ममदानी यांना मिळालेली मते: ५०.४ टक्के स्वतंत्र उमेदवार अँड्र्यू क्यूमो यांना मिळालेली मते: ४१.६ टक्के रिपब्लिकन सिल्वा यांना मिळालेली मते: ७.१ टक्के
अँड्र्यू क्यूमो आणि सिल्वा हे दोघेही एकच कॉर्पोरेट वित्त भांडवल केंद्री राजकीय आर्थिक विचारसरणी मानणारे आहेत.
त्या दोघांच्या मतांची बेरीज: ४८.७ टक्के
म्हणजे दोघांपैकी एकाने माघार घेतली असती तर तर त्याला मिळालेली मते ममदानी यांचा पराभव करण्याच्या striking range मध्ये येऊ शकली असती
जगभर कॉर्पोरेट वित्त भांडवल धार्जिण्या राजकीय शक्ती, जनकेंद्री राजकीय विचारधारा मानणाऱ्या गरीब / निम्न मध्यमवर्गीय मतदारांच्या मतांमध्ये, जात, धर्म, इतर आयडेंटिटी आधारित विभागणी होईल, अशी स्ट्रॅटेजी आखतात.
ममदानी यांच्या विजयात प्रस्थापित वर्गाच्या पाठीराखे असणाऱ्या मतांमध्ये विभागणी झाली. आणि गरीब/ निम्न मध्यमवर्गीय मतांमध्ये विभागणी होणार नाही हे बघितले गेले.