• 150
  • 3 minutes read

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

      १४० कोटी लोकसंख्येच्या देशात २७ लोकांना आपले स्वतःचे प्राण अडचणीत घालून मारणे हा पहलगाम हल्ल्याच्या मागचा अतिरेक्यांचा व त्यांच्या अतिरेकी संघटनांचा उद्देश मुळीच असू शकत नाही. असा उद्देश ही अतिरेकी कारवाईचा कधीच नसतो. तर धार्मिक तेढ वाढवून देशभर गृह युद्ध माजविणे, तसे वातावरण तयार करून देशाच्या एकता, अखंडतेला कमजोर करणे, हा मुख्य उद्देश असतो. मोदीच्या नेतृत्वाखालील संघी सरकार हिंदू मुस्लिम याच मुख्य अजेंड्यावर काम करीत असल्याने अतिरेक्यासाठी ही फायद्याची गोष्ट व सुपीक जमीन आहे. पुलवामा व पहलगाम सारखी एक अतिरेकी घटना घडवून आणायची, शांत बसायचे, बाकी पुढचे सर्व कार्य धर्मांध विचाराचे मोदी सरकार, सारा संघ परिवार, त्यांच्याकडे असलेल्या धार्मिक अंधभक्तांच्या फौजा करायला सज्ज असतात. हे अतिरेक्यांना माहित आहे. आज नेमके तसेच होताना दिसत आहे. याचाच अर्थ अतिरेकी आपल्या अजेंड्यावर यशस्वी होत आहेत, तर हिंदू मुस्लिम धार्मिक द्वेष हा राजकारणाचा मुख्य आधार असलेला संघ व भाजप ही या अशा हल्ल्यानंतर आपला धार्मिक द्वेषाचा अजेंडा अधिक घट्ट करायचा प्रयत्न करताना दिसत आहे. भाजप, संघाच्या नेत्यांची वक्तव्य, गोदी मिडियाची आरडाओरड अन भाजपच्या आय टी सेलची भूमिका या अतिरेकी हल्ल्याचा फायदा मोदीला बिहार निवडणुकीत कसा मिळेल यासाठीच राहिली आहे. अन् या दुदैवी घटनेचा वापर बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच मोदी करणार यात शंका ही नाही. पुलवामाने हे दाखवून ही दिले आहे. अतिरेकी घटनेनंतर देशात धार्मिक तेढ वाढली पाहिजे, ही अपेक्षा या हल्ल्या मागची असते. मोदी सरकार ती पूर्ण करीत आहे.

  • २००२ मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व तत्कालिन गृहमंत्री अमित शहा या दोघांना मानवतेच्या विरोधातील धोकेदायक चेहरे म्हणून जाहीर केले होते. समस्त मानवी समाजासाठी हे दोघे धोकेदायक आहेत. पण आज याच दोघांच्या हातात देशाच्या सत्तेची सूत्र आहेत. मग हा देश सुरक्षित हाती कसा असेल ?
  • स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काश्मिरी नागरिक नजाकत भाईंनी भाजप युवा मोर्चाचे नेते अरविंद व त्यांच्या परिवाराचे प्राण वाचविले. नजाकत भाईंनी अरविंद यांचा पक्ष पहिला नाही धर्म विचारला नाही, की माथ्यावरील तिलक पाहिला नाही. मग मोदी व त्यांचे अंधभक्त टोपी अन् दाढी का पाहतात ?
  • अतिरेकी धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घालीत होते, त्याच वेळी काश्मिरी नागरिक सय्यद आदिल शाह, नजाकत भाई व झंतू अली भारतीय नागरिकांचे कर्तव्य म्हणून त्याच पर्यटकांचे जीव स्वतःचे प्राण धोक्यात घालून वाचवित होते. त्यांच्या धाडसाला सलाम…!यात झंतू अली यांना तर आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले. त्यांना विनम्र अभिवादन…!!

        मात्र पहलगाम घटनेनंतर संपूर्ण काश्मीर घाटीतील मुस्लिम समाजाने या अतिरेकी कृत्यांची निंदा केली आहे. या दुर्देवी घटनेत जे जखमी झाले त्यांना मदत केली, जे अडचणीत आहेत, घाबरले आहेत, त्यांना आश्रय दिला. आम्ही सोबत आहोत,अशा दहशतीच्या वातावरणात देशातील हिंदू मुस्लिम जनता एक आहे, असा भरवसा दिला.या हल्ल्यानंतरचा काश्मिरी जनतेचा मानवीय चेहरा देशभरातील जनतेला आपला व हवाहवासा वाटू लागला आहे. संकटाच्या काळात देशातील जनता धर्म, जाती व पंथ भेद विसरून एक आहे, हा संदेश काश्मिरी जनतेने जगभराला दिला. हा संदेश अतिरेक्यांचे मनसुबे उधळून लावणारा जसा आहे, तसाच हिंदू मुस्लिम अजेंडा चालवून सत्तेचे राजकारण करणाऱ्या संघ, भाजप व मोदीचे मनसुबे ही उधळून लावणारा आहे.
      पहलगाम हमला भारत माता की आत्मापर किया गया हमला है…!, आतंकवादीयों को मिट्टी मे मिलाने का समय आ गया है…!,आणखी ही अशी काही विधाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केली आहेत. आतंकी हल्ल्यात २७ जणांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यांच्या चिता अद्यापही विजल्या नाहीत, तोवर त्यांच्या बलिदानाचे भांडवल करून हिंदू धर्माचे स्वयंघोषित ठेकेदार बिहारमध्ये मतांची भीक मागू लागले आहेत. निर्लज्जपणाचा हा किळसवाणा कळस आहे. खरे तर घटनास्थळी जावून देशातील जनतेला विश्वास द्यायचा सोडून मोदी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी गेले, अन् तेथे या हल्ल्यात बलिदान देणाऱ्या नागरिकांच्या बलिदानाचा सौदा करीत मतं मागितली. या सर्व प्रकारामुळे ६ वर्षांपूर्वी झालेला पुलवामा हल्ला व शहीद झालेल्या जवानांच्या शवपेट्या, त्या जवानांच्या घरातील विलाप, हंबर्डे आज पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले. कारण आज तसेच चित्र देशभर दिसत आहे. देश फक्त बोलण्यापुरता सुरक्षित हातात आहे, बाकी मोदींच्या सत्ताकाळात एक नव्हे तीन चार डझन अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत.
          पहलगाम हल्ला दिसायला आतंकवादी हल्ला असला तरी वस्तुस्थिती यासंदर्भात अनेक प्रश्न उभे करीत आहे . विषय संवेदनशील असल्याने विद्यमान परिस्थितीत सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, ही गरज असली तरी वस्तुस्थितीला नजरअंदाज करून चालणार नाही. कारण त्यामुळे काळ सोकावेल. अन् तेच होत ही आहे. वस्तुस्थिती आज मोदी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत आहे. पहलगाम येथील मिनी स्विझरलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेसारन भागात देशी विदेशी पर्यटक सतत येत असल्याने या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी असणारा बंदोबस्त अचानक का हटविला गेला ? केवळ तीनच आतंकवाद्यांनी या घटनेला अंजाम दिला आहे. या भागात पुरेसा बंदोबस्त असता तर या ठिकाणी येवून गोळीबार करणे अतिरेक्यांसाठी अशक्य गोष्ट होती. देश सुरक्षित हातात आहे, असा नारा देत स्वतःची पाठ स्वतःच थोपटणाऱ्या मोदी सरकारने हा बंदोबस्त का हटविला ? हा प्रश्न या देशातील जनता आता रस्त्यावर उतरून मोदी सरकारला विचारत आहे. ती काही चुकीचे करतेय असे नाही.

पुलवामा अतिरकी कारवाईबद्दल मोदी काहीच का बोलत नाहीत…?

      या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय बैठकीत ही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या प्रश्नांवर सरकारची कोंडी केली. पण सरकार समाधानकारक उत्तर देवू शकले नाही. विरोधी पक्षांच्या या प्रश्नाचा कुठल्या तोंडाने मुकाबला करायचा म्हणून मोदी बैठकीपासून दूरच राहिले. आपल्याच देशात तोंड लपविण्याची वेळ मोदींवर आली असून देशाचे गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथसिंह मात्र निर्लज्जपणे या बैठकीस उपस्थित होते. अन् सुरक्षेच्या बाबतीत चूक झाल्याचे सरकारने मान्य ही केले. पण नैतिकता म्हणून जबाबदारी स्वीकारली नाही. संघ, भाजपला काहीही करून सत्ता हवी आहे. त्यासाठी काहीही करायची तयारी या शक्तींची आहे. दुसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी पुलवामा आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा भावनिक वापर करून मोदीने सत्ता मिळविली होती. मात्र आपल्या या सत्ताकाळात पुलवामा घटनेतील अतिरेक्यांना पकडून त्यांना सजा देण्याचे काम मोदी करू शकले नाहीत. हे न करण्यात त्यांची काय मजबुरी आहे, हे पहलगाम आतंकी हल्ला होईपर्यंत समजलेले नाही. तसेच पुलवामा अतिरेकी कारवाईबद्दल संघ, भाजप व मोदी काहीच का बोलत नाहीत, हा एक प्रश्न आहे.
      संविधान, लोकशाही व्यवस्थेला विरोध व हिंदू राष्ट्राचा अजेंडा घेवून पाशवी बहुमताच्या जोरावर मोदीच्या संघी सरकारने देशाची लुटमार चालविली आहे. हिंदू मुस्लिम अजेंडा चालवून संपूर्ण देश नफरतीच्या खाईत लोटून दिला आहे. सरकार हवे तेव्हा हा मुद्दा घेवून देशात अराजकता माजविण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. सरकार सोबत जातीय व धार्मिक व्यवस्थेवर अंधविश्वास असलेली एक मोठी फौज उभी आहे. तीच संघ व भाजपच्या या अजेंड्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करीत आहे. दुसऱ्या बाजूने अदानी व अंबानी यांचे न्यूज चॅनेल व त्यावरील दलाल अँकर आहेत. या सर्व दलालांना या प्रकरणी काश्मिरी जनतेने पळवून लावले आहे, तर जे परिवार या हल्ल्यात पिडित आहेत, त्यांनी ही अशा दुर्दैवी घटनेला मोदी सरकारची निती, हिंदू मुस्लिम अजेंडा व त्या अजेंड्याला आपल्या फायद्यासाठी पुढे रेटणाऱ्या गोदी मिडियाला जबाबदार धरले आहे.
      या अतिरेकी हल्लामुळे देशाच्या संरक्षण व्यवस्थेची पोलखोल झाली आहे. देश सुरक्षित हातात नाही, हे ही सिद्ध झाले आहे. या हल्ल्यात अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या. अतिरेक्यांनी हा फॉर्म्युला पहिल्यांदा वापरला असून तो त्यांनी संघ, भाजपकडून उचलला आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की, संघ, भाजप व अतिरेकी संघटना एकाच फॉर्मुल्यावर काम करीत आहेत. पण त्या पेक्षा ही भयंकर चित्र या हल्ल्यानंतर धर्मांध शक्ती देशाच्या समोर धार्मिकतेचे राजकारण करून उभे करीत आहेत. अशा संकटाच्या काळात देश एकसंघ उभा आहे, हा संदेश देशातील जनता देत असताना धर्म व जातीच्या नावाने देशाचे विभाजन करण्याचा सावरकरी व संघी अजेंडा मोदी सरकार पुढे रेटत आहे.
      आपल्या घरातून मार्केटपर्यंत जाण्यासाठी काश्मिरी जनतेला अनेक चेकपोस्टचा सामना करावा लागतो. आपल्याच देशात संशयित अतिरेकी म्हणून काश्मिरी नागरिकांना जगावे लागत आहे. मग देशाच्या सुरक्षित सीमा ओलांडून हे अतिरेकी पहलगाम, बैसारन भागात सशस्त्र घुसलेच कसे ? हा प्रश्न स्वतः काश्मिरी जनता उपस्थित करीत आहे. दोन दोन हजार पर्यटक ज्या ठिकाणी येतात, तेथे एक पोलिस ही तैनात नसावा, या मागचे कारण काय असावे ?, घटनेच्या अगोदर आठ दिवसांपूर्वीचा काश्मिरचा नियोजित दौरा मोदीने अचानक रद्द का केला होता ? काश्मीरमध्ये काहीतरी घडणार असल्याची आशंका सरकारला अगोदरपासूनच होती, त्याबाबतचे काही ट्विट भाजपच्या सोशल मिडियावरून वायलर ही झालेले आहेत. ही वस्तुस्थिती असून हे सारे खरे असेल तर ही अतिरेकी कारवाई ही बिहार विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नियोजित असू शकेल का ? हा प्रश्न आज पडतोच. यासंदर्भात जाहीर भाष्य करणे योग्य नसेल ही. पण देशातील जनतेच्या मनात ही शंका आहे. अन् ती अनाठायी ही नाही.
………..

– राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश

0Shares

Related post

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना मृत्यदंड…?

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना…

       मालेगाव बॉम्बस्फोट नुसती एका स्फोटाची घटना नाही, तर देशातील २० कोटी जनतेला देशविरोधी…
निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा.         जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड…
धर्म पुछ्कर हत्या करने का संघी और मोदी अजेंडा आतंकीयो ने कैसे अपनाया…?

धर्म पुछ्कर हत्या करने का संघी और मोदी अजेंडा आतंकीयो ने कैसे अपनाया…?

देश के मातम के माहोल को संघ और मोदी सरकार जिम्मेदार…!        पुलवामा के…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *