आर्थिक 401 minute read अल्फाबेट (गुगलची कंपनी) तीन ट्रिलियन डॉलर्स बाजार मूल्याच्या ( Market Capitalisation) क्लब मध्ये चौथा सभासद. 3waysmediadmin February 2, 2024 Post Views: 42 अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि एनव्हिडिया या तीन कंपन्यांचे बाजार मूल्य आधीच तीन ट्रिलियन डॉलर झाले आहे. अल्फाबेट कंपनीचे काल क्रॉस झाले. (भारतातील सर्व कंपन्यांचे मिळून बाजारमूल्य साडेचार पाच ट्रिलियन डॉलर्स आहे. म्हणजे वरील चार कंपन्यांपैकी फक्त दीड कंपन्या…)या चार कंपन्यांशिवाय ऍमेझॉन, मेटा आणि टेस्ला अशा फक्त सात कंपन्याचे बाजारमूल्य अमेरिकेतील वॉल स्ट्रीटच्या एकूण बाजार मूल्याच्या २० ते २२ टक्के भरते. फक्त सात कंपन्या! अमेरिकेत मक्तेदार भांडवलशाही आधीच होती. आता अमेरिकेत “ओलीगार्क”चे राज्य सुरू झाले आहे असे जे म्हटले जाते त्याचे अर्थ लागतात अमेरिकेबद्दल ची माहिती कशासाठी घ्यायची ? फक्त अकादेमिक ज्ञान म्हणून नाही. पुढच्या दहा वर्षातील भारताचे कल्पनाचित्र समोर येण्यासाठी मदतकारक ठरते म्हणून. ज्याची सुरुवात आधीच झाली आहे. मक्तेदार भांडवलशाही ही शुद्ध आर्थिक प्रणाली नाही. ती राजकीय प्रणाली देखील आहे. संजीव चांदोरकर Facebook 0 WhatsApp Messenger Twitter 0 Print 0Shares