- 100
- 1 minute read
अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी होत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय ? चिंता व चर्चा करायची तर यावर झाली पाहिजे…..!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 122
कायद्याच्या राज्याची भाषा करणे, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे आज गुन्हा ठरत असला तरी देशहितासाठी तो केलाच पाहिजे....!
बायको माजी राज्यसभा सदस्य व राज्याची उपमुख्यमंत्री, मुलगा करोडपती व नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य, पुतण्या दोन – तीन वेळेचा आमदार, चुलत बहीण चार – पाच वेळीची खासदार आणि चुलते म्हणजे काकाचे तर विचारूच नका. चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात अनेक वेळा मंत्री, 86 व्या वर्षी ही राज्यसभेचे सदस्य, महामानव, अवतारी पुरुष नरेंद्र मोदींचे गुरु. इतके सारे असताना राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांच्या अपघाती मृत्याचा साधा FIR ही या राज्यात नोंदवून घेतला जात नाही. तेव्हा या राज्याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ? हा खरा प्रश्न आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताची वस्तुस्थिती समोर यावी, यासाठी रोहित पवार विरोधी पक्ष नेत्यांना भेटत आहेत. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, धर्मेंद्र यादव यांच्या सह अनेक नेत्यांना भेटले आहेत. या विमान अपघाता प्रकरणी संसदेत आवाज उठविण्याची मागणी करीत आहेत. न्याय मिळविण्यासाठी दारोदारी भटकत आहेत.
2014 नंतर कायद्याचे राज्य हे केवळ शपथ घेण्यापुरते आणि मतं मिळविताना जनतेला आश्वासन देण्यापुरते राहिलेले आहे. ज्या अजित पवाराची पत्नी राज्याची उपमुख्यमंत्री आहे. परिवारातील अर्धा डझन लोक आमदार, खासदार आहेत. त्या अजित पवारांना न्याय मिळत नसेल. त्यांचा मृत्यू हा अपघात आहे की, घातपात आहे, याची साधी चौकशी होत नसेल, तर सामान्य जनतेचे काय ? हा खरा चिंतेचा विषय आहे. चर्चाच करायची असेल तर राज्यातील जनतेने यावर चर्चा केली पाहिजे. अजित पवारांच्या मृत्यूची चर्चा आणि चौकशी त्यांच्या परिवारालाच नको आहे. रोहित पवार जे काही करीत आहेत, ते ही त्यांचे आपले राजकारण आहे. त्यातून भले झालेच तर ते त्यांचे होईल. महाराष्ट्राचे नाही. नक्कीच नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्यान विमान अपघातामध्ये निधन झाले. राज्यातील व देशातील जनता यास अपघात म्हणायला तयार नाही. मात्र त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्विकारले आहे. हा घातपात नाही. अपघात आहे. यावर त्यांचा विश्वास असावा म्हणून त्या या संदर्भात गप्प आहेत. मुलगा ही गप्प आहे. सुनेत्रा पवार यांना नवऱ्याचे तर पार्थ पवार यांना बापाचे कसलेच सुतक नाही. हे दोघे ही सत्तेत मस्त गर्क आहेत. सत्ता नात्यांना किती तकलादू बनवित आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणून शरद पवार यांच्या परिवाराकडे या पुढील काळात पाहिले जाईल.
अजित पवारांच्या पश्चात सत्तेच्या दिशेने वाटचाल करता आली असती. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करून भाजपसोबत राज्यात व केंद्राच्या सत्तेत वाटा मिळाला असता, तर अजित पवारांचा मृत्यू हा अपघात होता. पण विलीनिकरण होत नाही. सत्तेत सहभाग मिळत नाही, हे स्पष्ट होताच हा मृत्यू शरद पवार व रोहित पवार यांच्यासाठी घातपात झाला. बाकी राज्यातील जनतेसाठी अगदी अपघाताच्या क्षणापासून हा घातपातच असून हा विद्यमान सत्ताधाऱ्यांनी घडवून आणला असल्याची चर्चा राज्यभर आहे.
सत्तेच्या समिकरणांवर अपघात की घातपात ठरविण्याची प्रथा नव्याने राजकारणात सुरु झालेली आहे. जज लोयाची हत्या की नैसर्गिक मृत्यू, याची चर्चा देशभर गेली दशकभर सुरु आहेच. एक पक्ष लोयाच्या मृत्यूला हत्या म्हणतोय, तर जो सत्तेवर आहे, तो त्यास नैसर्गिक मृत्यू म्हणत आहे. पण त्याची फाईल अद्याप ही रेकॉर्डला असून राजकीय सौदेबाजीसाठी त्या फाईल पुन्हा ओपन करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हे अशा पद्धतीचे राजकारण सध्या सुरु आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना जज लोयाची फाईल पुन्हा खोलण्याची धमकी दिली होती. खोलली मात्र नाही. खरे तर चौकशी नंतरची गोष्ट आहे. लोयाची हत्या कुणी व का केली? हे सर्वांना माहित आहे. गोपीनाथ मुंडेच्या प्रकरणात ही चौकशी झाली नसताना ज्या चर्चा सुरु असतात, त्यातून आरोपी सहज पुढे येतात. लोया आणि मुंडेच्या मृत्यूची चौकशी होत नाही. तसेच अजित पवार यांच्याबाबतीत होणार. रोहित पवारांनी किती ही जोर लावला तरी FIR दाखल होणार नाही. दरम्यानच्या काळात विमान अपघाताचा रिपोर्ट आला आहे. त्यात पुष्कळ त्रुटी आहेत. असणार ही. पण FIR दाखल केला जाणार नाही. कारण कायद्याचे राज्य राहिलेले नाही.
अजित पवारांचा मृत्यू : या संवेदनशील विषयावर ही पवार परिवार संवेदनशील नाही…..!
अजित पवारांचा मृत्यू विमान अपघातात झाला की, तो घातपात होता? या पेक्षा म्हहत्वाचे ठरते ते म्हणजे पत्नी सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांना वारसदार म्हणून सत्ता हवी आहे. ती त्यांना मिळाली आहे. तर रोहित पवारांना चुलत्याच्या हत्येचे भांडवल करून स्वतःचे राजकारण करायचे आहे. दोन्हीकडे केवळ सत्तेचे समीकरण हा फॅक्टर असल्याने इतक्या संवेदनशील विषयावर ही पवार परिवार संवेदनशील दिसत नाही. एकजूट नाही. पण दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनिकरण झाले. सत्तेचा वाटा मिळाला, तर रोहित पवार ही अपघात मानायला तयार होतील. गोपीनाथ मुंडे यांचे उत्तम उदाहरण आहेच ना. साधा पोस्टमार्टमचा रिपोर्ट ही आजपर्यंत आलेला नाही. मुंडे परिवार काही बोलतोय का ? सत्ता ही सर्व काही व सर्वस्व आहे. गेलेला व्यक्ती मग तो बाप असो, भाऊ असो, नवरा असो अथवा अन्य कुणी ही असो. तो परत येणार नाही. मग जो येणारच नाही त्याच्यासाठी हाती असलेली सत्ता का सोडायची ? हे न कळणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे. शरद पवार व गोपीनाथ मुंडे हे राज्यातील दोन प्रमुख परिवार आहेत. ते हा मूर्खपणा का करतील.

विमान अपघात की घातपात, अजित पवारांची हत्या की अपघाती मृत्यू याची चर्चा खूप झालेली आहे. आता ही प्रसंगानुसार होत आहे. पण राज्याचे फार मोठे नुकसान झाले. पोकळी भरून निघणार नाही, अशी विधाने त्यावेळी केली गेली. खरे तर त्यात दम नव्हता. एक म्हणत होता, म्हणून दुसरा म्हणत होता. एखाद्याचा मृत्यू झाल्यावर तसे म्हणण्याची एक पद्धत आहे. रितच पडली आहे आपल्या समजात. अजित पवारांच्या अनुपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थ संकल्प मांडला. या अगोदर 2019 पासून अजित पवार मांडत होते. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा, युवकांना बेरोजगारीच्या खाईत लोटणारा, शिक्षण व्यवस्थेला व्हेन्टेलिटर वर पोहचविणारा अर्थ संकल्प हा दोघांच्या अर्थसंकल्पातील कॉमन दुवा. त्यामुळे अमुकांच्या जाण्याने राज्याचे नुकसान झाले, या म्हणण्यात तसा काही अर्थ राहिला नाही. हा फरक पडेलच तर तो आमदारांना निधी वाटप करण्यात पडेल. अजित पवार अर्थमंत्री म्हणून आपल्या जवळच्या आमदारांना अधिक निधी देत होते. आता फडणवीस आपल्या जवळच्या आमदारांना देतील. नुकसान झालेच असेल तर या आमदारांचे झालेले असेल. बाकी शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजित पवार अर्थमंत्री असताना ही होत होत्या. अन अर्थ संकल्प फडणवीस यांनी मांडल्यानंतर ही होणारच आहेत.
राज्यातच काय देशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. हे स्पष्ट करणाऱ्या घटना रोज देशभरात घडत असून या देशातील प्रत्येक नागरिक याचा शिकार आहे. आपल्याला नको असणाऱ्या नेत्यांना विमान अपघातात मारले जात आहे. त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावून त्यांना मजबूर करून सोबत घेतले जात आहे. प्रचंड भ्रष्ट्राचार करणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. अजित पवार हेच याचे एक उत्तम उदाहरण आहे. असे अनेकजण आहेत. ज्यांनी भ्रष्ट्राचार केला. संविधानबाह्य काम केले, ते जेलमध्ये असायला हवे होते. पण ते सरकारमध्ये आहेत. मंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. खूप उदाहरणे आहेत. खुद्द देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे लोकनियुक्त सरकार घटनाबाह्य पद्धतीने पाडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. देशातील सर्वोच्च न्याय व्यवस्थेने यावर जाहीर ताशेरे ओढले आहेत. पण हे दोघे ही आज सत्तेत आहेत. एक मुख्यमंत्री तर दुसरा उपमुख्यमंत्री आहे. सुनेत्रा पवार यांच्यावर ही 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. चौकशीत त्या दोषी ही आढळल्या आहेत. हा घोटाळा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शोधून काढला आहे. आज सुनेत्राजी त्यांच्या सहकारी उपमुख्यमंत्री आहेत. पार्थ पवार जो राज्यसभेत खासदार म्हणून जात आहे, त्याच्यावर ही महार वतनी जमीन खरेदीचा गंभीर गुन्हा आहे. चौकशी सुरु आहे.
या अशा राजकीय परिस्थितीत व वातावरणात सुसंस्कृत राजकारण करणे, कल्याणकारी व कायद्याच्या राज्याची भाषा करणे, त्यासाठी जन आंदोलन उभे करून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे, सवाल करणे हाच अपराध झालेला आहे. पण कायद्याच्या राज्यासाठी तो अपराध करणे हेच राज्य व देशाच्या हिताचे आहे. ज्यांची लोकशाही, संविधान व कायद्याच्या राज्यावर निष्ठा आहे. ते हा अपराध करतील. करीत ही आहेत.
………………
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
0Shares