सहसंचालक ,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय याना पत्र पाठवून राज्यातील सर्व आय आय टी मध्ये संविधान मंच स्थापन करण्याचे निर्देश आयुक्त कौशल्य व रोजगार आणि उद्योग आयुक्तालयाच्या दिनांक 5 जुलै2024 च्या पत्रांवये देण्यात आले आहेत. राज्यभर संविधान मंच होईल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी निधी दिला जाईल असे या पत्रात म्हटले आहे.
सामाजिक न्यायाची खरी शिकवण भारतीय संविधानातून प्राप्त होते हे समजायला या विभागाला खूप वर्ष लागलीत. सरकारचे अनेक विभाग असे आहेत की अजून त्यांना सामाजिक न्याय पुरते समजत नाही. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिवस अनेक वर्षांपासून साजरा केला जात आहे परंतु साजरा करणाऱ्यांमध्ये ,अपवाद वगळता, शिकवण मात्र अंगी रुजली नाही. दिवस साजरा करण्याचा इव्हेंट होतो , मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो, काहींचा आर्थिक फायदा होतो. त्यासाठीच कार्यक्रम घडवून आणले जातात असे ही म्हटल्या जाते. सोशल मीडियात तश्या बातम्या येतात.
व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण विभागाचा हा उपक्रम आणि टाकलेले हे पाऊल अभिनंदनीय आहे. संविधान मंच म्हणजे नेमके काय करणार ? संविधानाची मूल्ये विद्यार्थी व शिक्षकांमध्ये कशी रुजविली जातील ? हे या पत्रात स्पष्ट केले नाही. राज्य सरकारच्या दि 24 नोव्हेंबर 2008 च्या GR मध्ये, तसेच शालेय शिक्षण विभागाच्या दि4 फेब्रुवारी2013 च्या GR मध्ये जे उपक्रम राबवायला सांगितले ते नियमितपणे राबविले जाणार आहेत का? की फक्त संविधानाचा स्तंभ उभारून विभाग थांबणार आहे , हे पुढे दिसून येईल. शासनाच्या दि 24 नोव्हेंबर2008 व दि 4 फेब्रुवारी2013, केंद्र सरकारच्या 19 नोव्हेंबर 2015 च्या निर्णयाची इमानदारीने अंमलबजावणी करण्यात शासन प्रशासन यशस्वी झाल्याचे दिसत नाही. संविधानाचा सन्मान म्हणजे प्रामाणिक, निपक्षअंमलबजावणी, होताना दिसत नाही. हे गंभीर आहे आणि लोकशाहीला धोकादायक आहे.
संविधान मंच च्या माध्यमातून विद्यार्थी यांच्यात संविधानाचे संस्कार व्हावेत, संविधानिक नितीमूल्यांचा जागर व्हावा, रुजावेत, संविधानाने दिले ते विद्यार्थ्यांना मिळावे, त्यांचे पायावर उभे राहण्यासाठी सर्व प्रकारची मदत मिळावी ,निधी मिळावा अशी अपेक्षा आहे.
प्रत्येक शासकीय विभागाने त्यांचे विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यात संविधानिक नीतिमूल्ये रुजविण्यासाठी व गुड गव्हर्नन्स साठी संविधान जनजागृतीसाठी स्वतंत्र सेल तयार करावा आणि संविधान समजून घेणेसाठी , विभागाअंतर्गत , *सामाजिक न्यायासाठी राऊंड दि इयर संविधानावर कार्यशाळा, संविधान परिषद, संविधान संमेलन , इत्यादी कार्यक्रम आयोजित केले पाहिजे, करावे, अभियान राबवावे. 2024-25 हे संविधान अमृत महोत्सवी वर्ष आहे.
उशिरा का होईना , एका विभागाने संविधान मंच ची स्थापना बाबत निर्णय घेतला. त्यासाठी माननीय मंत्री व आयुक्त यांचे अभिनंदन.
– इ झेड खोब्रागडे, (भाप्रसे नि
संविधान फौंडेशन नागपूर)