• 85
  • 1 minute read

अकोल्यात आज होणार ऐतिहासिक धम्म मेळावा ; ॲड. प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

अकोल्यात आज होणार ऐतिहासिक धम्म मेळावा ; ॲड. प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

          अकोला : अकोल्यात आज, शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता क्रिकेट क्लब मैदान, रेल्वे स्टेशन रोड येथे होणाऱ्या ऐतिहासिक धम्म मेळाव्याची सर्वत्र उत्सुकता आहे. तब्बल ४० वर्षांची परंपरा लाभलेला हा मेळावा धम्म, समता आणि आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व मानला जातो.

या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक ॲड. बाळासाहेब आंबेडकर असून त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सामाजिक न्याय, आरक्षण, वंचितांचे प्रश्न, तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवर ते कोणती दिशा दाखवतात याबाबत मोठी उत्सुकता आहे.

प्रत्येक वर्षी होणाऱ्या या धम्म मेळाव्याला विदर्भासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. हजारो कार्यकर्ते, अनुयायी आणि नागरिक उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.

अकोल्यातील हा मेळावा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नसून सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना बळ देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरतो. ४० वर्षांचा हा प्रवास समाजातील वंचित, पीडित आणि शोषित घटकांना एकत्र आणण्याचा आणि बुद्ध-आंबेडकरी विचारधारेचा प्रसार करण्याचा साक्षीदार राहिला आहे.

आज संध्याकाळी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने अकोल्याचा हा मैदान विचारांच्या महासागराने भरून जाईल, यात शंका नाही.

0Shares

Related post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

संसदीय प्रणालीला लागलेल्या ” संघी वायरस ” व किड्यांना ठेचणे हेच देश हिताचे…..! देशाची एकता, अखंडता,…
स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *