- 72
- 1 minute read
अहंकारी मोदी शरद पवारांशी राजकीय नेता म्हणून नव्हेतर मालकांचे मित्र म्हणून सौजन्याने वागतात…!

अहंकारी मोदी शरद पवारांशी राजकीय नेता म्हणून नव्हेतर मालकांचे मित्र म्हणून सौजन्याने वागतात…!
मोदी अहंकारी अन घमेंडी राजकारणी व सत्ताधीश आहेत, हा कुणी केलेला आरोप नाही. आपल्या वर्तनाने हे मोदीनीच हजारो वेळा सिद्ध केले आहे. संसदेसारख्या लोकशाहीच्या पवित्र मंदिर ते सार्वजनिक ठिकाणच त्यांची वर्तने याची साक्षी – पुरावे देत आहेत. राजधर्माचे पालन न करणाऱ्या मोदींना अडवाणीने हमेशा साथ दिली. गुजरात दंगलीनंतर देशच नव्हेतर सर्व जगापुढे आदमखोर ठरलेल्या मोदीची साथ सर्वानी सोडल्यानंतर केवळ बाळासाहेब ठाकरे व अडवाणीचा वरदहस्त मोदींवर राहिला. पण मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली तर संधी मिळेल तेव्हा अगदी जाहीरपणे अडवाणीचा अवमान व अपमान केला. मात्र अहंकारी व घमेंडी मोदी शरद पवार यांच्यासोबत सतत सौजन्याने वागत आहेत, त्यांचा नेहमीच सन्मान करीत आहेत. या मागचे राजकारण काय ? हा प्रश्न अनेकांना पडतो. अन याचे उत्तर गौतम अदानी व मुकेश अंबानी आहेत. हे दोन गुजराती व्यवसायिक या दोघांमधील दुवा आहेत. मोदींचे मालक असलेल्या अदानी व अंबानीचे शरद पवार हे मोदीला राजकारणातील ” रा ” ही कळत नव्हता, तेव्हापासून मित्र आहेत. त्यामुळेच मालकधार्जीने मोदी शरद पवारांशी सौजन्याने वागतात व नेहमीच सन्मान करतात. पण पवारांचे फँटर यास ” बाप, बाप होता है, ” असे म्हणतात.
सन 2014 साली सत्तेवर आल्यापासून मोदींने शरद पवारांचा एकमेव अपवाद सोडला तर कुठल्याच राजकीय नेत्यांचा मान ठेवला नाही अथवा राखला नाही. गांधी, नेहरू परिवाराशी तर खानदानी वैर असल्यासारखेच मोदी वागत आहेत. राहुल गांधी अन सोनिया गांधी यांच्या विषयी तर अनेक वेळा अभद्र वक्तव्य केलेले आहे. आज ही ते हेच करीत आहेत. मात्र शरद पवारांबद्दल मोदी कधीच अभद्र बोलत नाहीत. अन शरद पवार ही मोदी अथवा भाजप व संघा विरोधात बोलताना दिसत नाहीत. कधी दिसलें नाहीत.
आपल्या एक दशकाच्या सत्ताकाळात भारतीय संसदीय राजकारणाच्या सर्व परंपरा पायदळी तुडविण्याचे काम जाहीरपणे अन सत्तेचा गैरवापर करून मोदींने केले आहे. घटनाबाह्य पद्धतीने व जनमताचा अनादर करून विरोधकांची सरकारे पाडली आहेत, अन स्वपक्षाची सरकारे स्थापन केली आहेत. पण या विरोधात शरद पवार कधीच भाजप व मोदींच्या विरोधात ठामपणे उभे राहिल्याचे दिसले नाहीत.इतकेच काय शरद पवारांनी दुसऱ्यांदा काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फोडून शरद पवारांना राजकीय दृष्ट्या बर्बाद केले आहे. पवारांच्या सहा ते सात दशकाच्या राजकीय कार्यकीर्तीवरून नांगर फिरविण्याचे काम मोदींने अगदी घटनाबाह्य पद्धतीने केले, तरी पवार साहेबांनी हु की चू केले नाही. मोदींचा जाहीर विरोध केला नाही. मोदी विषयी मनात कसली आढी धरली नाही, जसे काही मोदीला हवे तेच घडते आहे, असेच पवार साहेबांचे या राष्ट्रवादीच्या फुटीत ही भुमिका राहिली आहे. त्यामुळे मोदीं ही सौजन्यानेच वागण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यास बाप तो बापच, असे म्हणणे म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.
तसे तर मोदींनी घटनाबाह्य पद्धतीने व जनमतांचा अनादर करून विरोधी पक्षांना फोडण्याचे काम केले आहे. पण राष्ट्रवादी फोडत असताना मोदींनी शरद पवारांच्या परिवारालाच फोडले, पण हु की चू करतील तर ते पवार कसले. पवारांच्या याच गप्प राहण्याच्या भूमिकेमुळे मोदींच्या मनात त्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे.
पवारांबद्दल मोदी आदराने वागतात त्याची अनेक कारणे आहेत, देशात स्थापन झालेली विरोधकांची इंडिया आघाडी अदानीच्या विरोधात संसद से सडक तक लढत असताना शरद पवार अदानीचे वकील पत्र घेवून मोदीसाठी धावून गेले. ही साधारण बाब नक्कीच नव्हती व नाही. अदानी देश लुटत असताना त्याची साथ देणे सोपे नव्हते. पण मोदी व अदानीचे हनुमान बनण्याचे काम ही पवारांनी केले. मन सौजन्य भाव असणे स्वभाविकच असणार, त्यात नवल काय ?
संसदेत मोदी सरकारने आणलेली शेती विषयक व अन्य जन विरोधी विधेयके मंजूर झाली पाहिजेत म्हणून आपल्या पक्षाच्या खासदारांना मतदान प्रक्रियेपासून रोकण्याचे काम ही मोदी, अडाणीसाठी पवारांनी केले आहे. याची ऐतिहासिक नोंद भारतीय संसदेच्या इतिहासात नोंद झाली आहे. तूर्त मोदी व अदानीला राहत मिळाली आहे, अशा परिस्थितीत कर्तव्य भावनेने पवारांचा आदर, सन्मान करणे ओघाने आलेच, तेच मोदींनी केले आहे. नाहीतर देशाच्या 75 वर्षांच्या इतिहासात मोदी इतका अहंकारी व घमेंडी सत्ताधारी झालेला नाही. पवारसाहेब मोदींचे वेळोवेळी संकटमोचक म्हणून उभे राहिले नसते तर मोदींनी इतरांसारखाच त्यांचा ही अपमान व अवमान केला असता. त्यामुळे बाप तो बाप या म्हणण्यात काहीच अर्थ नाही.
…………………
-राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)