• 148
  • 1 minute read

स्वातंत्र्य आंदोलन व शहीद परिवाराचे वारसदार मुख्तार अन्सारी यांना भावपुर्ण आंदरांजली…!

स्वातंत्र्य आंदोलन व शहीद परिवाराचे वारसदार मुख्तार अन्सारी यांना भावपुर्ण आंदरांजली…!

उत्तर प्रदेशात मृत्यू अन् हत्या यामध्ये आता कुठलाच फरक राहिलेला नाही. अन् या हत्या अगदी सहजपणे केल्या जात आहेत. अतिक अहमद अन् आता मुख्तार अन्सारी यांची हत्या सरकारने नियोजनबध्द पद्धतीने केली. अतिक अहमदची हत्या पोलिस बंदोबस्तात अन् न्यायालयाच्या आवारात केली. तर तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारी यांना खाण्यातून विष दिले गेल्याचा आरोप त्यांनी स्वतःच केला आहे. अतिक अहमदच्या मारेकऱ्यांना तर अटक केली आहे. मात्र हत्येमागील मास्टर माईंड सरकारी संक्षणात मोकाट फिरत आहेत. मुख्तार अन्सारी आज आपल्यात राहिले नाहीत. त्यांची ही हत्याच आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम न्याय व्यवस्थेचे आहे. पण भाजप सरकारने ते आपल्याच हातात घेतले आहे, हे स्पष्टपणे उत्तर प्रदेशात होत असलेल्या हत्यांवरून वाटते. बाकी स्वातंत्र्य आंदोलनाचा वारसदार असलेल्या मुख्तार अन्सारी यांना भावपूर्ण आदरांजली.
अतिक अहमद व मुख्तार अन्सारी ही नावे गुन्हेगारी जगतातीलच प्रभावशाली नावे होती, असे नाही. राजकरणात ही ती प्रभावशाली होती. आपापल्या क्षेत्रातील सर्व जाती, धर्मांच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना ज्या ज्या वेळी मिळाली, त्या त्या वेळी त्यांनी धर्मनिरपेक्ष व्यवहार केला. लोक प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या विकास कामांना तोड नाही. गरजू मग तो कुठल्या जातीचा अथवा धर्माचा असो अतिक अहमद व मुख्तार अन्सारी यांच्या दरबारातून, फाटक व दरवाज्यातून मोकळ्या हाताने कधीच जात नव्हता याची कैक उदाहरणे आहेत. बहुजनवादी राजकारण या दोघांनी ही केले.
मुख्तार अन्सारी यांचे दादाजी डॉ. अहमद अन्सारी हे स्वातंत्र्य आंदोलनातील एक प्रभावशाली नाव व स्वातंत्र्य सैनिक होतें. महात्मा गांधी यांच्या सोबत त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. तर त्यांचे नाना ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान हे भारत पाकिस्तान युध्दात भारताकडून लढत असताना शहीद झाले आहेत.

-राहुल गायकवाड
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राष्ट्रीय हितावर मात करून शरद पवारांचा सत्तेचा मोह सांभाळत राज्यसभेची उमेदवारी…..!

राजकीय समीक्षक पवारांचे आर्थिक लाभार्थी असल्याने सहा दशकांच्या राजकीय कार्यकाळाची समिक्षा होत नाही…?      …
आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

आंबेडकरी चळवळीला संविधान, लोकशाही विरोधी धर्मांध शक्तींच्या दावणीला बांधण्याच्या बदल्यात ज्योती वाघमारेंना राज्यसभा

प्रा. ज्योती वाघमारे यांची निवड : आंबेडकरी चळवळीचा वैचारिक पाया मोडीत काढण्याच्या नियोजित योजनेचा व्यावहारिक भाग!…
असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड

असंघटित कामगार आणि चार लेबर कोड    देशभर कामगारांचा प्रचंड विरोध असतानाही अखेर सरकारने चार लेबर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *