• 64
  • 1 minute read

सर्व मार्ग हे सत्तेत जातात किंवा सत्तेच्या दिशेने घेऊन जावे लागतात.

सर्व मार्ग हे सत्तेत जातात किंवा सत्तेच्या दिशेने घेऊन जावे लागतात.
         एक लक्षात घेतले पाहिजे आनंदराज आंबेडकर साहेब हे राजकारणात आहेत त्यांचा पक्ष हा राजकीय पटलावर आहे त्यामुळे हे राजकारण आहे आणि राजकारणात जिवंत राहण्यासाठी अथवा राजकीय विचार पुढे नेण्यासाठी युती/आघाडी करावी लागते*.
 
इथे आनंदराज साहेबांची भूमिका अस्पष्ट आहे पण प्रॅक्टिकल आहे. वंचितने उबाठा गटाबरोबर यूती केली महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पण इतर पक्षांनी त्यांना सोबत घेतलं नाही हे पक्ष म्हणून त्याचं मत होते आणि समाजाने सुद्धा ते समजून घेतलं त्यात उबाठा गटाची ताकत मोठी आहे म्हणून लोकांना ते चालले, आता तसेच रिपब्लिकन सेनेसोबत का होताना दिसत नाही कारण रिपब्लिकन सेनची ताकत किती हा चर्चेचा विषय आहे पण बौद्धजन पंचायत समिती ची ताकत मुंबईत आहे आणि रिपब्लिकन सेनेसाठी पूरक आहे पण त्यात गट प्रतिनिधी हे अनेक पक्षाशी संलग्न आहे.
 
कार्यकर्ता जगाला पाहिजे हे त्यांचे मत थोड विसंगत आहे पण सत्तेत सामील होण हा रिपब्लिकन सेनेचा निर्णय फक्त महापालिके पर्यंत मर्यादित आहे की महाराष्ट्रच्या सत्तेत खरोखर घेऊन जाणार हे सर्वस्वी शिवसेनेवर अवलंबून असेल. महापालिकेच्या निवडणुकीत बौद्ध समाजाचा टक्का मुंबईत 10-12%च्या जवळपास आहे आणि ह्या मतांचा वापर शिवसेना करून घेण्याचा विचार नक्कीच करेल, पण त्यांना हे कोण सांगेल की त्या मतांमध्ये RPI चे अनेक गट, वंचित ची मते, रिपब्लिकन सेनेची मते तसेच इतर पक्षात सामील झालेले स्थानिक नेते त्यामुळे ह्या मतांचा उपयोग किती होईल सांगता येत नाही.
 
सर्व मार्ग हे सत्तेत जातात किंवा सत्तेच्या दिशेने घेऊन जावे लागतात, कांशीराम साहेबांनी उत्तरप्रदेश मध्ये जे केले ते पाहता आनंदराज आंबेडकर साहेबांची भूमिका कदाचित बरोबर असेल असे वाटते पण त्यावेळी कांशीरामंच वादळ ह्यांनी अनेक आमदार निवडून आले आणि सत्तेत बसण्यासारखे वातावरण निर्माण झाले असो सध्या *समाजभावना लक्षात घेता अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतील पण ह्यातून समाजाचे तसेच आंबेडकरी चळवळीचे चांगले हित होत असेल तर आनंदराज साहेबांच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. 
 
आपला केतन कदम
संस्थापक सरचिटणीस महाराष्ट्र श्रमिक सभा (यूनियन)
 
 
 
 
 
0Shares

Related post

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली, काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली, काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली, काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी मुंबई/अमरावती, राज्यात कोयता…

घर हक्क परिषद

घर हक्क परिषद मुंबई व महाराष्ट्र राज्यातील परवडणाऱ्या घरांचे व जमिन विषयक प्रश्न कामगार व नागरिक…
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित ची समस्या आणि समीक्षा उत्तम कांबळे यांच्या शब्दात

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित ची समस्या आणि समीक्षा उत्तम कांबळे यांच्या शब्दात

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित ची समस्या आणि समीक्षा उत्तम कांबळे यांच्या शब्दात 40 वर्ष समाजाने कुठलीच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *