जर उद्याच्या महापालिका निवडणुकीत ईव्हीएम चा झोल झाला नाही, वोट चोरी झाली नाही,विरोधी उमेदवारांवर साम,दाम,दंड,भेद यांचा वापर झाला नाही,हजार दोन हजार रुपयांची खैरात वाटून मतदार खरेदी झाली नाही तर…
तर गड्या तुला,अजून पण चान्स हाय.तुला पाहिजे तो उमेदवार निवडून आण.लाग कामाला. निराशा झटक.लवकर आटप . उठ… उठ वेड्या तोड बेड्या !
तुझ्यासारखे काही येडे निवडणुकीच्या मैदानात हायेत अजून.कोण पक्षाच्या तिकिटावर तर कोण अपक्षाच्या नावावर.त्यांना चांगलंच माहित हाय,आपलं काय खरं नाय.पण तरीबी ते लढतायत.आपला कस आजमावतायत.त्यांना साथ दे.भाजप संघाला मात दे.लोकशाही अजून जिवंत हाय,याचा सबूत दे.
मुंबई वाचव,मराठी वाचव. आपला देश वाचव. लोकशाही वाचव. तुला शिव शाहू फुले आंबेडकरांची आण हाय.आपलं संविधान वाचव.