.... अब समाजवादी पार्टी अखिलेश यादवजी के नेतृत्व मे " सडके खामोश और संसद को आवारा होने नहीं देंगे...."!
अमित शहा… भारतीय समाजात राहण्याच्या लायकीचा नाही. या समाजकंटकापासून समाजला धोका आहे, त्यामुळे तडीपार करण्याचा आदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने दिला होता, त्या तडीपारने आज भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. यामुळे देशभर हंगामा सुरु असून संसद से सडकतक जनता अमित शहाचा राजीनामा मागत आहे. वैफल्यग्रस्त अवस्थेतून शहाने केलेल्या विधानाचा निषेध करीत समाजवादी पार्टी ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर के सन्मान में समाजवादी मैदान में ” हा नारा देत मैदानात उतरली आहे.
समाजवादी अधिवक्ता सभेच्या वकिलांनी लखनऊमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर संविधान वाचविण्याची शपथ घेत, अमित शहाचा निषेध केला.
परभणीत झालेल्या संविधान अवमानाचा व त्यानंतर पोलिस अत्याचारात बळी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या हत्येचा निषेध करीत समाजवादी पार्टीचे मुंबई / महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आजमी यांनी नागपूर अधिवेशनात ” मै समाजवादी, मै आंबेडकरवादी ” हा नारा देत आपल्या पुढील संघर्षाची दिशाच स्पष्ट केली. महापुरुषांचा अवमान व अपमान यापुढे सहन केला जाणार नाही, असा ही इशारा त्यांनी धर्मांध उन्माद माजविण्याचे काम करणाऱ्या शक्तींना दिला.
अमित शहाने वैफल्यग्रस्त अवस्थेतून केलेल्या वक्तव्याचा समाजवादी पार्टीच्या राज्यसभा सदस्या जया बच्चन यांनी समाचार घेतला. तर पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपल्या सहकारी लोकसभा व राज्यसभा सदस्यांना घेवून संसद भवन दणाणून सोडले आहे. समाजवादी पार्टीची अधिवक्ता सभा ही या संघर्षात मागे राहिली नाही. अधिवक्ता सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्ण कन्हैया वर्मा व राष्ट्रीय सचिव संदीप यदुवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वकिलांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करीत संविधान वाचविण्याची लखनऊ येथील अवध बार असोशियसन येथील लायब्ररीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला साक्षी ठेवून शपथ घेतली. सर्वच मोर्चावर समाजवादी पार्टी फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात संसद से सडकतक संघर्ष करताना दिसत आहे.
अगर सडके खामोश हो जाय तो संसद आवरा बन जायेगी, यह डॉ. राम मनोहर लोहियाजी का नारा जो समाजवादीयों को याद है….! अब समाजवादी सडके खामोश और संसद को आवारा होने नहीं देंगे….!!