- 83
- 1 minute read
८ मार्च हा महिला संविधान साक्षर दिन म्हणून साजरा व्हावा
८ मार्च जागतिक महिला दिन आणि १३ फेब्रुवारी सरोजिनी नायडूची जयंती राष्ट्रीय महिला दिन साजरा करणाऱ्या महिलाना एक कवियत्री विचारते पुरुषी गुलामगिरितून स्री
खरच आझाद आहे का ?
कपाळ माझ सौभाग्यच लेण तुझ
गळा माझा आणि मंगळसूत्र तुझ
हात माझे आणि बांगड्या तुझ्या
पाय माझे आणि जोडवी तुझी
शरीर माझे त्यावर हक्क तुझास्रीयाचे स्व अस्तित्व,आत्मसन्मान जागृत करण्यासाठी क्रांतीसुर्य महात्मा फुले,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, फातिमा शेख यांनी अबला महिलाना सबला होण्यासाठी शिक्षण सुरू केले.
केशव धोंडू कर्वे यांनी महिलांच्या लैंगिक आणि आरोग्य समस्या समाज स्वस्थ मासिक सुरू करून महिला वर्गाला म्हंटले की,
कभी पर्दा, कभी घूंघट ,या बुर्के के पीछे
घुट घुट कर न मरणा जाग उठो महिला
तथागत बुद्ध म्हणतात दुःखाचे मुळ शोधा म्हणजे दुःख निवारण्याचा मार्ग सापडेल. मनुस्मृती हे महिलाना गुलाम करण्याचं मुळ असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. भारतीय महिलांनी २५ डिसेंबर हाच महिला मुक्तीदीन साजरा केला पाहिजे.डॉ.बाबा साहेब यानी स्री – पुरुष समता प्रस्थापित करण्यासाठी संविधानमध्ये १४, १५, १६ आणि २५ कलमची तरतूद केली.आहे महिला प्रगतीसाठी हिंदू कोड बिल संसदमध्ये मांडून दिले नाही. म्हणून डॉ. बाबासाहेब यानी आपला कायदेपदाचा राजीनामा दिला. हे किती महिलाना माहीत आहे.? डॉ.बाबासाहेब यानी राजीनामा दिल्या नतर काँग्रेसला उशिरा सुचलेले शहाणपण
म्हणजे हुंडाविरोधी कायदा १९६१, कौटुंबिक न्यायालय कायदा १९८४, सती प्रथा बंदी कायदा १९८७, राष्ट्रीय महिला आयोग कायदा १९९०, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५, बालविवाह प्रतिबंध कायदा २००६, आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध) कायदा २०१३ साली परित झाला.
मानवी कल्याणाचे कायदे जगात नसतील तेव्हढे कायदे एक भारत देशात आहेत.पण त्याची अंमलबजावणी मात्र प्रामाणिकपणे होत नाही.हेच लोकशाहीचे दुर्दैव आहे.कारण अद्याप पुरुषी अहंकार जिवंत असल्याने लोकसभा संसद मध्ये महिलांचे ३३ टक्के आरक्षण पास होत नाही.यावर एक कवियत्री म्हणते की,
तुम जो बड़े हँस के मुझसे गले मिलते हो,
मेरे पीछे तुम ही तो खंजर लिए फिरते हो।
डॉ.बाबासाहेब म्हणतात की, क्या देशाची महिला शिकली त्या देशाची प्रगती झाली. २२ जानेवारी २०१५ रोजी “बेटी बचाओ , बेटी पढाओ ” चा नारा दिला.असला तरी आज ही देशात २३ टक्के महिला निरक्षर आहेत. महिला सुरक्षा म्हणाल तर युनिसेफच्या एका अहवालानुसार, १९५ देशांमध्ये भारताचा ४१वा क्रमांक लागतो.याच कारण धार्मिक रूढी, लैंगिक गुन्हे, लिंग भेदभाव, घरगुती हिंसाचार, निम्नस्तरीय जीवनशैली , कुपोषण, हुंडाबळी, स्त्री भ्रुणहत्या, सामाजिक असुरक्षिततेचा अभाव आहे.२७ टक्के महिला शारीरिक हिंसाचाराला बळी पडतात. ११ टक्के महिलांना इमोशनल ब्लॅकमेलिंग अर्थात भावनिक जाचाला सामोरे जावे लागते.देशात दरवर्षी सुमारे ४५ हजार महिलांचा मृत्यू प्रसूतीदरम्यान होतो. ४९ टक्के महिला अजूनही सुरक्षा, गतिशीलता, आर्थिक स्वातंत्र्य, पूर्वग्रह आणि पुरुषप्रधान समाज यांसारख्या समस्यांशी लढत आहे. गेल्या वर्षी ७० हजार महिला बेपत्ता आहेत.महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मुंबई पहिला तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर असेल तर हाच शिवराय ,फुले, शाहू आंबेडकर याचा पुरोगामी महाराष्ट्र आहे?
संविधान पेक्षा कोणता धर्मग्रंथ मोठा नाहीत कारण भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही देश आहे.पण त्याच देशात राजीव गांधीनी मुस्लिमांच्या शरीयत चा विचार करून शाहा बानूला पोटगी नाकारली. सनातनीना हिंदू धर्मियांना भडकविण्यास आयात कोलीत मिळाले.म्हणून गुजरातच्या बिल्कीस बानोला झेल मधून सुटलेल्या बलात्कारी आरोपींना परत जन्मठेप होण्यासाठी कोर्टाची लढाई लढावी लागली. जागतिक कीर्तीच्या महिला खेळाडू आपल्यावरील अन्याय विरुद्ध सरकार कडे दाद मागत होत्या.अन्याय अन्याग्रस्थ महिलाना न्याय न देनारे रामराज्य आणण्याची भाषा करीत आहेत.टीएकहै आदर्श गुरुजी वार्ताहर महिलेला म्हणतात की, प्रथम कपाळाला टिकली लावून मगच माझ्याशी बोल असे विकृत मनोहर भिडे संत ज्ञानेश्र्वर महाराज,संत तुकाराम महाराज पेक्षा मनूला श्रेष्ठ मानून मनुस्मृतीचे समर्थन करीत आहेत.कारण त्यांना रामराज्य हवे आहे.पण रामराज्यात सीतेला वनवास भोगावा लागला. अग्निदिव्य करावे लागेल. महिलाना पती निधना नंतर सती जाण्याची प्रथा माहीत असूनही एक न्यायमूर्ती महिला मनुस्मृतीचे समर्थन करीत आहे.तर ३३ हजार महिला पुण्यातील दगडू हलवाई गणपतीला मनुस्रोत म्हणत मनुचे समर्थन करीत आहेत.
संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक महिला दीन 1996 साली घोषवाक्य होतं ‘भूतकाळ साजरा करताना भविष्याची धोरणं ठरवणं ‘ ‘ रामनामचरित ‘ चे प्रवचनकार प्रसिध्द कवी डॉ.विश्वास विदेशी शिक्षणास निघालेल्या मुलीला रामनामचरित ग्रंथ देवून म्हणतात की जेव्हा मनाला अशांत वाटेल आणि संकटात असणार तेव्हा हा ग्रंथ वाचणे. परंतु तो ग्रंथ न वाचल्याचे लक्षात येवून न वाचण्याचे कारण विचारतात .तेव्हा मुलगी म्हणते ‘ जे स्वतः देव असूनही स्वतःच्या पत्नीची सुरक्षा करू शकले नाहीत. माझ्यात काय कमी म्हणून सीतेला पळवून बंदीवास केल्याचे मंदोदरी पती रावण यास प्रश्न करते.तेव्हा रावण म्हणतो माझी बहिण शपूर्णका हिने रामाकडे आपलं प्रेम व्यक्त केलं म्हणून रामाने भाऊ लक्षिमनला तिला विद्रूप करण्यास सांगितले. महिलाना याताना काय होतात.है रामाला कळण्यासाठी सीतेला पळवून आणले आहे.
देवाला आपली पत्नी पवित्र असूनही अग्निदिव्य करण्यास भाग पाडले. या वरून श्रेष्ठ कोण हे महिलानी ठरविले पाहिजे. जागतिक महिला दीन 2023 सालच घोषवाक्य होतं Embrace Equity’ अशी आहे. याचा अर्थ लिंग समानतेवर लक्ष केंद्रित करणे. लिंगभेद चाचणी होत नसल्याच्या पाट्या सर्वत्र दिसत असल्या तरी १००० मुलांमागे ९२७ मुलीचे प्रमाण आहे.ही विषमता आहे. जी महिला देव पुजत नसली ती देवाची मुरळी नाहीतर जोगतीन बनली.पण जी संविधान वाचत राहिली ती गावची सरपंच पासून देशाची राष्ट्रपती पर्यंत सर्व क्षेत्र पादक्रांत करीत राहिली. अबलाची सबला होऊन जगाला गवसणी घालणाऱ्या महिलाना अभिनेता विक्रम गोखले म्हणतात की,ही प्रगती कोणत्या देव धर्म ग्रंथ,संस्कृतीने नव्हे तर संविधान मुळे झाली आहे.पूजा करायची तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या विचाराची करा. म्हणून महिलांनी ८ मार्च हा ” महिला संविधान साक्षर दिन म्हणून साजरा केला पाहिजे.
– आनंद म्हस्के