/ ९ ऑगस्ट, या जागतिक मुळनिवासी दिवसाला, भारतातील सुशीक्षीत आदिवासी लोक आपले अधिकार मिळण्यासाठी आंदोलन करण्याऎवजी, बेशर्मासारखे रस्त्यावर येऊन नाचत आहेत.
९ ऑगस्ट, या जागतिक मुळनिवासी दिवसाला, भारतातील सुशीक्षीत आदिवासी लोक आपले अधिकार मिळण्यासाठी आंदोलन करण्याऎवजी, बेशर्मासारखे रस्त्यावर येऊन नाचत आहेत.
९ ऑगस्ट हा जगातील मुळनिवासीयांसाठी आपले सांस्क्रुतीक मुंल्ये प्रस्थापित करून, विश्वस्तरावर आपली ऒळख प्रस्थापित करण्याबरोबरच आणि आपले विश्वव्यापी अधिकारही मिळविण्याचा दिवस आहे. ही आदिवासीसाठी स्वाभिमानाची व गर्वाची बाब आहे. पण भारतात ९ ऑगस्ट या जागतिक मुळनिवासी दिवसाचे गार्भिंय लक्षात न घेता, आदिवासीतील सुशिक्षित लोक रस्त्यावर येऊन नाचत आहेत. याचे भयकंर दु:ख आहे. ही बाब आदिवासीच्या सुशीक्षीत तरुण पढीच्या बेशर्मिलाही बेशर्म करणारी आहे.
संयुक्त राष्ट्र संघात, भारतीय प्रशासनानी, सांगितले की, भारतात कोणीही मुळनिवासी व आदिवासी नाहीत. आहेत ते फक्त अनुसूचीत जमाती (Scheduled Tribes). त्यामुळे भारतातील आदिवासीना संयुक्त राष्ट्र संघात, मुळनिवासीचा दर्जा बहाल केल्या नाही.
१) ९ ऑगस्ट हा दिवस भारतात साजरा करण्यास केंद्र शासणाचे कोणतेही आदेश नाहीत.
२) ९ ऑगस्ट हा दिवस केंद्र शासणाच्या स्तरावर साजरा केल्या जात नाही.
३) ९ ऑगस्ट आणि १३ सप्टेबंर या दिवसाचे भारतीय आदिवासीना विश्वव्यापी नॆतिक अधिकार भारत सरकारव्दारा नकारल्या गेले आहे.
४) महाराष्ट्राच्या काही जिल्हातील आदिवासी कार्यकर्त्यानी जिल्हाधिकारीना विनंती करून ९ ऑगस्ट या दिवसांला जिल्हाच्या स्थानिक पातळीवर, जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून स्थानिक पातळीवर सुट्टी जाहीर केली आहे. याचा अर्थ केंद्र शासणाने ९ ऑगस्ट या दिवसाला शासकिय स्तरावरून भारतात साजरा करण्याची मंजुरी दिल्या गेली असा होत नाही. आदिवासीमद्ये काही संघिष्ठ लोकाकडून या दिवसाला शासकिय स्तरावर साजरा करण्यास शासणाची मंजुरी असल्याचा चुकीचा भ्रम परविल्या गेला आहे.
९ ऑगस्ट हा दिवस जगातील, प्रत्येक राष्ट्रव्दारा प्रशासकीय स्तरावरून सुट्टी जाहीर करून, शासकिय स्तरावर साजरा केल्या जातो आहे. तसा भारत देशात साजरा केल्या जात नाही. भारतातील आदिवासी लोकाना वाटते की, शासणाने आपल्यालाही मुळनिवासीचा दर्जा बहाल केला आहे. त्या प्रमाणे आपल्यालाही विश्वव्यापी अधिकारही बहाल केल्या गेले आहेत, भारतातील आदिवासी लोक अशा या चुकीचा भ्रमात आहेत.
अ) ९ ऑगस्टला जगातील सर्व आदिवासीना सविधानीक मुळनिवासी दर्जा मिळाला तसा भारतीय आदिवासीना मिळावा या साठी आदिवासी लोक रस्त्यावर ऊतरुन कधीच आंदोलन का करीत नाही?
ब) ९ ऑगस्ट या दिवसाला संपुर्ण भारतात शासकिय स्तरावर साजरा करण्यासाठी, आंदोलन का करीत नाहीत?
क) ९ ऑगस्ट व १३ सप्टेबंरच्या जाहिरनाम्यानुसार जगातील आदिवासीना विश्वव्यापी अधिकार प्राप्त झाले ते अधिकार मिळविण्यासाठी, आदिवासी लोक आंदोलन का करीत नाही?
सुशीक्षीत आदिवासी लोक आपले विश्वव्यापी अधिकार व हक्क मिळविण्यासाठी आंदोलन करण्याऎवजी रस्त्यावर येऊन नाचत आहेत, ही आदिवासीसाठी भंयकर शर्मेची बाब आहे.
यावर खुली चर्चा व्हावी असे आदिवासीना आव्हान करण्यात येत आहे.