ॲड. प्रकाश आंबेडकरांचा एससी, एसटी क्रिमीलेयरला विरोध
न्या. गवई क्रिमीलेयरवर प्रवचन देत आहेत परंतु, त्यांचे वडील खासदार असताना ते न्यायाधीश झाले
यवतमाळ : वंचित बहुजन आघाडी SC आणि ST च्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणामधील क्रिमीलेयरच्या विरोधात असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, न्यायमूर्ती गवई हे क्रिमी लेयरवर प्रवचन देत आहेत. परंतु, त्यांचे दिवंगत वडील रा. सु.गवई राज्यसभेत खासदार असताना ते न्यायाधीश झाले. त्यांचे दिवंगत वडील हे 1964 ते 2011 या कालावधीत ३ वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल होते. तसेच ते लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार, महाराष्ट्रात विधान परिषदेचे सभापती, आमदार होते.
मग हा दांभिकपणा का ?
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण धोरण हे आर्थिक विकासाचे धोरण नसून सामाजिक न्यायाचे हत्यार असल्याचे आंबेडकरांनी पुन्हा अधोरेखित केले आहे.
दलित प्रशासनाचा भाग नव्हते आणि त्यांना सैन्यातही भरती करण्यात आले नव्हते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी न्यायीक धोरण म्हणजे अत्याचारितांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी धोरण आखणे हे असते असेही त्यांनी स्पष्ट केले.