• 57
  • 1 minute read

आमच्या फसवणुकीला आम्हीच जबाबदार नव्हे काय ?:-

आमच्या फसवणुकीला आम्हीच जबाबदार नव्हे काय ?:-

           आमच्या स्वातंत्र्याला अठ्ठाहत्तर वर्षे होऊन ही पददलित वर्गाच्या अवस्थेत काहीच रचनात्मक बदल झाला नाही हा थोडी बहुत आरक्षणाच्या माध्यमातून चार घास सुखाचे मिळाले इतकेच ते ही त्या कुटुंबापुरतेच मर्यादीत आहे .आरक्षणाच्या माध्यमातून आलेली ताकद ही शक्ती नाही ती थोडीशी सुज आहे .आता ती सुज ही सरकारी यंत्रणेचे खाजगीकरण करुन बर्यापैकी उतरणे चालू आहे .पददलित वर्ग म्हणजे अनुसुचीत जाती ,अनुसुचित जमाती मुळ विमुक्त भटक्या जाती जमाती ,कमकुवत ओबीसी यांना कुणी वालीच नाही आणी हे ही जागे होत नाहीत .सध्या मराठा ,धनगर ,वंजारी आणि बंजारा या जाती हैदराबाद गॅझेट चे कोलीत घेऊन आप आपल्या जातीत गोंधळ घालत आहेत .हा नुसता गोंधळ नाही तर संविधानाचा जो “” न्याय ,स्वातंत्र्य ,समता व बंधुत्व ” याचीच होळी करणे चालू आहे .आम्हाला ओबीसी मध्ये घाला ,आम्हाला एससी त घाला आम्हाला एसटी त घाला अश्या तर्हेने नुसता कालवा चालू करुन सामाजिक ऐक्य तर बिघडवण्याचे काम चालु आहे .उपरोक्त जाती या सक्षम असल्याने ,धनाने व संख्येने बर्यापैकी असल्याने अराजकता माजवणे चालू आहे .केवळ आरक्षण हेच प्रगतीचे माध्यम असते तर अनुसुचित जाती मधील बौद्धेतर तर मातंग ,ढोर ,व्होल्लार ,वाल्मिकी समाज आहे त्या अवस्थेतच का आहे . मुळ आदिवासींचे संविधानिक संरक्षण। असुन ही का शोषण सुरु आहे ? मुळ विमुक्त भटक्या जाती जमातींच्या व बलुतेदार अलुतेदार मायक्रो ओबीसी यांची संख्या लक्षणीय असुनही दखलपात्र का नाहीत ? या सार्या प्रश्नांची उत्तरे शोधायची तरी कशी ? आमच्या नेमक्या उणीवा कोणत्या? तर मला जाणवलेल्या खालील उणीवा आहेत व त्या आपल्या आपणच दुर कराव्या लागतील .1) पहिले मी व माझी जात या जात केंद्रित मानसिकतेतून बाहेर पडणे व सारेच पददलित माझे बांधव आहेत असे समजून वागणे 2) आप आपल्या जाती मधील महापुरुष न शोधता ” महात्मा ज्योतिबा फुले ,छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अवलंब करणे .आपल्या मधील महापुरुषांचा आदर निश्चितच करा पण फुले, शाहु, आंबेडकर यांच्या बरोबर तुलना करू नका 3) सध्या खाजगीकरणामुळे सर्वच लोकांच्या नोकऱ्या चोरीला गेल्या आहेत त्यावर तज्ञांच्या सल्ल्याने काम करणे 4)आपल्या मधील समाज्याच्या नावाने जातीच्या नावाने बाजारात मांडलींकाची संख्या बरीच वाढली आहे त्यांच्या पासून सावध राहणे 5) काळानुरूप आपल्या मध्ये सुद्धा बरेच बदल करुन घेणे आवश्यक आहे त्या बदलाची मानसिकता तयार करून घेणे .6) समाज्यात शिक्षणाचे अनेक अडसर व गैरसमज आहेत ते दुर करुन आम्हाला आम्ही काय करायला पाहिजे हे समजून घेणे अश्या अनेक गोष्टी करणे आवश्यक आहे। त्या करिता अनुसुचित जाती ,अनुसुचित जमाती ,मुळ विमुक्त भटक्या जमाती ,व कमकुवत ओबीसी यांनी एकत्रीत येणे सध्या तरी मराठा ,धनगर ,वंजारी व बंजारा यांच्या पासुन दुरच राहणे महत्वाचे आहे

0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *