• 32
  • 1 minute read

एकीकडे पहलगामचे शहीद सैनिक, हकनाक मृत्यू ओढवलेले पर्यटक आणि दुसरीकडे मुलाचा धंदा असा पेच असेल तर काय निवडायचं ते त्यांनी निवडलं.

एकीकडे पहलगामचे शहीद सैनिक, हकनाक मृत्यू ओढवलेले  पर्यटक आणि दुसरीकडे मुलाचा धंदा असा पेच असेल तर काय निवडायचं ते त्यांनी निवडलं.

            मोदी आणि शहांनी जो मूळ उदारमतवादी भारतीय राष्ट्रवाद सोडून देऊन भंपक आणि संकुचित राष्ट्रवाद रुजवायचा प्रयत्न केला होता त्याला जय शहा या अमित शहांच्या मुलानंच टाचणी लावली हे एक त्यातल्या त्यात बरं झालं, अन्य कोणी त्या जागी असता तर मोदीशहांनी पोसलेल्या नीच सोशल मिडीया सेलनं हाहाकार माजवला असता.

फक्त कल्पना करा की शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असते आणि पहेलगामनंतर पाकिस्तान सोबत सामने खेळायचा निर्णय झाला असता तर काय झालं असतं! यांनी सगळ्या देशात वणवा पेटवला असता.

एकीकडे पहलगामचे शहीद सैनिक, हकनाक मृत्यू ओढवलेले पर्यटक आणि दुसरीकडे मुलाचा धंदा असा पेच असेल तर काय निवडायचं ते त्यांनी निवडलं.

तथापि यावरून त्यांचे निर्बुद्ध समर्थक कुठलाही धडा घेण्याची कोणतीही शक्यता नाही. या लोकांचं माकड केलंय मोदी शहांनी. आज पाकिस्तानसोबत खेळायचं म्हणजे खरा राष्ट्रवाद. उद्या राजकीय सोय पाहून पाकिस्तानशी नुरा कुस्ती खेळायची हा राष्ट्रवाद. परवा पाकिस्तानची जिरवू अशा वल्गना करायच्या हा राष्ट्रवाद! माकड जसं डमरू वाजेल तिकडं पळतं तशी एकदा अवस्था करून ठेवली की आपण करू ते निभावून नेता येतं हे त्यांना कळलेलं आहे. तेच त्यांच्या ‘यशाचं’ रहस्य आहे.

नवाज शरीफच्या अचानक प्रेमापोटी मोदी शरीफच्या वाढदिवसाची बिर्याणी खायला थेट पाकिस्तानात उतरले. समर्थकांनी टाळ्या वाजवत तो मास्टरस्ट्रोक आहे असं सांगितलं. देशातल्या अब्दुलची जिरवायची असेल तर ते आवश्यक होतं वगैरे वगैरे महाभंपक समर्थनं करतांना बिचारे केविलवाणे झाले पण मूर्खपणा सोडला नाही. नोकर बनलेले मोदी चॅनल्स ही किती कमालीची मुत्सद्देगिरी आहे ते सांगायला लागले. बूट चाटण्याला या चॅनलवाल्यांनी आता राष्ट्रीय कर्तव्याचा दर्जाच दिलेला आहे.

युद्धकाळात याच चॅनलवाल्यांनी आपल्याला दाखवलं की पाकिस्तानची बहुतेक शहरं आता भारतीय लष्कराच्या ताब्यात आली आहेत. असं होतं तर डोनाल्ड ट्रंप यांच्या एका ट्वीटवर युद्ध थांबवणं हा देशद्रोहच नव्हता का? ट्रंप कमीत कमी चाळीस वेळा म्हणत आहेत की मी युद्ध थांबवलं. मोदी एकदाही म्हणत नाहीत की हे खोटं आहे. संसदेत राहूल गांधींनी आव्हान दिलं की एकदा तरी म्हणा हे खोटं आहे, मोदी चकार शब्द काढत नाहीत. इकडे यांचे बिनडोक समर्थक लोकांना ‘आमचा ट्रंप पेक्षा आमच्या पंतप्रधानांवर विश्वास आहे’ वगैरे भंपकपणा करून वेळ मारून नेणार आणि ज्यांनी प्रश्न विचारले त्यांनाच देशद्रोही ठरवणार! म्हणजे जिंकत असलेलं युद्ध सैन्याला बंद करायला लावणं हा देशद्रोह नाही, पण युद्ध का थांबवलं हे विचारणं मात्र देशद्रोह आहे असं हे अजब तर्कट. इतका निर्बुद्धपणा फक्त एकाच पक्षाच्या समर्थकांमध्ये असू शकतो. अदानीचा अमेरिकेतला धंदा बंद होऊ नये म्हणून युद्धबंदी केली का? या प्रश्नाचं कोणतंही समर्पक उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाही, मिळणारही नाही. धंदा चालावा म्हणून युद्धबंदी केली हा खालच्या दर्जाचा आरोप आहे असं म्हणणार्‍या बिनडोकांनी आता धंदा चालावा म्हणून पहेलगाम विसरलं हेही खोटं आहे असं म्हणून टाकावं.

अजून एखादा दिवस थांबा. पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळून मोदींनी अमेरिकेची कशी जिरवली याच्या पोस्ट फिरतील. सोशल मिडीया सेल मॅन्युफॅक्चुरिंगमध्ये बिझी असेल सध्या. येतील काही दिवसातच. आणि मग ‘सामना पाहणार नाही’ असं उसन्या अवसानानं म्हणणारे तोंडफाटेपर्यंत स्तुती करतील.

थोडाफार विचार करू शकणार्‍या माणसांना हे सगळं किळसवाणं वाटतं. हे किळसवाणंच आहे. फक्त सोशल मिडीयात आम्ही खरं किंवा खोटं काहीही पसरवू शकतो या अमित शहांच्या सूत्रावर हे सगळं चाललेलं आहे. मूर्खपणा कधीही सोडणार नाही अशी शपथ घेतलेले बिनडोक समर्थक मिळाले की सगळं शक्य आहे.

‘लांडगा आला रे आला’ हे किती काळ चालावं ते त्या त्या समाजाच्या आकलनाच्या कुवतीवर अवलंबून आहे.

कधी ना कधी लांडगा आला रे आला मागचा मतलबीपणा सर्वसामान्य माणसांच्याही लक्षात येतोच.

फक्त एका गोष्टीचा उच्चार सतत केला पाहिजे ती गोष्ट ही की या निर्बुद्धांना जे लोक यांचे शत्रू वाटतात ते सगळ्यात जास्त विवेकी होते आणि पाकिस्तानच्या किती गळ्यात गळे घालायचे हे त्यांना कळत होतं. मुस्लीम बहुसंख्या असतांनाही नेहरूंनी पाकिस्तानला काश्मीर गिळू दिलं नाही. इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दटावणीवर युद्धबंदी केली नाही. अमेरीकेची सातव्या आरमाराची धमकी झुगारून बांगला देशाचा तुकडा पाडून दाखवला. राजीव गांधींनी कधी अटलबिहारींसारखी अमृतसरहून लाहोरला बस नेली नाही. आणि मनमोहनसिंगांनी कधी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली नाही.

नेहरूंच्याच शिक्षण व्यवस्थेत फुकटात शिकलेल्या आजच्या बेईमान सुशिक्षितांना एवढं श्रेय जरी त्यांना देता आलं तरी खूप आहे. त्यांची बुद्धी थोडीफार वाढीला लागली असं म्हणता येईल.

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *