• 309
  • 1 minute read

आरक्षण विरोधकांच्या जीभेला लगाम घालणारी राहुल गांधींची नवी आरक्षणवादी भूमिका…!

आरक्षण विरोधकांच्या जीभेला लगाम घालणारी राहुल गांधींची नवी आरक्षणवादी भूमिका…!

         काँगेस पक्ष आरक्षण व्यवस्था खतम करण्याचा विचार तेव्हाच करेल, जेव्हा या देशातील सर्वच समाज घटकांना समान संधी मिळालेली असेल, पण आज देशात तशी परिस्थिती नाही. इतकी स्पष्ट भुमिका राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना घेतली. राहुल गांधी यांच्या या भूमिकेने आरक्षण विरोधकांच्या जीभेला लगाम घातला आहे. सर्वांना समान संधी उपलब्ध होणार नाही, तोवर आरक्षण व्यवस्था लागुच राहणार, हा राहुल गांधींच्या या भूमिकेचा स्पष्ट अर्थ आहे. ते इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी सर्वच क्षेत्राचे पदर उलगडत देशातील दलित, आदिवासी, ओबीसी व अल्पसंख्याक समाजाच्या भागीदारीबाबत ही चिंता व्यक्त केली. विकासाच्या प्रक्रियेत या समाज घटकांची परवड झाल्याचे चित्र ही त्यांनी या दौऱ्यात जगाच्या समोर आकडेवारी सह आणले. द्रोणाचार्य व एकलव्य ही त्यांनी जगासमोर उभा करुन ब्राह्मणी व्यवस्थेच्या चिंध्या करुन टाकल्या. तर अनेक उदाहरणे देत ” सबका साथ, सबका विकास” या मोदीच्या जुमल्यातील हवाच त्यांनी विदेशी धरतीवर काढून तिच्या ही चिंध्या केल्या. यामुळे संघ, भाजप व अंधभक्तांचा तडफडात होणे आपण समजू शकतो. पण तो भाजपच्या बी टीमचा ही होत आहे, तो का ? हे समजत नाही. मालकासाठी इतकी जी हुजरी अन् ती ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत. खूप कठीण आहे.

       आजपासून एक शतकापूर्वी अथवा ९ दशकापूर्वी गोलमेज परिषद व अन्य मार्गाने संधी मिळताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, शूद्र अतिशुद्राची ब्राह्मणी व्यवस्थेने केलेली दयनीय अवस्था जगासमोर मांडली. राहुल गांधी आज देशात व विदेशात ही तेच करीत आहेत. मग भाजपची बी टीम म्हणून काम करणाऱ्या तथाकथित आंबेडकरवादी पक्ष व संघटनांच्या नेत्यांना राहुल गांधींच्या या भूमिकाबाबत इतका आक्षेप का आहे ? तर यांचे उत्तर आहे, हे पक्ष एक तर भाजपसोबत आहेत, अथवा मतं विभाजनाचे राजकारण करीत ते भाजपला सहकार्य करीत आहेत. अन् अशा साऱ्या परिस्थितीत ही राहुल गांधी त्यांना कुठलाच स्पेशच मिळू देताना दिसत नाही. त्यामुळे त्यांचे तडफडणे साहजिकच आहे. ” नफरत के बजार में मोहब्बत की दुकान” खोलण्याचा जसा ते प्रयत्न करीत आहेत. तसाच प्रयत्न ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दुकानदारी करणाऱ्यांचा बाजार उठविण्याचे काम ही करीत आहेत. म्हणुन ते राहुल गांधींवर इतके चिडत आहेत. नफरत करीत आहेत.
        राहुल गांधी यांनी आरक्षण व्यवस्था संपविण्याचे विधान करुन काँगेस आरक्षण विरोधी आहे, हेच दाखवून दिले, अशी आवई बसपा, वंचित व अन्य काही आंबेडकरवादी विचारांच्या पक्ष, संघटना व नेत्यांनी उठविली आहे. भाजपचा फायदा व इंडिया आघाडीचे नुकसान करण्यासाठीं त्यांनी ही आवई उठविली आहे. हे देशातील जनतेला कळत आहे. त्यामुळे त्यांनी राहुल गांधी व इंडिया आघाडीच्या विरोधात संविधान अन् आरक्षणाच्या मुद्द्यावरून किती ही आकडतांडव केले तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. पण संघ, भाजपची सुपारी घेतल्याने ध चा मा करून राहुल गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न हे करीत राहणारच. यात काही शंका नाही.
        राहुल गांधी आरक्षण विरोधी आहेत, अशी विधाने गेल्या दोन दिवसात संघ व भाजपच्या अनेक नेत्यांनी केली आहेत. यामध्ये तडीपारचा ही समावेश आहे. पण आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजवाद्यांची केंद्र व राज्यातील अनेक सरकारे पाडण्याचे महापाप संघ, भाजपच्या नावावर आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच कर्प्यूरी ठाकुर यांचे बिहारमधील सरकार जनसंघाने पाडले आहे. तसेच विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार भाजपने पाडले आहे. असे असताना राहुल गांधी यांना आरक्षण विरोधी ठरवित स्वतःला आरक्षण समर्थक ठरविण्यात या धर्मांध शक्तींना जरा ही लाज, शरम वाटत नाही.
         आता देशभरातील अनेक आंबेडकरीवादी पक्ष, संघटना हिंदु राष्ट्र निर्माण करायला निघालेल्या भाजपसोबत आहेत, त्यांनी आपापल्या राज्यात राहूल गांधींच्या विरोधात मोर्चा खोलला आहे. भाजप नेत्यासाठी दलाली करणारे या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे मोर्चे काढत आहेत. या बिचाऱ्यांना राहुल गांधी काय बोलले हे ही माहित नाही. अन् माहित झाले तरी ते नीट समजून घ्यायला ही अक्कल लागते. हे बिचारे ते आणणार कुठून. यांच्या नेत्यांनी तर त्यांना भाजपच्या दावणीला बांधले आहे. बाकी काही असो राहुल गांधी यांच्या भूमिकेचा विपर्यास करुन संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नात राहुल गांधी यांची आरक्षणवादी भूमिका अधिकच स्पष्ट होत गेली असून आंबेडकरी विचारांचा मुखवटा घातलेल्या दलित नेतृत्वाचा चेहरा उघड होताना दिसत आहे.

_________________________________
– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *