• 57
  • 1 minute read

आरक्षण भीक नव्हे!

आरक्षण भीक नव्हे!

हा तर बहुजनांचा संविधानदत्त हक्क!

          मनुस्मृतीला फाटा देऊन ‘न्यायाधीश’ बनत राजर्षी शाहू महाराजांनी 26 जुलै, 1902 रोजी बहुजनांसाठी 50 टक्के आरक्षण लागू केलं आणि सुरु झाला आरक्षणाचा क्रांतिकारी प्रवास…!
पुढे आरक्षणाधीश शाहुंची जयंती सणासारखी साजरी करा असा संदेश देणा-या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणावर संविधानात्मक तरतुद करून शाहुंच्या निर्णयावर केलं शिक्कामोर्तब !!
आता शिक्षण आणि नोक-यांमधील हे आरक्षण टिकवून ठेवण्याची जबाबदारी आहे तमाम आरक्षणभोगी समूहघटकांची !!! 
 
आरक्षणविरोधी मनुवाद्यांच्या छुप्या मनसुब्यांना फस्त करण्यासाठी संविधान कवच-कुंडलं होत हे समजून घेण्याची प्रथम गरज असून
अशा निर्णायक वळणावर संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश दिपस्तंभसम सांगाती होय. बाबासाहेब म्हणतात-
“मेरे जाने के बाद ये मत समझना कि मैं मर गया. जब तक संविधान जिंदा है, मैं जिंदा हूं. बस, संविधान को मत मरने देना…!”
या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीचा शांत डोक्याने विचार केल्यास मन सून्न होतं. मनूवादी नियोजनबद्ध षडयंत्र तहत संविधानाला दिवसेंदिवस कमजोर करत असून ते बदलण्यासाठी त्यांची राज्यसभेत बहुमत मिळविण्याच्या दिशेनं दमदार वाटचाल सुरू आहे.
अशावेळी बाबासाहेबांचा आणखी एक मार्गदर्शक तथा प्रेरक संदेश आरक्षणभोगी समूहघटकांना नव्या उमेदी, नव्या जाणिवा आणि नवी उर्जा देणारा होय.
“स्वाभिमानी लोग ही संघर्ष की परिभाषा समझते है. जिनका स्वाभिमान मरा होता है, वे गुलाम होते है. मुर्दा लोग मिशन नहीं चलाते और जिंदा लोग मिशन को रुकने नहीं देते !”
धर्ममार्तडांच्या मनूविळख्यात असताना राजर्षी शाहूंनी बहुजनांना 50 टक्के आरक्षण देण्याचं धाडस केलं. आज तर आपल्याला ते फक्त टिकवायचं आहे ! आणि त्यासाठी आपल्या भात्यात संविधानरूपी शास्त्र नि शस्त्र आहे !!
मराठा-़ओबीसी, बौद्ध-अबकड हा अंतर्गत झमेला चालत राहील. पण आरक्षण टिकलं पाहिजे. त्यासाठी खेकडा प्रवृत्तीला बगल देणं हीच काळाची गरज आहे.
 
चले चलो…!!!
 
*आरक्षण दिनानिमित्त* समताष्ठित भारत निर्माण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलेल्या महापुरुषांना विनम्र अभिवादन !
 
चले चलो…
कल अपना है !
 
जय भीम !
जय संविधान !!
जय भारत !!!
 
*भीमप्रकाश गायकवाड,* 
‘मूकनायक’
रविराजपार्क, परभणी
( 26 जुलै, 2025)
 
 
 
 
 
0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *