• 65
  • 1 minute read

आर पी आय आर के यांच्यावतीने बदलापुरात रोजगार मेळावा संपन्न झाला.

आर पी आय आर के यांच्यावतीने बदलापुरात रोजगार मेळावा संपन्न झाला.

आर पी आय आर के यांच्यावतीने बदलापुरात रोजगार मेळावा संपन्न झाला.

दिनांक 28 जुलै 2024 रोजी सायंकाळी सात वाजता आर पी आय आर के च्या वतीने बदलापुरात रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला अशोक गजरमल बदलापूर शहर अध्यक्ष यांनी एडवोकेट राजेश देठे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राजेश देठे यांच्याकडून उपस्थितांना अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्यात आली. महिला बचत गटातील महिलांना छोटे छोटे उद्योग कसे करता येतील याकरिता शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना त्या बचत गटातील महिलांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतील याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. महिला बचत गटातील महिलांकरिता शिवण यंत्र देण्याचे त्यांनी सांगितले. शिवण यंत्राच्या माध्यमातून महिला बचत गटातील महिलांना रोजगार मिळू शकतो. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून महिला बचत गटांना कमी व्याज दराने कर्ज मिळू शकते
.. तसेच शासकीय स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून कचऱ्याचे वर्गीकरण सुका कचरा व ओला कचरा असे कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यक असते. त्याकरिता जनजागृती करणे गरजेचे आहे त्याकरिता विभागनिहाय सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असते. त्याकरिता महिला बचत गटातील महिलांना काम देण्याची व्यवस्था होऊ शकते. त्यातून त्यांना मानधन मिळण्याची व्यवस्था आहे. सोहम फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान यासारखे अनेक प्रकल्प कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच इतर विविध शासकीय योजना संबंधीची माहिती देण्यात आली. सदर प्रसंगी अशोक गजरमल (अध्यक्ष बदलापूर शहर) तसेच अशोक दंडवते, एकनाथ जगताप, वामन पठारे, तसेच सुभाष रणपिसे, आधी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. तसेच युवा पदाधिकारी प्रशांत कडलाक भाऊ शिर्के, दिनेश शिंदे, प्रशांत शेलार; तसेच महिला पदाधिकारी लक्ष्मी गायकवाड, कमलताई गजरमल, भावनाताई साळवी, तसेच इतर महिला सदस्या उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाच्या वेळी अशोक गजरमल यांनी आपले मनोगत व्यक्तकेले तसेच आरपीआय आर के च्या कार्यासंबंधीची माहिती कार्यक्रमात दिली. त्यानंतर सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0Shares

Related post

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना मृत्यदंड…?

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना…

       मालेगाव बॉम्बस्फोट नुसती एका स्फोटाची घटना नाही, तर देशातील २० कोटी जनतेला देशविरोधी…
अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!      …
निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा.         जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *