• 27
  • 1 minute read

हिंदूच्या सामाजिक वागणुकीतून अस्पृश्यांची समस्या प्रत्येक्षपणे निर्माण झाली आहे. त्यांच्या समाज-मानसशास्त्राचा परिणाम म्हणजे अस्पृश्यांना नाकारण्यात आलेल्या राजकीय आणि आर्थिक हक्क होय.

हिंदूच्या सामाजिक वागणुकीतून अस्पृश्यांची समस्या प्रत्येक्षपणे निर्माण झाली आहे. त्यांच्या समाज-मानसशास्त्राचा परिणाम म्हणजे अस्पृश्यांना नाकारण्यात आलेल्या राजकीय आणि आर्थिक हक्क होय.

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३१

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, हिंदू समाजव्यवस्था ही जर केवळ असमानतेवर आधारित असती तर या पूर्वीच ती नामशेष झाली असती. परंतु, ती असमानतेच्या श्रेणीवर आधारलेली असल्यामुळे ब्राम्हणाला खालच्या पातळीवर आणण्याचा विचार करताच अस्पृश्यांनी त्यांच्या पातळीवर येणे शुद्राला नको असते. त्यापेक्षा ब्राम्हनांकडून अवमानित होणे तो पसंत करतो. अस्पृश्यांशी हात मिळवणी केल्यास आपला सामाजिक दर्जा घसरेल ही भीती त्याला वाटत असते. त्या सर्वांचा परिणाम असा झाला की, या संघर्षात अस्पृश्यांना पाठिंबा देण्यास कोणीही उरले नाही. ते अक्षरशः एकांकि पडलेत. ते केवळ एकांकिच पडलेत असे नव्हे, तर त्यांच्या निसर्गदत्त सहकारी वर्गांनी त्यांचा विरोध करून वाळीत टाकले. त्यामुळे अस्पृश्यता नष्ट करण्याच्या मार्गात या एकाकीपणाचा आणखी एक अडथळा निर्माण झाला.

अस्पृश्यांची समस्या अधिक बिकट होण्याचे कारण म्हणजे अस्पृश्यतेमध्ये एकाकीपणा आणि गौणत्व या सारख्या वाईट प्रथांचा अंतर्भाव झालेला आहे. विशेष म्हणजे अशा वाईट गोष्टींचा त्यात जाणीवपूर्वक समावेश करण्यात आला आहे. अस्पृश्यतेची समस्या सहज नष्ट होणे शक्य नाही, यांची कल्पना बाबासाहेबांना होती. कारण, हिंदू धर्माचा एक घटक असलेल्या स्मृतींमध्ये समाविष्ट असलेल्या हिंदू कायद्याचा हे एक अविभाज्य अंग आहे. आर्थिक व सामाजिक हक्क नाकारल्यामुळे गुलामीची समस्या निर्माण झाले होती. जर, अस्पृश्यांची समस्या ही राजकीय आणि आर्थिक हक्क नाकारल्यामुळे निर्माण झाली असती, तर ती समस्या कायद्याने अथवा घटनेच्या चौकटीत सोडविता आली असती. परंतु, हिंदूंच्या समाज-मानसशास्त्राचा परिणाम म्हणजे अस्पृश्यांना नाकारण्यात आलेल्या राजकीय आणि आर्थिक हक्क होय. हिंदूच्या सामाजिक वागणुकीतून अस्पृश्यांची समस्या प्रत्येक्षपणे निर्माण झाली आहे. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की, जेव्हा हिंदू आपली मनोवृत्ति बदलतील त्याचवेळी अस्पृश्यता नष्ट होईल. हिंदूंना त्यांची ही जीवन पद्धती बदलण्यास कसे सांगायचे हा खरा प्रश्न आहे. पूर्वापार चालत असलेली जीवन पद्धती पूर्णपणे बदलणे तितके सोपे नाही. या पूर्वापार जीवन पद्धतीशिवाय हिंदू हे धर्मास बांधील आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते धर्माचे उल्लंघन करणार नाही. त्यांची जीवन पद्धती बदलणे म्हणजे जवळजवळ त्यांचा धर्म बदलणे होय. अस्पृश्यांची समस्या या प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेतून सुटेल यांची कोणतीच आशा बाबासाहेबांना वाटत नव्हती.

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *