यांना भीती वाटते कि मी जयंतीचा रंग उडवून टाकीन,
तुमच्या समाजाला,अज्ञानाच्या कुंपणात सुरक्षित ठेवा,
नाहीतर,
बाबासाहेबांच्या विचारांचं अमृत पाजून मारून टाकीन.
यांना भीती वाटते कि मी यांचं अस्तित्व पुसून टाकीन,
मला ही बदनामीच्या साखळदंडात बांधून ठेवा,
नाहीतर,
समतेची,बंधूतेची आग लावून टाकीन.
यांना भीती वाटते कि मी यांचा बुरखा फाडून टाकीन,
स्वतःला ,अंधभक्तांच्या कोंडोळ्यात डाळून ठेवा,
नाहीतर,
स्वातंत्र्याच्या,न्यायाच्या बंदूकीने उडवून टाकीन.
यांना भीती वाटते कि मी धम्माचं गाणं लावून टाकीन,
नंगा नाच करतांना डिजेचा आवाज थोडा वाढवूनच ठेवा,
नाहीतर,
पंचशीलेच्या समुद्रात बुडवून टाकीन.
यांना भीती वाटते कि मी यांना ३६५ दिवस बाबासाहेबांच्या विचारांवर चालायला लाविन,
दोन दिवस नाही वर्षंभर बाबासाहेबांच्या विचारांची जयंती,
आचरणातून निर्भिड पणे साजरी करा,
नाहीतर…!!!
डिजेचा आवाज खरंच वाढवून ठेवा,त्यांत तुमचा रडण्याचा आवाज लोकांना ऐकू येणार नाही,जेव्हा मी नाचतांनाच तुडवून टाकीन.
कांबळे सर