• 180
  • 1 minute read

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वावर जागतिक मोहर ! उत्तर अमेरिकेतील ‘आंबेडकराईट असोसिएशनचा’ विशेष पुरस्कार प्रदान !

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वावर जागतिक मोहर ! उत्तर अमेरिकेतील ‘आंबेडकराईट असोसिएशनचा’ विशेष पुरस्कार प्रदान !

चिपळूण (संदेश पवार यांच्याकडून): दलित पॅंथरचे सहसंस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, जेष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कर्तृत्वावर दिनांक 25 मे 2024 रोजी जागतिक मोहर उमटविण्यात आली आहे. नॉर्थ अमेरिकेतील “आंबेडकराईट असोसिएशन ” या संस्थेचा 2024 सालचा विशेष पुरस्कार भारतातील सुप्रसिद्ध लेखक ज. वि. पवार यांना त्यांच्या अनुपस्थितीत देण्यात आला.

        आंबेडकराईट असोसिएशन ऑफ नोर्थ अमेरिका (AANA ) ही संस्था दरवर्षी सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या एका व्यक्तीस डॉ. आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. यावर्षी ज. वि. पवार यांनी उद्दीपित केलेल्या चळवळीचा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेचा तसेच समाज उन्नयनासाठी दिलेल्या जगभरातील व्याख्यानांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे . हा पुरस्कार म्हणजे पवार यांनी प्रगल्भित केलेल्या आंबेडकरवादाचा सन्मान आहे. ज.वी. पवार यांनी आंबेडकरवादाची कधीही कास सोडली नाही. उभे आयुष्य त्यांनी केवळ आंबेडकरवादाची जपणूक केली आहे .

       ज . वी. पवार यांची ग्रंथसंपदा मराठी, हिंदी, इंग्रजी व भारतातील अनेक प्रादेशिक भाषेत प्रसिद्ध झाली असून अनेक विद्यापीठातील अभ्यासक त्यांच्या चळवळीवर व साहित्यावर प्रबंध लिहीत आहेत. त्यांच्या कवितांचा आणि ग्रंथांचा समावेश अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आजही ते सतत क्रियाशील असून आंबेडकरवादी चळवळीत अत्यंत सक्रिय आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने अपरांत साहित्य कला प्रबोधिनी या साहित्य विषयक संस्थेचा उदय झालेला आहे. त्यांना मिळालेल्या या जागतिक पुरस्काराबद्दल आंबेडकरी चळवळीतून तसेच समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *