- 67
- 1 minute read
इराण ची हतबलता ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 89
इराण ची हतबलता आंतरराष्ट्रीय सामंजस्य, स्थैर्य आणि संतुलन बिघडवणारी
हे इस्राएल – इराण युद्ध नव्हतं.
हे (इस्राएल + ट्रम्प ) विरुद्ध इराण असं युद्ध होतं.
इराण ला ट्रम्प यांनी 60 दिवसांची नोटीस दिली होती. 13 जून हा 61 वा दिवस होता.
ट्रम्प यांना कोणत्याही देशाचं सार्वभौमत्व मान्य नाही.
भारत आणि पाकिस्तानला तात्काळ जे ट्रम्प यांनी युद्धबंदी करायला भाग पाडली हा ट्रम्प हेजेमनी (ट्रम्प स्वामित्वाचा) भाग आहे.
इस्रायली सूत्रबद्ध (well coordinated) हल्ल्यामध्ये इराणी सैन्याचे 5 सर्वोच्च अधिकारी आणि 2 सर्वोच्च अणु-शास्त्रद्न्य मारले गेले.
या क्षणाला इराण हतबल आणि खिळखिळा झाला आहे.
ही हतबलता आंतरराष्ट्रीय सामंजस्य, स्थैर्य आणि संतुलन बिघडवणारी आणि पर्यायाने युरोप-अमेरिका- इस्राएल एकत्रित विरुद्ध इराण-चीन-रशिया-उत्तर कोरिया-तुर्कीये एकत्रित या दोन बलाढ्य गटांमधलं हे वैश्विक युद्ध असणार आहे.
गट युद्धापूर्वी ठरत नसतात तर युद्धादरम्यान ठरतात.
उजव्या विचारसरणीच्या भांडवलदारी इस्राएल-अमेरिका-काही युरोपिअन देश एकत्रित हे युद्धापूर्वीच ठरलेले तर इराण-चीन-रशिया-उत्तर कोरिया-तुर्कीये-सौदी अरेबिया हे युद्धदरम्यान एकत्रित व्हावे लागलेले, तेही इराण ला गरज पडली तर सहकार्य करू असे अभिवचन दिलेले, पण पहिल्या गटासारखे युद्धात सहभागी नसलेले देश यांचा समूह असे हे वैश्विक युद्ध आहे. तात्काळ हे युद्ध थांबले किंवा थांबवले गेले नाही तर याचे रूपांतर तिसऱ्या महायुद्धात झाल्याशिवाय राहाणार नाही.
हान्स मॉर्गनथाऊ यांच्या रिऍलिझम च्या सिद्धांताच्या अंगाने पाहिले तर, असुरक्षित वाटणे, देशांतर्गत नेत्याची लोकांमधल्या घसरलेल्या लोकप्रियतेचा मानांक(इस्राएल चे प्रधान मंत्री नेतान्याहू), वॉर मॉंगर प्रवृत्ती (डॉनल्ड ट्रम्प) या बाबी युद्धाला कारणीभूत ठरतात.
ट्रम्प महाशय स्वतःच्या मताप्रमाणे आणि इशाऱ्यावर तसेच लहरीवर जग चालवू पाहात आहेत.
इराण सारखा समृद्ध, वैविध्याने नटलेला, स्वतः चा सांस्कृतिक वारसा आणि परंपरा असलेला देश ट्रम्प यांच्या मनमानीला युद्ध पत्करेल पण बळी पडनार नाही आणि अगदी तेच झालं. अनेक प्रकारांच्या निर्बंध्दांनी जर्जर होऊनही स्वतः च्या आंतरिक शक्तींच्या आधारे तग धरलेला इराण आज 13 जून च्या इस्राएल – अमेरिका एकत्रित हल्ल्यात अनेक मोहरे गमावल्यामुळे हतबल झालेला आपल्याला दिसतोय. ही हतबलताच तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरेल.
एका महाशक्तीचा उदय होईल आणि प्रभावी मध्यस्थी होईल या आशेने आज आपण युरोप कडे पाहात आहोत. युरोप ची ट्रम्प यांच्या मनमानी, लहरी, आणि एककल्ली मानसिकतेला असलेली मूक संमती, गाझा मधला नरसंहार जगाला हस्तक्षेप करून न थांबवता पाहायला भाग पाडतोय हा योग्य वर्ल्ड ऑर्डर निर्माण न झाल्याचा दुष्परिणाम म्हणावा लागेल.
बराक ओबामा यांनी उशिरा का होईना पण लिबियातली कारवाई चुकली हे मान्य करण्याची परिपक्वता दाखवली ते अभिनंदनास पात्र आहेत.
असा एक फ्रंट तयार व्हावा ज्यात बाराक ओबामा, बर्नी सँडर्स, एलिझाबेथ वॉरन हे अमेरिकेतले राजकारणी सोबत जर्मनीच्या अँजेला मर्केल सारख्या प्रभृती शिवाय ग्रीस चे यानीस वारूफाकिस सामील आणि सहभागी असतील आणि या फ्रंट ने दबाव गट म्हणून काम करून नोआम चॉम्स्की, प्रताप भानू मेहतां सारख्या पब्लिक इंटेलेक्चुअल्स च्या सल्ल्याने जगात शांतता प्रस्थापित करावी.
जगाला तिसऱ्या महायुद्धापासून वाचवावे ही सदिच्छा आहे.
ऍडव्होकेट (डॉ) संजय अपरांती,
निवृत्त पोलीस अधीक्षक
बहुजन हितकारिणी सभा,
नाशिक,
17 जून 2025.
0Shares