अमेरिकी व्हाइट हाऊस मध्ये दक्षिण भारतीय महिलांचा उष:काल !
डोनाल्ड ट्रम्प 47 वे राष्ट्रपती म्हणून विराजमान.उपराष्ट्रपती पदावर जे डी वेंस. उपराष्ट्रपती यांच्या 39 वर्षीय पत्नी श्रीमती उषा चिलुकुरी वेंस या दाक्षिणात्य भारतीय वंशाच्या. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस बाहेर पडताना उषा दुसरी अमेरिकेची दूसरी लेडी ठरली आहे. या अर्थाने जगातील सर्वाधिक सशक्त देशाच्या शिखर राजकारणात भारतीय वंशाच्या महिलांचा उष:काल झाला असे म्हणायला पुरेसा वाव आहे.
कमला हॅरिस यांचे पूर्वज तमिळनाडूचे होते. श्रीमती उषा चिलुकुरी वेंस यांचे पैतृक मूळ आंध्रप्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील वडलुरू गाव. आई वडील अमेरिकेतील कॅलिफ़ोर्नियात स्थायिक झालेले. या जोडप्याला उषा आणि त्यांची एक बहीन दोन मुली. सॅन दिएगो येथे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण येले येथे. पुढे येले विद्यापीठात विधी विषयात पदवी शिक्षण. शिक्षण सुरु असतानाच अमेरिकी तारूण जे डी वेंस यांच्याशी भेट झाली, मैत्री बनली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि 2014 मध्ये केंचुकी येथे दोघे विवाहबद्ध झाले.
या तरूण जोडप्याला तीन अपत्ये आहेत. दोन मुले आणि एक मुलगी. इवान, विवेक ही मुले तर मिराबेल मुलगी. काल जे डी वेंस या त्यांच्या नव-याचा उपराष्ट्रपती पदाचा शपथविधी होताना श्रीमती उषा चिलुकुरी वेंस गुलाबी पेहरावात काखेत त्यांची लहानगी मुलगी मिराबेल हिला घेवून आनंदीत होवून प्रेम भरल्या कौतुकाने नव-याकडे पाहतानाचे दृष्य दूरचित्रवाणीवर पाहता आले. हे दृष्य खरोखर सुंदर आहे. यावेळी एका हाती बायबल आणि दूस-या हातात त्यांची मिराबेला मुलगी याप्रसंगीचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्य.
जे डी वेंस यांना पद-गोपनीयतेची शपथ देणारे अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ब्रेट कवनाफ श्रीमती उषा चिलुकुरी वेंस यांचे मेंटर राहिलेले. उषा यांनी या न्यायाधीश महोदयांकडे लिपिकाचे काम केलेले. उषा वकीली व्यवसायाचे काम करत असतानाच नव-यासोबत राजकारणात सक्रीय.
कमला हॅरिस आणि आता श्रीमती उषा चिलुकुरी वेंस या दोन्ही महिला भारतीय वंशाच्या. दोघीही दक्षिण भारतीय हे विशेष. उषा भारतीय वंशाची हिंदू राजकारणी महिला म्हणून स्वत:ची ओळख ठेवून असतानाही नव-याचा उपराष्ट्रपती पदाचा शपथविधी सोहळा पार पडत असताना एका हातात बायबल घेवून समारंभात झळकत होत्या.