गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या निमित्ताने अर्नाळा येथील महात्मा गांधी स्मारक जी जागा पवित्र वैतरणा संगमाची असून जिथे 8 फेब्रुवारी 1948 रोजी महात्मा गांधीजीं च्या अस्थिंचे विधिवत विसर्जन करण्यात आले होते आणि 2 ऑक्टोबर 1956 रोजी हे स्मारक उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी वसई तील काँग्रेस पक्षातील आणि विविध सामाजिक संस्थेतील पदाधीकाऱ्यांनी महात्मा गांधीजींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे समीर सुभाष वर्तक, माजी सरपंच टोनी डाबरे, संविधान समितीचे दत्ता धुळे, प्रकाश कांबळे, काँग्रेसचे अम्मार पटेल, रवी भूषण, सनी गुरव, आमिर देशमुख, शहझाद मलिक, संदीप किणी, आमिर सय्यद, संजय पाटील, संकेत वसईकर, हेनरी कोरिया, शाहिद शेख, तारिक खान, देवा तरे, जितू पाटील, सचिन कुडू, साजिद खान, मौलाना जिया उल हक, मौलाना जमील हाश्मी , वसीम खान, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.