- 16
- 1 minute read
इंडिगो:च्या फज्जाचे रहस्य!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 41
इंडिगो:च्या फज्जाचे रहस्य!
देशामध्ये बस आणि रेल्वे हे वेळेवर न येण्याचे आपण अनेकदा ऐकतो आणि प्रत्यक्ष प्रवासात अनुभव घेतो; परंतु, विमान हवामान वाईट असल्याशिवाय रद्द होत नाही किंवा नियमित वेळेवर ते पोहोचत नाही! परंतु, सध्या भारताचे नव्हे, तर जगभराचे हवामान चांगले असताना देखील भारतातील सर्वाधिक हवाई वाहतूक करणाऱ्या इंडिगो कंपनीचे जवळपास हजार पेक्षा अधिक उड्डाणे रद्द झाल्याचे अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो. इंडिगो ही कंपनी सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी एक प्रकारे विमान चालवते आणि त्यामुळे देशांतर्गत आणि देशातून बाहेर जातानाही ची एकूण हवाई वाहतूक आहे, देशातल्या एकूण हवाई वाहतुकीचा ६५ टक्के हिस्सा या कंपनीकडून प्राप्त केला गेला. पण, असं असलं तरी, गेल्या आठवड्याभरापासून किंबहुना त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कंपनीला आपली उड्डाणे एका मागून एक रद्द करावी लागली आहेत. याच्यामागे तीन कारण प्रामुख्याने सांगितले जात आहेत. सर्वात पहिलं कारण की, हवाई पायलट जे आहेत त्यांच्या कामाच्या तासांमध्ये बदल केला गेला आहे. हा बदल कमी तासांचा केला गेला असला तरी, परिणाम त्यांच्या वेतनावर झाला आहे. वेतन कमी झाल्यामुळे अनेक पायलट उड्डाण करण्याला राजी नाहीत. दुसरी यातील नियामकताही काही प्रमाणात कारणीभूत आहे. पण, या सर्वांपेक्षा जे कारण आतल्या गोटात जे चर्चिले जात आहे, ते म्हणजे जेव्हा खाजगी क्षेत्रामध्ये एखादं क्षेत्र, एखाद्या कंपनीची मक्तेदारी बनते, तेव्हा, ती मक्तेदारी मोडून काढण्यासाठी किंवा त्या व्यवसायात इतरांनी प्रवेश करण्यासाठी अनेक क्लृप्त्या केल्या जातात; त्यामध्ये या कंपनीने जो एकूण ६५ टक्के हिस्सा हवाई वाहतुकीमध्ये देशांतर्गत आपल्याकडे ओढलेला आहे; यामध्ये इतरही खाजगी पार्टनर्सना प्रवेश घ्यायचा असेल; अशावेळी ही स्पर्धा निकोप न ठेवता तिला सत्तेच्या संचलना माध्यमातून विकोपाला नेलं जातं! तोच एक प्रकार पुन्हा एकदा या निमित्ताने पाहायला मिळतो आहे. खाजगी भांडवलदार-खास करून भारतीय भांडवलदार-निकोप स्पर्धेऐवजी सत्तेशी संधान साधून आपला प्रवेश प्रत्येक क्षेत्रात कसा होईल, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असतात. अशा प्रयत्नांचा भाग म्हणजे हा इंडिगो चा उडालेला फज्जा आहे काय? अशाही दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहिले जात आहे. इंडिगो म्हणून व्यवसाय करणाऱ्या या कंपनीचे गुडगाव येथे मुख्यालय आहे . ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रवासी वाहतूक आणि ताफ्याच्या आकाराच्या बाबतीत ही भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे , ज्याचा देशांतर्गत बाजारपेठेत वाटा ६५% आहे. ही आशियाई विमान कंपनीची दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी आहे. प्रवाशांच्या वाहतुकीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक आहे, २०२५ च्या चौथ्या तिमाहीत ३१.९ दशलक्षाहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली. नोव्हेंबर २०२५ पर्यंत , इंडिगो १३७ ठिकाणी दररोज २,७०० हून अधिक उड्डाणे चालवते – यात ९४ देशांतर्गत आणि ४३ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. इंडिगो कंपनी तिच्या उपकंपनी, इंडिगो कारगो अंतर्गत कार्गो सेवा चालवते. तिचे प्राथमिक केंद्र दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे . डिसेंबर २०१२ मध्ये ही एअरलाइन प्रवासी बाजारपेठेतील वाट्यानुसार सर्वात मोठी भारतीय हवाई वाहतूक कंपनी बनली. २०२२ मध्ये ओएजीने इंडिगोला जागतिक स्तरावर १५ व्या क्रमांकाची सर्वात जास्त वेळेवर येणारी एअरलाइन म्हणून स्थान दिले . रडारबॉक्सच्या आकडेवारीनुसार, ही जगातील सहावी सर्वात व्यस्त एअरलाइन देखील आहे . अशाप्रकारे हवाई वाहतूक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या या कंपनीला एकाएकी त्यांची हवाई उड्डाणे रद्द करावी लागत आहे, याचा अर्थ शासन संस्था केवळ बघ्याची भूमिका घेऊन आपल्या मास्टर्स प्लेयर्सना पुढे करित आहे, असा आता देशवासियांचा समज झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देण्यात शासन सत्तेचा रस असल्याशिवाय अशा घटना घडणार नाहीत. त्यामुळे, इंडिगो हवाई वाहतूक निमित्ताने निर्माण झालेल्या स्थितीकडे आख्ख्या देशाचेच नव्हे, तर, जगाचे लक्ष लागून आहे.
0Shares