• 104
  • 1 minute read

२४-कल्याण लोकसभा मतदार संघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज !

२४-कल्याण लोकसभा मतदार संघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज !

२४-कल्याण लोकसभा मतदार संघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज असल्याची माहिती २४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे. दि:-२०-मे-२०२४-रोजी संपन्न झालेल्या मतदान प्रक्रियेच्या-२४-कल्याण लोकसभा मतदार संघातील मतमोजणीस डोंबिवली पूर्वेतील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडागृहात दि:-०४-जून २०२४-रोजी सकाळी ०८:००पासून प्रारंभ होणार आहे.

या मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पहिले प्रशिक्षण शिबीर दि:-२८-मे-२०२४ रोजी डोंबिवली पूर्व येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात संपन्न झाले. आता मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण शिबीर रंगीत तालीम दि:-०३-जून २०२४-रोजी सकाळी ०६:००वाजता डोंबिवली पूर्वेतील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडागृहात ठेवण्यात आले आहे.

मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात प्रती विधानसभा मतदार संघात १४-याप्रमाणे एकूण-८४ टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून, मतदानाच्या एकूण-२९ फे-या होणार आहेत.या मतमोजणी कामी एकूण ६००-अधिकारी व कर्मचारी पोलीस स्टाफ वगळून वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे.

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *