- 34
- 1 minute read
अनंत लाला सोनवणे
आम्ही सर्व आमच्या थोरल्या चुलत्याला दादा म्हणायचो.
त्यांचे नाव अनंत लाला सोनवणे. ते आमच्या सोनवणे कुटूंबात जेष्ठ होते. दादांच्या पाठीवर माझे वडील जन्माला आले आणि त्यानंतर त्यांच्या सात बहिणी आणि एक भाऊ…
आमचे दादा हे शालेय जीवनात हुशार विद्यार्थी म्हणून गणले जायचे . वर्गात त्यांचा नेहेमी प्रथम क्रमांक यायचा . ते शाळेत शिकत असताना गणित आणि विज्ञान हा त्यांचा आवडता विषय होता .
दादा हे घरातील मोठे असल्यामुळे त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी आपसूक येवून पडली . वडील गावकामगार , घरी थोडी शेती . त्यामुळे आमच्या दादानी शिक्षकी पेशा स्वीकारला . ते वयाच्या 19 व्या वर्षी शिक्षक म्हणून कामाला लागले . अभ्यासू , जिज्ञासू असणारे आमचे दादा शिक्षकी पेशात रमले .
दादा चा आवाज मोठा होता . ते शब्दाचा उच्चार स्पष्ट करायचे . दादा शाळेत शिकवत असताना वर्गातील शेवटच्या मुलापर्यंत त्यांचा आवाज पोहोचायचा ; नव्हे वर्गाबाहेर ऐकू जायचा .
आमच्या दादांचा पेहराव म्हणजे धोतर आणि पांढरा सदरा.. शेवट पर्यंत त्यांचा हात पेहेराव होता . दादांनी धोतर सदारा ऐवजी पॅन्ट शर्ट घालावे असे माझ्या वडिलांचे म्हणणे होते . त्यांनी दादांना पॅन्ट शर्ट घेवून दिली पण त्यांना तो ड्रेस भावाला नाही .
दादांना पुस्तकं वाचायची आवड होती . ते आमच्याकडे आले की आमच्या घरातील ग्रंथालयातील पुस्तकांचा धुंडाळा घेत . त्यातील एखादे धार्मिक पुस्तकं काढत . आमच्या घरा समोर मोठे आंगण होते . आंगणात अशोकाचे दोन मोठे वृक्ष होते . त्याच्या दाट सावलीत सतरंजी आंथरायला ते मला सांगत आणि वृक्षाच्या बुंध्याला उशी लावून दादा पुस्तकं वाचत बसतं . पुस्तक वाचताना त्यांना चहा लागत असे . दादा निरोगी होते . त्यांना डायबेटिस , BP नव्हता . त्यांना पुस्तक वाचताना घटबंड्या दुधाचा गोड चहा हवा असायचा. चहा झाला की पान आणि तंबाखू ..
दादा बौद्ध धम्मातील अभिधम्माचे तसेच हिंदु धर्म तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते . त्यांनी या विषयावरील अनेक मराठी व हिंदी लेखकांची पुस्तकं वाचली होती . त्यांच्यावर महायानी बौद्ध धर्माचा मोठा पगडा होता . त्यांना महायानी तत्वज्ञान आवडायचे . त्यावर ते माझ्या वडीलांसोबत तासन तास चर्चा करायचे . माझ्या वडीलांना त्यांचा एखादा मुद्दा खटकला की मग त्या दोघात वाद व्हायचे . भावा -भावाचा रंगलेला वाद ऐकताना आम्हाला गम्मत वाटायची .
कवीमनाच्या दादांनी बऱ्याच कविता लिहिल्या. त्या कवितांचा आशय -विषय बौद्ध धम्मातील अभिधम्म होते .
दादा रसीक होते . त्यांना तरुणपणी सिनेमा बघायचा नाद होता , खाण्याचा -पिण्याचा छंद होता ; तो छंद शेवटपर्यंत त्यांनी जोपासला .
दादांना मांसाहार त्यांना प्रचंड आवडायचा. रोज मटण -मासे असले तरी ते त्या आहारावर ते कंटाळत नसत . किचन मध्ये डोकावून माझी आई काय स्वयंपाक करायला लागली ते बघायचे . दाळ किंवा भाजी असली की ते खवळायचे. शिजणाऱ्या मटणाच्या गंधाने त्यांच्या चेहेऱ्याव आनंद स्पष्ट जाणवायचा .
दादांचा मुलगा आमच्या घरा जवळ रहातो . दादा त्याच्या कडे आले होते . कोरोणा काळ संपला होता . माझ्या तोंडावर मास्क बघून ते चिडले . मी आणि माझा धाकटा चुलता , भाऊ असे आम्ही त्यांना रात्री भेटायला गेलो . त्यांचा 84 वाढदिवस आम्ही घरगुती पद्धतीत साजरा केला . केक कापला . दादांनी त्यांच्या शालेय तसेच , शिक्षकाचे ट्रेनिंग घेत असतानाचे त्यांच्या शिक्षकांचे किस्से सांगितले . कविता म्हटल्या . त्यांची स्मरणशक्ती बघून आम्ही सर्व आवाक झालो होतो .
मुलाकडे काही दिवस राहिल्या नंतर दादांना गावी , कसबे तडवळे ला जाण्याची ओढ लागली . ते गावी गेले . आणि नंतर त्यांना न लागण झालेल्या कोरोणाचे निमित्त होवून ते अनंतात विलिन झाले .
चिन मधिल बीजिंग शहरातील विद्यापीठांत बौद्ध लेणी , शिल्पकला या विषयाचे शिक्षण घेतलेले माझे भाचे बौद्ध धम्माचे अभ्यासक आयु .लंकेश्वर यांनी दादा कविता म्हणताना व्हिडीओ क्लिप घेतली होती . तसेच एक सेल्फी घेतला होता . त्या सेल्फी मधून कॅाप केलेला दादांचा शेवटचा फोटो