगल ॲक्शन घेणार आहेच.
(ओला ला ऑलरेडी मी कंप्लेंट केली आहेच )
ह्या रिक्षावाल्याचा नंबर ही देत आहे. रिक्षावाल्याचा फोटोही टाकत आहे. माझ्या परिसरातील कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ इथल्या किंवा आणखीन कुठल्याही परिसराती कोणत्याही महिलेने या नंबरच्या रिक्षामध्ये बसू नये. कारण त्याच्या बोलण्यामध्येच त्याचा खुनशीपणा त्याचे वाईट इंटेन्शन मला दिसत होते. मी त्याचा फोटो काढायच्या आधी माझ्या जवळचे हत्यार बाहेर काढले होते आणि मग त्याचा फोटो काढला. कारण मी सावध होती की मी जर फोटो काढायला गेली तर कदाचित हा माझ्यावर हल्ला करू शकत होता. तर भगिनींनो कोणत्याही क्षणी बेसावध राहू नका. रिक्षामध्ये इतर पुरुष पॅसेंजर त्याने आधीच भरून बसवुन ठेवलेले असेल तर त्या रिक्षामध्ये किंवा कोणत्याही वाहनांमध्ये बसू नका. माझी मुलगी मला बोलली मम्मी तू कशाला इतक्याजवळ जाऊन त्याचा फोटो काढत होतीस. मला भीती वाटत होती. मी म्हटलं तो जागचा हलला जरी असता ना तर त्याचा मी गळा चिरून टाकला असता. महिलांनो आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्याजवळ हत्यार जरूर बाळगा. कारण आपल्या आजूबाजूला सतत महिलां बाबत घडणाऱ्या घटनांमुळे आपण बेसावध राहू नये. आपल्या आत्मसंरक्षणाची जबाबदारी सर्वात आधी आपली स्वतःची असते .
सर्व बंधुना एक विनंती आहे. माझी ही पोस्ट तुमची बहीण, आई, पत्नी या सर्वांपर्यंत पोहोचवा.
– सौ आशा सावरकर रसाळ.
भिवंडी लोकसभा संपर्क संघटक.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.