- 73
- 1 minute read
आपली राजकीय पिछेहाट मानसिक दृष्ट्या का होत आहे ?
आपली राजकीय पिछेहाट मानसिक दृष्ट्या का होत आहे ?
समाजातील काही प्रतिष्ठित मंडळी बरोबर चर्चा करत असताना माझ्या मनात भरपुर प्रश्न निर्माण होतात आपल्याला पण असे प्रश्न निर्माण होत असतीलच: माझ्या मनातील चलबिचल करणारे प्रश्न:
१ ) आपण राजकीयदृष्ट्या इतरांच्या मागे फरफटत का जातोय ? २ ) आपण आपले स्वाभिमानी आंबेडकरी विचार कुठे दफन करतोय का ? ३ ) आपण आपलेच सामाजिक व राजकीय अस्तित्व नष्ट करायला निघालो आहोत का ? ४ ) आपण आपल्या भावी पिढीतील मुलांचे भविष्य धोक्यात येईल असे का वागत आहोत ? ५ ) आपले काही सामाजिक व राजकीय ध्येयधोरणे नाहीत का ? ६ ) धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या आपण षंढ आहोत का ? ७ ) आपली राजकीय यशाबद्दल मानसिक तयारी का होत नाही? ८ ) आपण आपल्या राजकीय यशाबद्दल नेहमी नकारात्मक विचार का करतो ? ९ ) आम्ही स्वबळावर सामाजिक व धार्मिक परिवर्तन घडवणारे आहोत. असं असतानाही आम्ही ‘स्वबळावर राजकीय परिवर्तन’ घडवू शकत नाही , असा आमच्यात न्यूनगंड का तयार झाला आहे ? १० ) आम्ही केवळ इच्छाशक्तीच्या बळावर हजारो वर्षांपासूनची सामाजिक व धार्मिक गुलामगिरी लाथाडून स्वाभिमानी चळवळ उभारत असू तर मग गेल्या ७० वर्षातली ‘राजकीय गुलामगिरी’ मोडीत काढू शकत नाही का ?११ ) आपण आपला सामाजिक व राजकीय इतिहास का विसरत आहोत? १२ ) मानसिक दृष्ट्या आपण कमजोर आहोत का?
ज्याचा स्वाभिमान जिवंत आहे , अश्या प्रत्येक स्वाभिमानी व्यक्तीच्या मनात वरीलप्रमाणे👆🏻हे असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत.जो सामाजिक व राजकीयदृष्ट्या सजग आहे , विचार जिवंत आहे , अश्या प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूत हे प्रश्न निर्माण होतीलच.परंतु जे लोकं मानसिकदृष्ट्या मेलेत किंवा ज्यांना गुलामीच्या जगण्यातच धन्यता वाटते , अश्या स्वाभिमानशून्य व संधीसाधू स्वार्थी लोकांना हे असले प्रश्न पडणार नाहीत ते नेहमी नकारात्मक विचार करून विरोधात्मक भूमिका घेतील कारण त्यांना स्वबळावर व स्वतःच्या मनगटावर विश्वास नसतो.
ज्यांच्या धडावर स्वतःचे मस्तक आहे अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतके २५ स्वाभिमानी माणसे एकत्र आली तर धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम होऊ शकतो व समाजाला एक चांगला मार्ग दाखवू शकतात. सध्याचे राज्यात व केंद्रातील प्रस्थापित सरकार भविष्यात संस्कृतीच्या नावाखाली भयानक परिस्थिती निर्माण करत असुन सध्या चुकीच्या मार्गावर चालणारे व तरुणांची माथी भडकवणारे सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी तथाकथित हिंदुत्वाच्या नावाखाली सर्वच समाजाला , खासकरून भावी पिढीतील तरुणांना षंढ, निष्क्रिय व आळशी बनवत आहे.
म्हणूनच आंबेडकरी राजकीय चळवळ जिवंत ठेवायची असेल तर कोणाला तरी पहिले पाऊल टाकावेच लागेल. आपल्याच मतावर जिंकणारे हे सरकार आपल्याच जगण्याच्या हक्कावर गदा आणण्याचे काम करत आहे याला कुठेतरी आळा आणण्यासाठी व राजकीय ताकत निर्माण करण्यासाठी लवकरच एक सर्वसमावेशक दृष्टीकोनातून ‘वैचारिक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. जिंकु किंवा मरू माणुसकीच्या ( वैचारीक ) शत्रू संगे युद्ध आमचे सुरू!!!!
ज्याच्यात स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ जिवंत आहे , असे स्वाभिमानी हिंम्मत बहाद्दर उपस्थित राहतील, विचार जीवंत ठेवण्यासाठी व सामाजिक उन्नती साठी काही ध्येय धोरणे निश्चित करण्यासाठी नक्कीच आपली उपस्थिती राहणार आहे असे गृहीत धरतो.*
शंभर दिवस शेळी बनून जिवंत राहण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा.!!
वरील सर्व प्रश्र्नांची उत्तरंही आपल्याकडेच आहे, आपल्या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच १४२ कल्याण पुर्व विधानसभा जिंकण्याची रणनीती आखण्यासाठी व आपल्या मनातील सामाजिक राजकीय आर्थिक घालमेल थांबविण्यासाठी आपण चर्चा सत्रेत भाग घ्यावा.
बघा आपल्या वैचारीक पातळी समोर सर्वजण शेळी बनतील.
– मिलिंद बेळमकर –
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता